वर्ष होते १९९५. गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला पहिल्यांदाच विजय प्राप्त झाला होता आणि ते स्वबळावर पाहिल्यांदाच बहुमताने सरकार स्थापन करत होते. दोन महिन्यांनतर राज्यामध्ये पालिका निवडणुका जाहीर झाल्या. निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असतानाच मोदींनी त्यांच्या विश्वासातील काही लोकांना बोलावले आणि त्यांनी कधीही न पाहिलेले एक साधन त्यांना दिले, जे त्यांनी नुकतेच त्यांच्या परदेश दौऱ्यातून आणले होते – डिजीटल कॅमेरा. पक्षाच्या प्रचार पथकासोबत संपूर्ण राज्यात फिरून लोकं आणि त्यांचे भाव, त्यांचे पोशाख, सवयी, लोकसभांमधील लोकांची उपस्थिती, लोकं त्यांच्या कामाच्या ठिकाणी, चहाच्या टपरीवर काय खातात हे सर्व म्हणजेच एकंदरीत गुजरातचा अस्सल सुगंध त्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करून आणण्याचे काम त्यांना देण्यात आले होते. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा डिजीटल कॅमेरा पश्चिमेकडील देशांमध्ये लोकप्रिय झाला होता आणि भारतात तो अगदी काही जणांकडेच होता.
केवळ एक व्यक्ति म्हणून नव्हे तर प्रशासनाचा एक आराखडा म्हणून देखील काळाच्या पुढे जाऊन लोकांमधील क्षमता ओळखणे आणि त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजीटल नवशोधांचा अवलंब करणे ही मोदींची सवय अजूनही कायम आहे. राजकीय नेत्यांमध्येच नाही तर एकंदरीत समाजामध्ये देखील सोशल मिडियाची क्षमता ओळखून हे केवळ ब्रॉडकास्टचे एक माध्यम नसून समानतेला डिजिटली जोडणारा एक दुहेरी मार्ग आहे हे ओळखणारे मोदी हे पहिले व्यक्ती होते यात आश्चर्याची काहीच बाब नाही. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सोशल मिडिया मध्ये योगदान देणारा एक वर्ग त्यांच्याकडे आधीपासूनच होता. पंतप्रधान म्हणून त्यांनी जुलै २०१४ मध्ये सर्वप्रथम माय जीओव्ही पोर्टल सुरु केले. एका वर्षानंतर अधिकृतपणे सरकारचा महात्वाकांशी डिजीटल इंडिया हा उपक्रम सुरु करण्यात आला. २०१५ मध्ये कॅलिफोर्नियातील त्यांनी सॅन जोस येथे डिजिटल इंडिया कार्यक्रमावेळी मोदी म्हणाले की, “सोशल मिडिया किंवा त्याच्या सेवांच्या विस्ताराचा प्रचंड वेग पाहता, तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल की, ज्यांना आशा नव्हती त्यांच्या आयुष्यात देखील वेगाने परिवर्तन झाले आहे. म्हणूनच मित्रांनो याच खात्रीतून डिजिटल इंडियाचा जन्म झाला आहे. भारताच्या परिवर्तनासाठी हा महत्वाचा घटक ठरला आहे, कदाचित मानवी इतिहासात यापूर्वी कधीही नव्हता असा. यामुळे केवळ समाजातील दुर्बल, दूरस्थ आणि गरीबातील गरीब व्यक्तीचे आयुष्य बदलले असे नव्हे तर राष्ट्राची काम करण्याची आणि जगण्याची पद्धती बदलली आहे.”