PM Modi distributes aids and assistive devices to Divyang at Navsari, Gujarat
Time for phrases like 'Chalta Hai' is history; the world has expectations from India and we cannot let this opportunity go: PM
Accessible India Campaign is aimed at focusing attention on areas where we may not have devoted much attention before: PM

जगाच्या नकाशावर आज नवसारीने आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. नवसारीला लाख-लाख शुभेच्छा…. तुम्ही आज तीन विक्रम तोडले आहेत आणि मागचे जे जागतिक विक्रम होते त्यापासून तुम्ही इतकी लांब उडी घेतली आहे की हे विक्रम तोडणे अवघड होऊन जाईल आणि तेही दिव्यांग खेळाडूंच्या विक्रमांच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्यांच्या या कामगिरीने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

तसे पाहायला गेले तर आमचे हे नवसारी ग्रंथ तीर्थ बनले आहे. पुस्तकप्रेमी म्हणून ओळख असलेले हे ठिकाण आज दिव्यांगजनांच्या संवेदनेचे मुकुटमणी बनले आहे. सरकारच्या कार्यक्रमासोबतच आज तुम्ही नवसारीची आणि गुजरातची ओळख संपूर्ण भारताला करून देण्याचे कार्य केले आहे. काल रात्री मी टीव्हीवर बातम्या पाहात होतो की इथले अनेक दुकानदार दिव्यांग बालकांना जे काही हवे ते मोफत देत होते. आज या ठिकाणी ज्या दिव्यांग व्यक्तींची कुटुंबे आहेत अशा 67 कुटुंबांना गोमातेचे दान देण्यात आले. या ठिकाणी वीस हजार लोकांची यादी देण्यात आली ज्यांनी कोणत्या तरी एका दिव्यांग व्यक्तीला दत्तक घेण्याची घोषणा केली आहे आणि त्यांची पूर्ण जबाबदारी स्वीकारलेली आहे. या ठिकाणी मला 67 लाख रुपयांचा चेक देण्यात आला. हे 67 लाख रुपये मी एका ट्रस्टला दिले आणि हे 67 लाख रुपये दिव्यांगांच्या कौशल्य विकासासाठी खर्च करण्यात येणार आहेत. एखादा कार्यक्रम जर संपूर्ण समाजाच्या भावनांना जागृत करत असेल तर प्रत्येक व्यक्तीमध्ये ही भावना निर्माण व्हावी ही आपली जबाबदारी आहे. जेव्हा असे वातावरण समाजात निर्माण होते तेव्हा कोणतीही समस्या उरत नाही. प्रत्येक समस्येवर आपोआप तोडगा निघत जातो. मित्रांनो मी अतिशय भाग्यवान माणूस आहे. मी आताच या ठिकाणी या विभागाच्या लोकांना विचारत होतो, आमच्या मंत्र्यांना विचारत होतो की यापूर्वी कधी एखाद्या पंतप्रधानांना अशा कार्यक्रमात येण्याची संधी मिळाली होती का ? त्यांनी सांगितले नाही, आता मला सांगा मी भाग्यवान आहे की नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली. डझनापेक्षा जास्त पंतप्रधान होऊन गेले. पण मी पहिला पंतप्रधान आहे ज्याला दिव्यांगजनांच्या सेवेचे भाग्य लाभले आहे. ब-याच वेळा अनेक गोष्टी आपल्या समोर असतात, आपण रोज त्यांना पाहत असतो. पण कधी आपल्यासाठी ती प्राधान्याची बाब नसते तर कधी आपल्या संवेदना मर्यादित असतात. परिणामतः आपली त्यांच्याविषयीची जी प्रतिक्रिया असते ती अतिशय सामान्य असते. हो हो ठीक आहे बाबा… भारतासारख्या देशामध्ये आता होत आहे, चालते, बघू हा काळ आता संपला. जग भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे… भारताच्या ज्या अपार क्षमता आहेत त्याकडे संपूर्ण जग आकर्षित झाले आहे. अशा वेळी सव्वाशे कोटी देशवासीयांनी देखील या संधीचा फायदा घेण्याच्या तयारीत राहिले पाहिजे. या ठिकाणी कोणीही व्यक्ती अशी नसेल, संपूर्ण नवसारीत कोणी असे नसेल ज्याला अस्वच्छता आवडत असेल. कोणालाही अस्वच्छता आवडत नाही, पण स्वच्छतेची चळवळ उभारण्याची इच्छा कोणाला झाली? आज देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा भारताच्या संसदेत अनेक तास स्वच्छतेवर चर्चा झाली. भारतातील टीव्ही वाहिन्या स्वच्छतेविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करू लागल्या.

