First responsibility of the government must be to work for poor, marginalized & underprivileged but sadly, SP isn’t doing so: Shri Modi
PM attacks SP government, says schools in UP do not have teachers in adequate number
Our Government is committed to welfare of farmers in UP, says Shri Narendra Modi
SP, BSP, Congress favouring each other in some way or the other in these elections, alleges PM Modi
For Uttar Pradesh's growth & development, BJP is the only ray of hope, says Prime Minister Modi

उत्तरप्रदेशमधील कन्नोज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठ्या जनसभेला संबोधित केले. उत्तरप्रदेश मधील लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि हा उत्साह स्पष्टपणे दर्शवत आहे की वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत, असे मोदी यांनी यावेळी नमूद केले.

एकाचवेळी 104 उपग्रह प्रक्षेपित केल्याबद्दल मोदींनी इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, वैज्ञानिकांच्या या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.

गरीब, दुर्लक्षित आणि वंचित लोकांसाठी कामं करणे ही सरकारची पहिली जबाबदारी आहे, असे पंतप्रधान म्हणाले. सरकारने गरीब लोकांसाठी अन्नधान्य उपलब्ध करुन दिले आहे. परंतु ते उपलब्ध अन्नधान्य गरीबांपर्यंत पोहचवण्याची दानत उत्तरप्रदेश सरकारकडे नाही. उत्तरप्रदेश मधील सरकार हे गरीब विरोधी आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे, असे ते पुढे म्हणाले.

उत्तरप्रदेशमधील कमी दर्जाच्या शिक्षण प्रणाली बाबत चिंता व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की, उत्तर प्रदेशमधील शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे. अशा प्रकारे भारतातील गरीब सक्षम होणार आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

त्यांच्या सरकारसाठी शेतकऱ्यांचे कल्याण महत्वपूर्ण असल्याचे मोदींनी सांगितले. उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपले सरकार वचनबद्ध आहे. उत्तर प्रदेशमध्ये जर भाजपाचे सरकार स्थापन झाले, तर आमचे सरकार छोट्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करेल, असेही ते म्हणाले.

विरोधी पक्षावर टिका करताना पंतप्रधान म्हणाले की, या निवडणुकीत सपा, बसपा आणि काँग्रेस कोणत्या न कोणत्या मार्गाने एकमेकांची पाठराखण करीत आहेत. एकवेळ अशी होती जेव्हा हे सर्व एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायचे परंतू आता बघा परिस्थिती काय आहे. ते आता एकमेकांविरुद्ध काहीही बोलायला मागत नाहीत. ते पुढे म्हणाले की ‘उत्तर प्रदेशच्या विकासासाठी भाजपा हाच एक आशेचा किरण आहे.’

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर देखील टिका करताना मोदी म्हणाले की, अखिलेशजींना हे आठवत तरी आहे का 1984 मध्ये काँग्रेसने मुलायम सिंग यांच्यावर हल्ला केला होता? आणि आज तुम्ही त्यांच्यासोबतच आघाडी करत आहात! यावरुन हे स्पष्ट होते की सत्तेत राहण्यासाठी सपा काहीही करु शकते.

सपा सरकारने राज्यात केवळ गुन्हे आणि भ्रष्टाचार वाढण्यासाठी मदत केली आहे, असा आरोप मोदींनी केला. ते म्हणाले की उत्तर प्रदेशमध्ये ‘अप’(UP) काय आहे, तर गुन्हेगारीचे प्रमाण, रोजगारासाठी युवकांचे स्थलांतर, दंगे, गरीबी, मृत्यू दर, शाळा सोडण्याचे प्रमाण.

भ्रष्टाचार कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारने सरकारी नोकऱ्यांमधील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीसाठी होणारी मुलाखत प्रक्रिया बंद केली असे मोदी म्हणाले. यापूर्वी या पदासाठीच्या नोकरीसाठी लाच घेतली जायची. आम्ही मुलाखत प्रक्रियाच बंद केली. यामुळे भ्रष्टाचारावर नियंत्रण आले. ते पुढे म्हणाले की, 125 कोटी भारतीयांच्या आशीर्वादामुळे काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई लढणे माझ्यासाठी शक्य झाले.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नेते देखील उपस्थित होते.

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा