Mr. Jacques Audibert, Diplomatic Advisor to the French President meets Prime Minister Modi

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे राजनैतिक सल्लागार जॅक्स ऑडिबर्ट यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

यावेळी पंतप्रधानांनी 2015 मध्ये फ्रान्सला दिलेल्या भेटीच्या तसेच 2016 मध्ये प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्राध्यक्ष होलांदे यांनी दिलेल्या भारत भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. या परस्पर दौऱ्यांमुळे द्विपक्षीय संबंध दृढ झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

संरक्षण, अंतराळ आणि नागरी अणु सहकार्याबरोबरच विविध क्षेत्रात विशेषत: सागरी सुरक्षा, पुनर्नवीकरणीय ऊर्जा आणि दहशतवादाविरोधी उपाय यात विस्तारले असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

हवामान बदला विरोधातील जागतिक प्रयत्नात आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना हे महत्वाचे यश असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या उपक्रमाला फ्रान्स देत असलेल्या पाठिंब्याचे पंतप्रधानांनी कौतुक केले.

स्मार्ट सिटीज्‌, शहर वाहतूक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य अधिक वाढविण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.