Sardar Patel unified India. This unity in diversity is our strength: PM Modi
Sardar Patel did everything for the nation. Whatever he did was devoted to India: PM
We must encourage cooperation between our states: PM Modi
Sardar Patel gave us Ek Bharat, let us work towards making a Shreshtha Bharat: PM Modi

सरदार पटेल यांची जयंती आपण सा जरी करत आहोत. आपण एकतेबाबत बोलत आहोत तेव्हा एक गोष्ट स्पष्ट आहे की, सरदार पटेल काँग्रेसचे होते आणि मी भाजपचा, मात्र तेवढ्याच आदराने, तेवढ्याच सन्मानाने आम्ही हे कार्य करत आहोत,  कारण प्रत्येक महान नेत्याचे आपापल्या कालखंडात वेगवेगळे विचार होते आणि विचारांबरोबरच विवादही स्वाभाविकच होते. महापुरुषांच्या  योगदानाचा, त्यानंतरच्या पिढीला, विभागण्यासाठी उपयोग करण्याचा अधिकार नाही. त्यातून एकमेकांना जोडणाऱ्या गोष्टी शोधणे, त्याच्याशी स्वतःला जोडून घेणे, प्रत्येकाशी  जोडून घेता येत असेल तर जोडून घेण्याचा प्रयत्न करणे. मला आश्चर्य वाटते की काही लोक मला म्हणतात की,  हे कोण आहेत सरदार पटेल  ज्यांची   जयंती   साजरी   करीत   आहोत ?

 मात्र सरदार पटेल असे होते की त्यांच्या कुटुंबाने मालकी हक्क घेतला नाही. सार्वजनिक जीवनात ज्यांनी आपल्या कुटुंबासाठी म्हणून काही केले नाही, जे काही केले, जबाबदारी म्हणून केले, फक्त देश आणि देशासाठीच केले.

  या गोष्टी आजच्या पिढीला उदाहरणादाखल सांगताना आपण सांगू शकतो की,  कुटुंब आहे ठीक आहे, पण देशासाठी पण थोडे लक्ष दे. म्हणूनच कोणी एक नव्हे तर अशा अनेक महान नेत्यांचे जीवन आपण नव्या पिढीसमोर गौरवाने उलगडून दाखवले पाहिजे. फार कमी गोष्टी समोर येतात. काही लोक इतके महान होते की त्यांना बोलावण्यासाठी 70-70 वर्ष प्रयत्न केले पण यश मिळाले नाही. म्हणूनच सरदार पटेल यांच्या जीवनाबाबतच्या   या  गोष्टी   लोकांना  माहिती    व्हायला   हव्यात.    

 कधी कधी आपण ऐकतो की,  शासनात महिलांना आरक्षण. महिला आरक्षणाचे श्रेय  घेणारी अनेक नावे किंवा अमुक अमुक व्यक्तीला हे श्रेय जाते  असा  दावा  करणारे   त्यांचे   चेले आपल्याला आढळतील.   मात्र माझ्या  वाचनाप्रमाणे 1930 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल अहमदाबाद म्युनसिपल पार्टीचे   अध्यक्ष होते  तेव्हा   त्यांनी   33%  महिला   आरक्षणाचा प्रस्ताव दिला होता. एक द्रष्टा महान नेता कसा विचार करतो याचे हे उदाहरण आहे.   जेव्हा हा प्रस्ताव मुंबई प्रेसिडेन्सीमध्ये गेला तेव्हा त्याला केराची टोपली दाखवण्यात आली, त्याला मंजूर होऊ दिले नाही.

 सरदार पटेल यांच्या व्यक्तित्त्वाची एक मजेदार झलक महात्मा गांधीजींनी एका ठिकाणी लिहिली आहे. अहमदाबाद म्युन्सिपल  पार्टीचे ते अध्यक्ष होते तेव्हा तिथे एक व्हीकटोरीया बाग आहे. सरदार पटेल कसा विचार करत होते बघा, त्यांनी त्या बागेत लोकमान्य टिळक यांचा पुतळा बसवला. त्या काळी इंग्रजांना कसे वाटले असेल आपण कल्पना करू शकता.

  दुसरी विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी गांधीजींना आग्रह केला की त्याचे लोकार्पण तुम्ही करा.  

