मोदी कुर्ता स्टाईल आवडणारे आणि त्याप्रकारचा कुर्ता वापरणाऱ्या लोकांची संख्या फार मोठी आहे. मात्र, या “ स्टाईल स्टेटमेंट” मागची कथा फारच साधी आहे.
मोदी कुर्त्याच्या उगमाबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणतात :
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षासोबत माझे कार्य म्हणजे भरपूर प्रवासाबरोबरच अनिश्चित आणि त्रासदायक वेळापत्रक या स्वरुपाचे राहिले आहेआणि स्वत:चे कपडे स्वत: धुणाऱ्या कोणत्याही व्यक्तीप्रमाणे मला जाणवले की, पूर्ण बाह्यांचा कुर्ता धुणे ही वेळखाऊ गोष्ट आहे, त्यामुळे मी माझ्या कुर्त्याच्या बाह्या कापून अर्ध्या करायचे ठरवले”
अशाप्रकारे मोदी कुर्ता अस्तित्वात आला.
काळ लोटला आणि अलिकडच्या काही वर्षांमध्ये मोदी कुर्ता जगभर प्रसिध्द झाला. मोदी मुखवटे, टोप्या, टी-शर्ट, चिन्ह आणि चॉकलेटस् सुध्दा बाजारात आले. मात्र ताज्या, रंगीत, साध्या आणि तरीही मोहक मोदी कुर्त्यासारखी लोकप्रियता अन्य कोणत्याही उत्पादनाला मिळाली नाही.