आमचा युवा वर्ग हा आमचा गौरव आहे. युवकच देशाला प्रगतीच्या नव्या उंचीवर घेऊन जातात. युवा वर्गाला कोणत्याही प्रकारचा त्रास होतो. तेव्हा त्यांना मदतीचा हात देणे, हे आमचे आद्य कर्तव्य असते.

पुण्यातील 7 वर्षांची वैशालीही गरीब कुटुंबातील मुलगी असून दोन वर्षांपेक्षा जास्त काळ तीच्या हृदयामध्ये छिद्रहोते. या सर्व काळात तीला असह्य शारिरीक त्रासाला सामोरे जावे लागले.

छोट्या वैशालीने जेव्हा आपल्या हृदयाच्या दुखण्याबाबत पंतप्रधानांना पत्र लिहून मदत मागायचे ठरवले, तेव्हा पंतप्रधान तीला प्रतिसाद देण्याबरोबरच स्वत: भेट घेऊन तीचे मनोधैर्य उंचावतील, अशी कल्पनाही तीने केली नसेल.

वैशालीचे दोन पानांचे पत्र हे पंतप्रधानांना केलेले भावनिक आवाहन होते. भविष्यात पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी स्वत:ची मुलगी मानून मदत करण्याचे आवाहन तीने केले होते.

या पत्राची दखल घेत वैशाली पर्यंत पोहचून, तिच्या आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या करुन तिच्यावर पूर्णपणे मोफत उपचार करण्याची सूचना पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना दिली.

हे झाल्यानंतर वैशालीने पंतप्रधानांना एक हृदयस्पर्शी पत्र लिहिले. आणि त्यासोबत एक चित्रही जोडले. या पत्रालाही पंतप्रधानांनी उत्तर पाठवले.

त्यानंतर पंतप्रधान जेव्हा 25 जून 2016 रोजी पुण्यात गेले तेव्हा त्यांनी वैशाली आणि तिच्या कुटुंबियांची व्यक्तीश: भेट घेतली, ही भेट दीर्घकाळ त्यांच्या स्मरणात राहील, असे पंतप्रधान म्हणाले.

वैशालीचा हा किस्सा हे केवळ एक उदाहरण आहे. नागरिकांची अशी अनेक पत्रे पंतप्रधान आणि त्यांच्या कार्यालयात पोहचतात, अशा समस्या समजून घेऊन देशातील नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागू नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जाते.