एक उत्कट लेखक, कवी आणि संस्कृतीप्रेमी... नरेंद्र मोदी यांचे वर्णन करण्यासाठी ही संबोधने सुद्धा वापरता येतील. त्यांच्या व्यस्त, अनेकदा त्रासदायक वाटेल अशा वेळापत्रकात सुद्धा नरेंद्र मोदी आपला काही काळ योगा, लेखन, सोशल मीडियावरून लोकांशी संवाद साधणे अशा आपल्या आवडत्या गोष्टींसाठी आवर्जून देतात. त्यांच्या सभांच्या दरम्यान सुद्धा त्या ठिकाणच्या आपल्या अनुभवांबाबत ते ट्वीट करताना दिसतात. अगदी लहान असल्यापासून ते लिहित आले आहेत. 24 तास ठळक बातम्यांच्या आजच्या या काळात विस्मरणात जाऊ शकणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित काही बाबींचा परिचय या विभागातून होऊ शकेल.
|
||
नरेंद्र मोदींच्या जिव्हाळ्याच्या विषयावरील त्यांच्या उत्कृष्ट भाषणापैकी एका भाषणाचा विषय आहे, योग. | ||
|
||
आणीबाणीच्या अंधारलेल्या काळात गुजरातमधील परिस्थितीची एक झलक पाहा, सामाजिक समतेबाबत नरेंद्र मोदींची मते वाचा आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी हरीत ग्रह राखण्याला महत्व द्यावे, असे त्यांना का वाटते, ते जाणून घ्या … | ||
|
||
युवा असताना नरेंद्र मोदी डायरी लिहू लागले, पण प्रत्येक 6-8 महिन्यांनंतर त्या डायरीची पाने ते जाळून टाकत असत, हे तुम्हाला माहीती आहे का? एके दिवशी एका प्रचारकाने त्यांना असे करताना पाहिले आणि त्यांनी असे करू नये अशी विनंती केली. तेच कागद साक्षीभावमध्ये संकलित झाले, 36 वर्षीय नरेंद्र मोदी यांचा विचार संग्रह ठरले. | ||
|
||
येथे नरेंद्र मोदी यांच्या कवितांचा एक सुसंगत संग्रह आहे. गुजराती भाषेत लिहिलेल्या या रचना निसर्गमाता आणि राष्ट्रभक्ती या संकल्पनांवर आधारित आहेत. | ||
|
||
लोकप्रिय संस्कृतीप्रती नरेंद्र मोदी यांना वाटणारा विश्वास यातून व्यक्त होतो. आणीबाणी विरोधी संघर्षात सक्रियपणे सहभागी होत असताना, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य ही त्यांच्यासाठी विश्वासाची बाब होती आणि नंतरच्या काळातही ती भावना कायम राहिली. ख्यातनाम कलाकारांसोबतच्या त्यांच्या संवादांचा आपणही आस्वाद घ्याल. | ||
|
||
पार्थिव गोहिल या कलाकाराने गायलेली नरेंद्र मोदी लिखित एक सुंदर कविता | ||
|
||
नवरात्रीनिमित्त श्री नरेंद्र मोदी यांनी लिहिलेली एक कविता |