नरेंद्र मोदींना कधीच थकवा येत नाही, यामागे काय गुपित आहे? इतक्या व्यस्त दिनक्रमात, आठवड्यामागून आठवडे सुट्टी न घेता सतत काम करण्याची ही उर्जा त्यांना येते कुठून? तेही एखाद्या यंत्रासारखे सातत्याने काम करण्याची शक्ती त्यांच्यात कुठून येते? हा प्रश्न सतत त्यांचे प्रशंसक आणि टीकाकार दोघेही सतत विचारत असतात.

टाऊनहॉल इथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांना हा प्रश्न थेट विचारण्यात आला, दिल्लीतल्या एका मुलाखतीत एका पत्रकारानेही त्यांना हा प्रश्न विचारला. त्यावर नरेंद्र मोदी यांनी जे उत्तर दिले, ते त्यांच्या वैयक्तिक भूमिकेतून, अगदी अगदी वास्तववादी आणि व्यावहारिक वाटेल, मात्र त्याच्यामागे एक तत्वज्ञानही आहे- ते म्हणजे, थकवा कधीही येत नाही, कारण एक मिशन पूर्ण करण्यासाठी, लक्ष्य गाठण्यासाठी काम करतो आहे, त्याशिवाय मनात हे सतत कुठेतरी असतं की आजून खूप काम बाकी आहे, अपूर्ण राहिले आहे, त्यामुळे विश्रांतीचा विचार येतच नाही. राहुल जोशी यांनी विचारलेल्या या प्रश्नाला मोदी यांनी दिलेल्या उत्तरातले त्यांचेच शब्द सांगायचे झाल्यास, “आपण काम करून थकत नाही तर काम आपाल्याला समाधान देते. त्या सामाधानातून आपल्याला पुन्हा काम करण्याची उर्जा मिळते. मी याचा अनुभव घेतला आहे, आणि मी हे सतत माझ्या युवा मित्राना सांगत असतो. थकवा हा शारीरिक नाही तर जास्त मानसिक पातळीवर असतो. प्रत्येकाची विशिष्ट काम करण्याची क्षमता समानच असते. तुम्ही नवनवी आव्हाने स्वीकारत चला, तुमचा आतला आवाज तुम्हाला नेहमीच मदत करेल, ते तुमच्या आत असतंच”.

त्यांचा हा मंत्र साधा आहे, मात्र तो बरंच काही सांगून जातो. जर तुम्हाला तुमच्या कामातून आनंद मिळत असेल, तर तुम्ही कधीच थकणार नाही. कारण तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करता आहात.