जन धन, आधार आणि मोबाईलविषयीची दूरदृष्टी ही आगामी काळात अनेक उपक्रमांना मुलभूत ठरणार आहे. माझ्या मते जन धन, आधार आणि मोबाईल (जाम) म्हणजे जास्तीत जास्त बाबी साध्य करणे होय.
खर्च झालेल्या प्रत्येक पैशाचे कमाल मूल्य
-गरीबांचे व्यापक प्रमाणात सबलीकरण
-सामान्य जनतेमध्ये तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर.
-श्री नरेंद्र मोदी
स्वातंत्र्याच्या 67 वर्षानंतरही देशातील मोठ्या लोकसंख्येपर्यंत अजून बँकिंग सेवा पोहचल्या नव्हत्या याचा अर्थ असा की, त्यांच्याकडे बचतीसाठी काही नाही,किंवा त्यांना संस्थात्मक पतपुरवठा या बाबीची संधी मिळाली नाही. याच प्रमुख समस्या दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 ऑगस्ट रोजी पंतप्रधान जन धन योजनेचा शुभारंभ केला. अवघ्या काही महिन्यांतच या योजनेमुळे लाखो भारतीयांच्या आयुष्यात अमुलाग्र परिवर्तन घडून आले. वर्षभरात 19.72 कोटी बँक खाती उघडण्यात आली. 16.8 कोटी रुपे कार्डचे वितरण करण्यात आले. बँकांमध्ये रु. 28699.65 कोटींचे भांडवल जमा झाले. विक्रमी अशा 1,25, 697 बँक मित्रांची (बँक दूत) नियुक्ती करण्यात आली. एका आठवड्यात 1,80,96,130 बँक खाती उघडल्याच्या विक्रमाची गिनीज बुकात नोंद झाली आहे.
लाखो लोकांची बँक खाती उघडणे हे खरेच मोठे आव्हान होते, तसेच लोकांना बँकेत खाते उघडून बचतीची सवय लावणे हे आणखी मोठे आव्हान होते. शून्य जमा असलेल्या बँक खात्याच्या संख्येत काही प्रमाणात घट होताना दिसत आहे. सप्टेंबर 2014 मध्ये 76.8 टक्के असलेले प्रमाण डिसेंबर 2015 मध्ये 32.4 टक्क्यांवर आले. तसेच आतापर्यंत 131 कोटी रुपये ओव्हरड्राफ्टच्या रुपाने देण्यात आले आहेत.
हे सर्व शक्य झाले ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सामान्य लोकांना आणि सरकारी यंत्रणेला कामासाठी प्रवृत्त केले म्हणून. हे महाकाय कार्य एका मोहिमेसारखे हाती घेण्यात आले होते, शासन आणि जनता यांच्या भागीदारीमुळे हे यश साध्य झाले. बँक खाती उघडल्यामुळे लाखो भारतीयांना बँकिंग सेवेचा लाभ घेण्याची संधी मिळाली. तसेच यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला आळा बसला. आता, सरकारकडून मिळणारी अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा होते, त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. पहल योजना, थेट लाभ हस्तांतरणाची जगातील सर्वात मोठी योजना म्हणून या योजनेची नुकतीच गिनिज बुकात नोंद झाली. पहल योजनेअंतर्गत एलपीजी लाभधारकांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा केले जाते. 14.62 कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेमुळे 3.34 कोटी बनावट किंवा कार्यरत नसलेली खाती शोधण्यास यश मिळाले आहे, यामुळे हजारो कोटी रुपयांची बचत झाली आहे. सध्या सरकार 35-40 योजनांसाठी थेट लाभ हस्तांतरण प्रणाली वापरत आहे. 2015 मध्ये यामुळे लाभधारकांना सुमारे 40, 000 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.
सर्वसामान्य लोकांना बँकिंग सुविधा करुन देण्याबरोबरच, राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने नागरिकांना विमा आणि निवृत्तीवेतनासारख्या सुविधा पुरवण्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. प्रधान मंत्री सुरक्षा बीमा योजनेअंतर्गत प्रतिमाह केवळ 12 रुपये जमा करुन दोन लाख रुपयांचा अपघात विमा मिळवण्याची सुविधा आहे. अटल पेन्शन योजनेअंतर्गत तुमच्या योगदानावर आधारीत महिना रुपये 5,000 पर्यंत निवृत्तीवेतन मिळते. आतापर्यंत 9.2 कोटीपेक्षाही जास्त लोकांनी प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी नोंदणी केली आहे, तर सुमारे तीन कोटी लोक प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजनेतसहभागी झाले आहेत. तर सुमारे15.85 लाख लोकांनी अटल पेन्शन योजनेसाठी नोंदणी केली आहे.