बंधु भगिनींनो ही एक अशी गोष्ट आहे ज्याविषयी आपण उदासीन राहतो. आपण मुळापासूनच अस्वच्छ आहोत, असे नाही. पण होत आहे, चालेल या वृत्तीमुळे सर्व काही आहे तसे सुरू राहू देतो आणि आज घरामध्ये एखादे लहान बालक जरी असेल तरी ते देखील त्याच्या आजोबांना सांगते की आजोबा इथे टाकू नका. मोदी आजोबांनी सांगितले आहे ना. हा अनुभव प्रत्येक कुटुंबाला येत आहे.

बंधु-भगिनींनो सामाजिक क्रांतीमध्ये हे बीज वटवृक्षाच्या रूपात समोर येत आहे आणि म्हणूनच पूर्वी सुद्धा घरे बनत होती आणि पूर्वी देखील शौचालये तयार होत होती, कार्यालये तयार होती. पूर्वी सुद्धा अतिशय चांगल्या रचनांच्या वास्तुरचनांची निर्मिती व्हायची. जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारची शौचालये हवीत. या गोष्टी कोणाला माहिती नव्हत्या असे नव्हते. रेल्वे पूर्वी देखील धावत असायच्या पण रेल्वेमध्ये असा विचार कोणीच का केला नाही की दिव्यांगजन असतील तर त्यांच्यासाठी डब्यात काही सोय करण्यात आली आहे का? आम्ही सुगम्य भारत नावाचे अभियान राबवण्यास सुरुवात केली आणि जेव्हा सरकारमध्ये बसलेल्या लोकांमध्ये ओतप्रोत संवेदनशीलता भरलेली असेल, प्रत्येक घटनेविषयी जागरुकता असेल तेव्हा समस्यांचे निराकरण करण्याचे मार्ग देखील आपोआप सापडू लागतात. हा विभाग ब-याच काळापासून कार्यरत आहे.1992 पासून तिचाकी आणि हे सर्व सुरू राहिले आहे. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की आमचे सरकार येण्याच्या आधी या देशात जेवढी सरकारे स्थापन झाली त्यांच्या काळात केवळ 57 शिबिरांचे आयोजन झाले आणि बंधुंनो आज या दोन वर्षात 4000 पेक्षा जास्त शिबिरांचे आयोजन करण्यात आले आणि हजारो दिव्यांग बंधु-भगिनींपर्यंत पोहोचण्याचा एक ठाम प्रयत्न करण्यात आला. पूर्वीच्या सरकारांमध्ये या सर्व विभागांमध्ये एखाद्या अधिकाऱ्‍याची बदली झाली तर बाकी अधिका-यांना वाटायचे की अधिका-याचे तर अवमूल्यन झाले. कोणत्याही पंतप्रधानाला या विभागाची बैठक आयोजित करायची जणु काही संधीच मिळाली नव्हती.

