टोयॉटो कंपनीचे अध्यक्ष, अकिओ टोयाडा आणि सुझुकीचे प्रमुख ओ सुझूकी यांनी आज पंतप्रधानांची भेट घेतली.
टोयॉटो आणि सुझूकी व्यवसाय भागिदारी आणि भविष्यातील तंत्रज्ञानविषयक विकास यावर यावेळी चर्चा झाली. या भागिदारीमुळे टोयॉटो तंत्रज्ञान आणि निर्मिती याबाबत जागतिक स्तरावर असलेली आघाडी आणि सुझूकीची कार निर्मितीमधील ताकद यांचा विशेषत: भारतात मेळ साधला जाईल, अशी अपेक्षा यामुळे नवीन विकसित तंत्रज्ञान भारताला वापरता येईल, अशी अपेक्षा आहे. याखेरीज या तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेल्या भागाच्या स्थानिक निर्मितीलाही चालना मिळू शकेल.
ही भागिदारी “मेक इन इंडिया”ला चालना देईल आणि रोजगार निर्मितीत योगदान देईल. यामुळे भारतातून कारविषयक नव्या तंत्रज्ञानाच्या निर्यातीलाही वाव मिळेल.