भारताच्या पंतप्रधानांना खायला काय आवडते ? असा प्रश्न विचारला जाणे स्वाभाविक आहे. ते खाद्यप्रेमी आहेत का ...
याबाबत नरेंद्र मोदी यांनी स्वत:च माहिती दिली.
“सार्वजनिक आयुष्य जगणाऱ्या लोकांचे जगणे फार अनियमित असते. त्यामुळे जर एखाद्याला सार्वजनिक आयुष्यात सक्रीय राहायचे असेल तर त्याची पचनशक्ती उत्तम असली पाहिजे.
35 वर्षांच्या दीर्घ कालावधीत विविध क्षमतांच्या संघटनांसाठी काम करतांना मला देशभरात प्रवास करावा लागला आणि मिळेल ते अन्न ग्रहण करावे लागले. मी कोणालाही माझ्यासाठी काही खास जेवण बनवायला सांगितले नाही.
मला खिचडी खूप आवडते. पण जे मिळेल ते मी खातो.
माझे आरोग्य हे माझ्या देशासाठी ओझे होऊ नये असे मला वाटते. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मला निरोगी राहायचे आहे”.
पंतप्रधानांच्या भूमिकेत गेल्यानंतर खूप जास्त प्रवास करावा लागतो आणि अनेक भोजन समारंभांना उपस्थित राहावे लागते. प्रत्येक भोजन समारंभांत स्थानिक शाकाहारी भोजन पंतप्रधानांना आवडते. मात्र मद्यार्कयुक्त पेयाऐवजी ते पाणी किंवा रस घेणे पसंत करतात.