अ.क्र.

करार/सामंजस्य करार

माहिती

1.

भारत आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीसाठी करार

ऑगस्ट 2015 आणि फेब्रुवारी 2016मधील उच्च स्तरीय संयुक्त निवेदनात मंजूर झालेल्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अंतर्गत निवड केलेल्या द्विपक्षीय सहकार्याच्या क्षेत्रांना या कराराच्या आराखड्यात अधोरेखित करण्यात आले आहे.

2.

संरक्षण उद्योग क्षेत्रातील सहकार्यासाठी भारताच्या संरक्षण मंत्रालय आणि संयुक्त अरब अमिरातीच्या संरक्षण मंत्रालयादरम्यान सामंजस्य करार

उभय देशातील सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील संस्थांदरम्यान शिक्षण, संशोधन, विकास, नाविन्य आणि सहकार्याच्या माध्यमातून संरक्षण उत्पादन आणि तंत्रज्ञान  हस्तांतरण क्षेत्रात सहकार्य स्थापन करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे.

3.

सागरी वाहतुकीतील संस्थात्मक सहकार्यासाठी भारत आणि संयुक्त अरब अमिराती सरकारमध्ये सामंजस्य करार

सागरी वाहतूक सोयींच्या माध्यमातून द्विपक्षीय सागरी व्यापार वृध्दींगत करण्याचा आराखडा तसेच नौका अदानप्रदानाचा समावेश या सामंजस्य करारात तयार करण्यात आला आहे.

4.

STCW78 आणि सुधारणांच्या तरतुदींनुसार स्पर्धात्मक प्रमाणपत्राच्या परस्पर मान्यतेसाठी भारतीय नौवहन महासंचालनालय आणि संयुक्त अरब अमिरातीच्या रस्ते वाहतूक आणि सागरी वाहतूक प्राधिकरणादरम्यान सामंजस्य करार

सागरी अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांच्या स्पर्धात्मक प्रमाणपत्राच्या परस्पर मान्यता प्रस्थापित करून सागरी आर्थिक व्यवहार दृढ करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे.

5.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यासाठी भारताच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि संयुक्त अरब अमिरातीच्या रस्ते वाहतूक आणि सागरी वाहतूक प्राधिकरणादरम्यान सामंजस्य करार

मालवाहतूक, गोदाम आणि मूल्यवर्धित सेवांमधील तंत्रज्ञान, प्रणाली आणि सर्वोत्तम व्यवहारांच्या आदान प्रदानाच्या माध्यमातून महामार्ग आणि रस्ते वाहतूक क्षेत्रात सहकार्य प्रस्थापित करणे हे या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आहे.

6.

मानवी तस्करीला आळा घालण्यासाठी तसेच त्याविरुद्धच्या लढाईतील सहकार्यासाठी भारत आणि संयुक्त अरब अमिराती सरकार दरम्यान सामंजस्य करार

मानवी तस्करी विशेषत: महिला आणि मुलांच्या तस्करीला आळा घालणे आणि त्यांना संरक्षण प्रदान करणे हे या कराराचे उद्दिष्ट आहे.

7.

लघू आणि मध्यम उद्योग तसेच नाविन्य या क्षेत्रातील सहकार्याकरीता संयुक्त अरब आमिरातीचे अर्थ मंत्रालय आणि भारताच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयादरम्यान सामंजस्य करार

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील संयुक्त प्रकल्प, संशोधन आणि विकास तसेच संबंधित मुद्यातील सहकार्याला हा सामंजस्य करार प्रोत्साहन देईल.

8.

कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये भारताच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि संयुक्त अरब आमिरातीच्या हवामान बदल आणि वातावरण मंत्रालयादरम्यान सामंजस्य करार

मशागत पध्दतींमधील तंत्रज्ञानाचे आदान प्रदान आणि अन्न प्रक्रियेमधील सहकार्य वृध्दींगत करून द्विपक्षीय हिताच्या विविध कृषी क्षेत्रातील सहकार्य विकसित करण्याचा आराखडा हा सामंजस्य करार प्रदान करेल.

9.

राजपत्रित, विशेष आणि अधिकारिक पारपत्रधारकांना व्हिसामध्ये परस्पर सूट मिळण्यासाठी भारत आणि संयुक्त अरब अमिराती सरकार दरम्यान सामंजस्य करार

या करारामुळे राजपत्रित, विशेष आणि अधिकारिक पारपत्र धारकांना उभय देशात व्हिसा मुक्त प्रवास करणे शक्य होईल.

10.

कार्यक्रमांच्या देवाणघेवाणीकरिता भारताचे प्रसार भारती आणि संयुक्त अरब अमिरातीच्या वृत्त संस्था (WAM)दरम्यान सामंजस्य करार

प्रसारण, कार्यक्रमांची परस्पर देवाण घेवाण, बातम्या आणि आणि सर्वोत्तम व्यवहार या क्षेत्रातील सहकार्याच्या माध्यमातून प्रसार भारतीय आणि अमिराती वृत्त संस्था (WAM) यामधील संबंध या करारामुळे दृढ होतील.

11.

द्विपक्षीय हिताच्या क्षेत्रामधील सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी व्यापार प्रतिबंधक उपाययोजनांसाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय भारत सरकार आणि अर्थमंत्रालय, संयुक्त अरब आमिरातीदरम्यान सामंजस्य करार

व्यापार प्रतिबंधक उपाय योजनांसंदर्भातील परस्पर हिताच्या क्षेत्रामध्ये माहिती, क्षमता वृध्दी, चर्चासत्र आणि प्रशिक्षण कार्यक्रमांची देवाणघेवाण करणे हे या कराराचे उद्दिष्ट आहे.

12.

तेल साठवणूक आणि व्यवस्थापनासंदर्भात इंडियन स्ट्रेटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हस लिमिटेड आणि अबू धाबी नॅशनल ऑईल कंपनी दरम्यान करार

अबू धाबी नॅशनल ऑईल कंपनीद्वारा भारतात कच्च्या तेलाच्या साठवणुकीसाठी आणि उभय देशांमध्ये ऊर्जा क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारीला बळकटी प्रदान करणे हे या कराराचे उद्दिष्ट आहे.

13.

नॅशनल प्रोडक्टिव्हीटी कॉन्सिल आणि अल एतिहाद एनर्जी सर्व्हिसेस कं. LLC दरम्यान सामंजस्य करार

हा सामंजस्य करार ऊर्जा क्षमता सेवेतील सहकार्यासाठी करण्यात आला आहे.

14.

राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय, भारत आणि नॅशनल इलेक्ट्रॉनिक सेक्युरिटी प्राधिकरण, संयुक्त अरब आमिराती दरम्यान सामंजस्य करार

सायबर स्पेस क्षेत्रातील तंत्रज्ञान विकास आणि सहकार्यासाठी हा सामंजस्य करार