Big boost to infrastructure development in Uttar Pradesh: Six-laning of Handia-Varanasi section of NH-2 cleared by Cabinet
Six-laning of Handia-Varanasi section of NH-2 in Uttar Pradesh improve infrastructure in the state, add to socio-economic progress

राष्ट्रीय महामार्ग 2 च्या उत्तर प्रदेशमधल्या हंडिया - वाराणसी पट्ट्याच्या सहा पदरीकरणाला मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने मंजूरी दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पाच्या पाचव्या टप्प्याअंतर्गत हे काम केले जाईल.

सुमारे 73 किलोमीटरच्या या रस्त्याच्या सहापदरीकरणासाठी, भूमी अधिग्रहण, पुनर्वसनासह 2,147.33 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे उत्तर प्रदेशमधल्या पायाभूत सुविधा सुधारणार असून प्रवासाचा वेळही वाचणार आहे. त्याचबरोबर या भागातली सामाजिक-आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठीही याची मदत होणार आहे.