दिल्लीमध्ये असे संवेदनशील सरकार आहे जे या विभागाला महत्त्व देत आहे आणि आमच्या अतिशय चांगल्या अधिकाऱ्‍यांना या विभागामध्ये आणले गेले आहे याचा हा परिणाम झाला की हा विभाग अतिशय जलदगतीने काम करू लागला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहात असाल की या भगिनी ज्या ऐकू शकत नाहीत त्यांच्यासाठी माझे भाषण विविध हावभावांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवले जात आहे. आपल्याला ते काय आहे ते समजत नाही कारण या भाषेचे ज्ञान आपल्याला नाही आहे. पण तुम्हीच मला सांगा जर अचानक कोणी तामिळ भाषक व्यक्ती जर तुम्हाला भेटली आणि तमिळ भाषेमध्ये तुमच्याशी बोलू लागली तर तुम्ही काय कराल? तुम्हाला कळणारच नाही ती व्यक्ती काय बोलते आहे ते. ज्या प्रकारे इतर भाषा समजण्यात अडचणी येतात आणि मित्रांनो तुम्हाला हे ऐकून दुःख वाटेल की संपूर्ण देशात ही खुणांची भाषा देखील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांनी शिकवली जाते. अनेक वेळा जे बोलू शकत नाहीत अशा दोन व्यक्तींना बोलायचे असेल तर एकाची खूण एक असेल तर दुस-याची खूण वेगळी असेल. या सरकारला याची चिंता वाटली. संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय मापदंड असलेली खुणांची प्रणाली विकसित केली पाहिजे. आपल्या सर्व शिक्षकांसाठी एक सामायिक अभ्यासक्रम तयार केला पाहिजे. जेणेकरून आपले मूल जगात कोणत्याही ठिकाणी गेले तर त्याला त्या खुणांच्या साहाय्याने बोलता आले पाहिजे. खुणांच्या सामायिक भाषेसाठी आम्ही कायदा तयार केला आहे आणि मोठ्या प्रमाणावर त्याचे काम सुरू आहे. अनेकदा अनेक बातम्या मोठ्या असतात आणि अशा गोष्टी लक्षात येतच नाहीत पण अशा कुटुंबांसाठी या गोष्टी नव्या आशा निर्माण करतात. स्वच्छतेचा मुद्दा असो किंवा दिव्यांगांचा असो, बंधु भगिनींनो समाजातील जे उपेक्षित काम आहे, उपेक्षित वर्ग आहेत ज्यांच्यासाठी प्रत्येक स्तरावर संवेदनशीलतेची आवश्यकता आहे आणि मला हा विश्वास आहे की दिल्लीमध्ये जो विडा मी उचलला आहे येणा-या काळात राज्यांमध्ये, महानगरांमध्ये, महानगरपालिकांमध्ये ही एक नेहमीची सवय बनेल आणि दिव्यांगांचा विचार करून घरांची रचना केली जाईल, सरकारी कार्यालयांमध्येही हे काम होईल.

सध्या रेल्वेमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर काम सुरू केले आहे आणि जेव्हा एखादी दिव्यांग व्यक्ती या सुविधा पाहते आणि आपल्यासाठी देखील काही सोय आहे, हा विचार त्या व्यक्तीच्या मनात आल्यावर तिला अतिशय समाधान वाटते आणि आपण एकटे नाही आहोत, संपूर्ण देश माझ्या सोबत आहे हा आत्मविश्वास त्या व्यक्तीच्या मनात तयार होतो. हा जो आत्मविश्वास आहे तो देशाचे सामर्थ्य बनेल आणि म्हणूनच तुम्ही आता जो दिव्यांग शब्द ऐकत आहात, मित्रांनो हा शब्द मी शब्दकोषातून शोधलेला नाही. मी समाजाची मानसिकता बदलण्याच्या दिशेने कार्य करत आहे. जेव्हा आपण एखाद्याला अपंग म्हणतो तेव्हा आपले लक्ष त्याच्या शरीराच्या कोणत्या ना कोणत्या भागात काही दोष असल्यास त्याकडे जाते. त्यांच्यात जे अमाप सामर्थ्य आहे त्याकडे आपले लक्ष जात नाही आणि म्हणून मी सांगितले की सरकारने अपंग यांसारख्या शब्दांतून बाहेर यावे आणि कदाचित त्यांच्याकडे एखादा अवयव नाही आहे पण बाकी सर्व अवयवांची ताकद दिव्यांगाइतकी आहे आणि त्यांच्यामध्ये ही भावना निर्माण होते आणि मला दिव्यांगजनांचे जे आशीर्वाद मिळाले आहेत, असंख्य आशीर्वाद… आता ज्या कुटुंबांमध्ये दिव्यांगांचा जन्म झाला असेल त्या कुटुंबांना जितक्या शुभेच्छा मिळाल्या असतील तितक्या शुभेच्छा मलाही दिल्या असतील. अनेकदा ज्यांच्या बाबतीत आपण उदासीन असतो तेच आपले नाव मोठे करतात.

