बेटांच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी उच्चस्तरीय बैठक झाली.
पंतप्रधानांना सर्वांगीण विकासाच्या व्हिजनचे सादरीकरण करण्यात आले, यात नीती आयोग, गृह मंत्रालय आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडील सूचनांचा समावेश होता.
भारतात एकूण 1382 बेटं आहेत, यापैकी 26 बेटांचा सुरुवातीला सर्वांगीण विकास केला जाईल. ही 26 बेटे भारताच्या सागरी किनाऱ्याच्या विविध भागात आहेत, तर काही अंदमान आणि लक्षद्वीपमध्ये आहेत. मूलभूत पायाभूत सुविधा, पर्यटन, कृषी (सेंद्रीय शेती आणि मत्स्योद्योग) आणि कार्बन-न्यूट्रल ऊर्जा निर्मिती याबाबींभोवती विकास कार्यात भर दिला जाईल, असे अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना सांगितले.
भारतातील बेटांच्या धोरणात्मक महत्त्वावर भर देताना, पंतप्रधानांनी या क्षेत्रात पर्यटनाच्या संधी शोधण्यावर भर दिला. अधिकाऱ्यांना बेटांच्या विकासासाठी वेगाने योजना आखण्याचे आवाहन करत पंतप्रधान म्हणाले की, यामध्ये सौर ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर व्हायला हवा.