स्वच्छ भारताच्या वाटेवर....
“महात्मा गांधींच्या 150 व्या जन्म शताब्दीनिमित्त स्वच्छ भारत हीच त्यांना योग्य आदरांजली ठरेल” असे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी राजपथ, नवी दिल्ली येथे 02ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात करताना म्हटले. स्वच्छ भारत अभियानाला देशव्यापी एका चळवळीचे स्वरुप देण्यात आले.
स्वच्छतेच्या या चळवळीचे नेतृत्व करताना जनतेने महात्मा गांधींचे स्वच्छ व निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण करावे, असे जनतेला आवाहन केले. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी स्वत: हाती झाडू घेऊन दिल्लीतील मंदीर मार्ग पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ केला. रस्त्यावर लोकांनी घाण करु नये व इतरांनाही त्यापासून परावृत्त करावे, असे आवाहन त्यांनी केले. जनतेला पंतप्रधानांनी “ ना गंदगी करेंगे, ना करने देंगे” चा मंत्र दिला. याप्रसंगी पंतप्रधानांनी नऊ व्यक्तींना स्वच्छता मोहिमेचे दूत म्हणून घोषीत केले तसेच या व्यक्तींना आणखी नऊ व्यक्तींना स्वच्छतेचे दूत बनवण्यास सांगितले.
जनतेच्या सहभागामुळे स्वच्छ भारत अभियानाचे रुपांतर एका राष्ट्रीय चळवळीत झाले. या अभियानामुळे लोकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे. लोकांच्या सक्रीय सहभागामुळे महात्मा गांधींचे स्वच्छ भारत हे स्वप्न लवकरच आकार घेण्याच्या मार्गावर आहे.
पंतप्रधानांनी स्वत:च्या उक्ती व कृतीतून जनतेला स्वच्छ भारत अभियानाचा संदेश दिला आहे. पंतप्रधानांनी वाराणसीमध्येही स्वच्छता मोहीम राबवली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत त्यांनी गंगा नदीच्या अस्सी घाटावर अभियानाची सुरुवात केली. स्थानिक लोक मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे सहभागीझाले. याप्रसंगी पंतप्रधानांनी स्वच्छतेची महती विशद करत देशातील अनेक कुटुंबांमध्ये शौचालये नसल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांविषयी प्रबोधन केले.
स्वच्छतेसाठीच्या या जनचळवळीमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोकांचा सहभाग होता. सरकारी कर्मचारी, लष्करी जवान, सिने कलाकार, खेळाडू, उद्योजक,अध्यात्मिक गुरू सर्वजण या कार्यासाठी पुढे सरसावले. स्वच्छता अभियासानासाठी देशभरात विभिन्न सरकारी विभाग, अशासकीय संस्था व स्थानिक समाज केंद्रांनीआयोजित केलेल्या उपक्रमात लाखो लोकांनी सहभाग घेतला. संगीत, नाट्य, पथनाट्याच्या माध्यमातून देशभरात स्वच्छेतीविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांपासून ते दूरचित्रवाणी कलाकारांपर्यंत, अनेक जण या उपक्रमात सहभागी झाले आहेत. अमिताभ बच्चन, आमीर खान, कैलाश खेर, प्रियांका चोप्रा तसंच सब टीव्ही च्या “तारक मेहता का उलटा चष्मा” या दूरचित्रवाणी मालिकेतील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ या उपक्रमाला हातभार लावत आहेत. सचिन तेंडुलकर, सानिया मिर्झा, सायना नेहवाल आणि मेरी कोम यांसह अनेक विख्यात क्रिडापटूंचा “स्वच्छ भारत” उपक्रमातील योगदान प्रशंसनीय आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर महिन्याला आपल्या “मन की बात” या आकाशवाणी वरुन साधलेल्या संवादातून स्वच्छ भारत अभियान यशस्वी होण्यासाठी, देशभरातील वैयक्तिक तसंच विविध संस्थाच्या प्रयत्नांचे नेहमीच कौतुक केले आहे. मध्य प्रदेशातल्या हरदा जिल्ह्यातल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या एका दलाने स्वच्छ भारत अभियानात बजावलेल्या भूमिकेबद्दल पंतप्रधानांनी अभिनंदन केले होते, तसंच टाकाऊ पदार्थांच्या खरेदी-विक्री साठी मोबाईल ॲप विकसित करणाऱ्या बंगळुरु मधल्या न्यू होरायझन स्कूल शाळेतल्या विद्यार्थ्यांचंही पंतप्रधानांनी कौतुक केलं होतं.
आय सी आय सी आय बँक, पंजाब नॅशनल बँक, एक्स एल आर आय जमशेदपूर आणि आय आय एम बंगळुरु यांनी सर्वसामान्य जनतेत जनजागृती करण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता मोहिमा राबवल्या.
स्वच्छ भारत अभियानात लोकांचा सहभाग, विविध विभाग, संघटनांनी राबवलेले उपक्रम याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसोद्गार काढले. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीसमाज माध्यमातून (सोशल मिडियाच्या) माध्यमातून लोक सहभागाबद्दल नेहमीच प्रशंसा करत आले आहेत. स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून ‘#MyCleanIndia’ हा उपक्रम समाजमाध्यमांवर(सोशल मिडियावर) सुरू करण्यात आला.
लोकांच्या प्रतिसादामुळे स्वच्छ भारत अभियानला जनचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. लोकांनी उत्स्फूर्त सक्रीय सहभाग नोंदवत स्वच्छ व निटनेटक्या भारताची शपथ घेतली.
रस्ते साफ करणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, शौचालयांची स्वच्छता व निरोगी वातावरण यासाठी हाती झाडू घेणे हा स्वच्छ भारत अभियानाचा भागच बनला आहे. लोकांनी ही चळवळ पुढे नेत “ईश्वराचे दुसरे रुप म्हणजे स्वच्छता” हया संदेशाच्या प्रसारात मदत केली आहे.
शहरी भागातील स्वच्छ भारत अभियानात वैयक्तिक स्वच्छतागृहे, सार्वजनिक स्वच्छतागृहे, तसंच घन कचरा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. ग्रामीण भागात वर्तणूक बदलावर भर देण्यात आला असून, ग्रामपंचायत पातळीपर्यंत लोकांशी संपर्क साधणे, कडक अंमलबजावणी यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. स्थानिक संस्कृती, रिती-परंपरा, मागणी लक्षात घेऊन राज्यांना आखणी करण्याची लवचिकता देण्यात आली आहे. स्वच्छतागृह बांधण्यासाठी देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन निधीत दोन हजार रुपयांनी वाढ करण्यात आली असून आता हा निधी दहा हजारावरुन बारा हजार रुपये करण्यात आला आहे. तसंच धन आणि द्रव कचरा व्यवस्थापनासाठी ग्राम पंचायतींसाठी निधी देण्यात आला आहे.