काही दिवसांपूर्वी ऑलिंपिक स्पर्धा झाल्या. त्यावेळी देशाचे नाव मोठे केले ते या देशाच्या लेकींनी. बाकी आपण तर त्यांच्या बाबतीत, घरी बसा शिकून काय करायचे आहे या अविर्भावात असतो ही भावना एकीकडे आणि दुसरीकडे आपल्या लेकींनी देशाचे नाव ज्या प्रकारे उज्वल केले आहे ते पाहता आपल्याला हा दृष्टिकोन बदलावा लागेल. मुलगा-मुलगी एकसमान आहेत हे सिद्ध करण्याचे काम प्रबोधनाद्वारे असो वा सरकारी नियमांनी असो किंवा लाखो-करोडो रुपये खर्च करून जसे होईल त्यापेक्षाही उत्तम काम ऑलिंपिकमध्ये आमच्या मुलींनी करून दाखवले. अशाच प्रकारे दिव्यांग लोकांना समजून आणि त्यांची क्षमता ओळखण्यासाठी आपण किती काळ घेणार आहोत हे आपल्याला सांगता येणार नाही. पण आताच्या पॅराऑलिंपिकमध्ये 19 खेळाडूंचा संघ गेला होता आणि त्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आणि पदके जिंकून आले तेव्हा देशाला जाणीव झाली की दिव्यांगांचे सामर्थ्य किती असते. त्यांच्या या कामगिरीमुळे समाजातील या एका वर्गासाठी जाणीव निर्माण झाली आहे आणि दयाभाव नाही. कोणत्याही दिव्यांगाला दयाभाव नको आहे. त्यांना स्वाभिमानाने जीवन जगायचे आहे. ते गरीब बिच्चारे नाहीत. आपल्यापेक्षा दुप्पट क्षमता, दुप्प्ट आत्मविश्वास त्यांच्यात आहे. मात्र, त्यांना बरोबरीचे व्यवहार हवे आहेत आणि यासाठीच समाजजीवनातील समस्यांचे निराकरण कसे होणार? एक काळ होता जेव्हा खासदारांना गॅसची 25 कूपन मिळत असत. ती यासाठी होती की जर तुमच्या जवळपासच्या भागातील कोणाला गॅसचे कनेक्शन हवे असेल आणि तुम्ही खासदार असाल तर तुम्ही ते द्याल आणि लोक तुमची वाहवा करतील. या देशात एक काळ असा होता की आणखी थोडी वर्षे आधी खासदारांना गॅसची 25 कूपने मिळायची आणि ती मिळवण्यासाठी लोकांना त्यांच्या मागे-मागे फिरावं लागायचे. “साहेब मुले मोठी झाली आहेत, त्यांची लग्ने करायची आहेत तेव्हा जरा गॅसचे कनेक्शन मिळाले तर त्याचा साखरपुडा होऊ शकेल.” अशी परिस्थिती होती गॅस कनेक्शनची. गॅसचे कनेक्शन मिळवायला शिफारस लागायची. काळा बाजार व्हायचा अशी स्थिती होती.

