President Ashraf Ghani of Afghanistan speaks to PM Modi, condemns Uri attack
Afghanistan President Ashraf Ghani conveys solidarity and support with India against all actions to eliminate the threat of terrorism

अफगाणिस्तानचे राष्ट्रपति डॉ. मोहम्मद अशरफ घानी यांनी पंतप्रधानांना दूरध्वनी करुन जम्मू आणि काश्मीरच्या उरी येथील दहशतवादी हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला.

राष्ट्रपति घानी यांनी सीमेवरील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी अफगाणिस्तान भारताच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

शहीद जवानांच्या कुटुंबियांप्रति राष्ट्रपती घानी यांनी शोकभावना व्यक्त केल्या.

अफगाणिस्तानच्या पाठिंब्यासाठी पंतप्रधानांनी राष्ट्रपती घानी यांचे आभार मानले.