पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिवंगत केदारनाथ साहनी यांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन केले.

यावेळी बोलतांना पंतप्रधानांनी साहनी यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. सार्वजनिक जीवनात नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. भ्रष्टाचार आणि काळा पैसा यांना व्यवस्थेचा भाग म्हणून स्वीकारता येणार नाही, असे पंतप्रधानांनी निक्षून सांगितले. आपण देशाच्या भवितव्याचा विचार करायला हवा आणि भ्रष्टाचाराबाबत कोणतीही तडजोड मान्य करु नये असे ते म्हणाले.