India is proud that a valorous and great soul like Chhatrapati Shivaji was born on our land: PM
Shivaji Maharaj placed wellbeing of people above everything, was an ideal ruler blessed with exceptional administrative skills: PM

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली.

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त मी त्यांना वंदन करतो. शिवाजी महाराजांसारखी पराक्रमी आणि महान व्यक्ति आपल्या या भूमीत जन्माला आली ही भारतासाठी गौरवाची बाब आहे.

शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. विलक्षण प्रशासकीय कौशल्याची देणगी लाभलेले ते एक आदर्श राज्यकर्ता होते.

शिवाजी महाराजांच्या आदर्शांची पूर्तता करण्यासाठी आम्ही अविश्रांत काम करत आहोत आणि अशा एका भारताची निर्मिती करतो ज्याचा त्यांना अभिमान वाटेल.

नूकतेच, अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा मला सन्मान प्राप्त झाला होता. तो दिवस माझ्या आयुष्यात नेहमीच महत्त्वाचा असेल,” असं पंतप्रधान म्हणाले.