बंधु भगिनींनो आम्ही उज्वला योजना आणली आणि असे ठरवले की, ज्या माझ्या गरीब माता कोळशाच्या चुलीवर स्वयंपाक करतात, ज्यांच्या शरीरात दररोज 400 सिगारेटच्या धुराइतका धूर प्रवेश करतो आणि विचार करा अशा मातेच्या तब्येतीची स्थिती काय होत असेल. त्या घरात जी लहान-लहान बालके असतील त्यांची परिस्थिती काय असेल. एका संवेदनशील सरकारने हा निर्धार केला की, तीन वर्षांच्या आत पाच कोटी गरीब कुटुंबाना स्वयंपाकाच्या गॅसचे कनेक्शन उपलब्ध करून द्यायचे आणि पाच कोटी गरीब माता भगिनींच्या आरोग्याची काळजी घ्यायची, गरिबांच्या कुटुंबांची चिंता करायची. समाजातील दलित, पीडित, शोषित वर्गाच्या बाबतीत एखादे संवेदनशील सरकार कशा प्रकारे गांभीर्याने काम करते त्याचे उदाहरण सध्या जे सरकार सत्तेवर आले आहे त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बंधु-भगिनींनो हे सर्व शक्य होत आहे कारण या देशाच्या “प्रधानसेवक” पंतप्रधानाचा स्तर तुम्ही लोकांनी उंचावला आहे, तुम्ही लोकांनी मला मोठे केले आहे. माझ्यातल्या उणीवा दूर करण्यासाठी गुजरातच्या लोकांनी जागरुक प्रयास केला आहे. मला गुजरातने बरेच काही शिकवले आहे. ही मानवतेची भावना, हे संस्कार मला या भूमीने दिले आहेत आणि म्हणूनच बंधु भगिनींनो या ठिकाणी जेव्हा माझ्या वाढदिवसाची चर्चा होत आहे तेव्हा मी तुम्हाला माझे मस्तक झुकवून प्रणाम करतो, की तुम्ही मला इतके सर्वकाही दिले आहे. तुम्ही माझ्यावर जे संस्कार केले आहेत ते संस्कार मी दिल्लीमध्ये असेन किंवा जगातील कोणत्याही व्यक्तीसोबत असेन त्या वेळीही कायम टिकवेन. ती जबाबदारी माझी आहे. तुम्ही जी माझी जडणघडण केली आहे त्यानुसार मी सव्वाशे कोटी देशवासीयांसाठी माझे जीवन समर्पित करत आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की तुमचे आशीर्वाद माझ्या सोबत आहेत, दिव्यांगजनांचे आशीर्वाद माझ्या सोबत आहेत, कोट्यवधी माता जेव्हा गॅसची शेगडी पेटवतात तेव्हा पहिल्यांदा मला आशीर्वाद देतात. बंधु-भगिनींनो हे काम कठीण आहे, पण कठीण कामेच तर आम्हाला मिळतात, काय खरे आहे ना… आणि अवघड कामे करण्यासाठीच तुम्ही मला निवडून दिले आहे यासाठी मी तुमचा आभारी आहे. अनेक क्षेत्रांमध्ये गुजरातने खूप चांगले काम केले आहे. विकासाची नवी शिखरे सर केली आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की, गुजरातच्या प्रत्येक नागरिकाचा विश्वास, गुजरातची सामूहिक शक्ती संपूर्ण भारताच्या भवितव्यासाठी एक उत्प्रेरक म्हणून काम करेल आणि गुजरात नवी उंची गाठत राहिल. काही दिवसांपूर्वीच मी फिजीमध्ये गेलो होतो. तुमच्यापैकी ब-याच जणांना हे माहितही नसेल पण नवसारीचे बरेच लोक फिजीला जाऊन आले आहेत. या ठिकाणी माझे एक मित्र वेणीभाई परमार होते त्यांचे नातेवाईक सुद्धा फिजीला राहत होते. यावेळी मी फिजीला गेलो तेव्हा त्यांच्या विमानतळावरून बाहेर पडल्याबरोबर मी एका गावाचे नाव वाचले. त्या गावाचे नाव होते नवसारी. याचे कारण म्हणजे अनेक वर्षांपूर्वी नवसारीचे लोक फिजीमध्ये गेले असतील आणि त्यांची आठवण आज देखील तिथे टिकून आहे, ज्यामुळे फिजीच्या लोकांना नवसारी माहित आहे. आपल्या इथले एक महोदय तिथल्या संसदेचे सभापती होते.

बंधु भगिनींनो नवसारीची एक वेगळी ओळख आहे, एक वेगळी ताकद आहे आणि इथले लोक उत्साही आहेत आणि अशा या नवसारीच्या निमंत्रणामुळे मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली. अनेक विक्रमांमुळे आपण एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. मी तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा देत आहे.

धन्यवाद मित्रांनो….