    तिसरी बाब म्हणजे त्यांनी सांगितले मी या कार्यक्रमाला नसेन, गांधीजींनी त्या दिवसाच्या रोजनिशीत लिहिले होते की त्या उदघाटन समारंभात अहमदाबाद म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये कोण विराजमान आहे, या निर्णयामुळे समजते की कोणी सरदार आहे. शब्द कदाचित वेगळे असतील, संपूर्ण वाक्य माझ्या स्मरणात नाही, पण गांधीजींनी म्हटले होते की सरदार पटेल अहमदाबाद म्युन्सिपल पार्टीमध्ये आले म्हणजे अहमदाबादमध्ये हिंमत आली आहे. अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती आपण ही गोष्ट जशी जाणतो त्या पद्धतीने इतिहासात   मांडली जात नाही.कोणत्या पक्षच्या इतिहासात बघायला गेलो तरी शोधायला लागेल. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा नेतृत्वाचा विषय होता. राज्यांकडून जे प्रस्ताव आले ते सरदार पटेल यांच्या बाजूने आले, पंडित नेहरू यांच्या बाजूने नव्हे. मात्र गांधीजींचे व्यक्तित्व असे होते, त्यांना वाटले की सरदार पटेल यांच्याऐवजी कोणी दुसरी व्यक्ती असेल तर चांगले. नेहरूंकडे  नेतृत्व सोपवताना त्यांच्या मनात असेल कदाचित, मी जाणत नाही, कदाचित असे असेल की,  मी पण गुजराती, आणि या पदावरही गुजरातीला बसवले तर, माहित नाही.

 माझा हा साहित्यिक तर्क आहे, त्याला ऐतिहासिक प्रमाण नाही. मी मजेत सांगतो आहे, मात्र लोकांना वाटेल की सरदार साहेब कसे होते. कोणतेही बंड नाही, कोणतेही वादळ नाही, मात्र हे केले नाही ही बाब जास्त समोर आणण्यात आली नाही पण सत्य नाकारताही येऊ शकत नाही. सरदार पटेल कोण होते हे आणखी एका घटनेने सिद्ध होते. 1नोव्हेंबर 1926 म्हणजे उद्या 1 नोव्हेंबर आहे, म्हणजे 90 वर्षांपूर्वी. जेव्हा सरदार पटेल अहमदाबाद म्युन्सिपल पार्टीचे अध्यक्ष होते आणि स्थायी समितीची निवडणूक होती. सगळ्यांचा आग्रह होता की अध्यक्ष आणि स्थायी समितीचा अध्यक्ष एकच असेल तर कारभार चालवणे सोपे होईल. सगळ्यांच्या आग्रहाखातर सरदार पटेल निवडणुकीत उभे राहिले. दौलतराय नावाचे गृहस्थ त्यांच्याविरुद्ध उभे होते. दोघांनाही 23-23 मते मिळाली. जेव्हा अध्यक्षाला निर्णायक मत द्यायची वेळ आली त्या वेळेला अध्यक्ष म्हणजे स्वतः सरदार पटेल यांनी, जे उमेदवारही होते त्यांनी स्वतःविरुद्ध मत दिले. हे ऐकून देशाला आश्यर्य वाटेल. देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी गांधीजीसमोर झाली होती, तशीच घटना 1 नोव्हेंबर 1926  ची, 90 वर्षांपूर्वी एका महान व्यक्तिमत्वाने ज्यावर गांधीजींच्या व्यक्तित्वाचे दडपण नव्हते  त्यावेळेला झाली. त्यांचा आत्मा सांगत होता की,  मला ही म्युन्सिपल पार्टी चालवायची आहे. निर्णायक मताच्या आधारावर मी स्थानापन्न होणे योग्य नाही. निर्णायक मत विरोधी पक्षाला देऊन त्याला त्या जागेवर बसवणे योग्य ठरेल आणि त्यांनी तसे केले. या गोष्टी वर्तमान राजनैतिक जीवनात प्रत्येक व्यक्तीला शिकण्यासाठी उपयोगी येतील की नाही. जर असतील तर त्या प्रसिद्ध करायला हव्या की नको. इतकेच काम करण्याचा मी प्रयत्न करत आहे. तुम्ही कल्पना करा, फार जुना इतिहास नव्हे, 47, 48, 49 चा कालखंड.

आजकाल कितीही मोठा नेता असू दे, एका म्युन्सिपल पार्टीच्या अध्यक्षाला सांगितले की,  ठीक आहे, तुझे सर्व काही आहे मात्र मला वाटते की तू त्याचा त्याग कर, कोणी सोडेल का ? त्याची पिढीजात संपत्ती आहे का, त्याच्या मातापित्याने मेहनत करून ती मिळवली आहे का? लोकशाहीत लोकांनी संधी दिली, पाच वर्षासाठी संधी दिली आणि तीन वर्षानंतर गरज भासली की,  तुम्ही त्याचा त्याग करा.   मला कोणी सांगा कोणी त्याग करेल का?   आपण सगळे जाणतो कोणी त्याग करत नाही. कोणी मोठा पाहूणा आला आणि खुर्ची सोडावी लागली तर आपण असे बघतो की,  आपल्याला माहीतच नाही की ती व्यक्ती आली आहे. पण कधी बसमधून,    विमानातून प्रवास करताना शेजारची जागा रिकामी आहे. आपण आपले पुस्तक ठेवले, मोबाईल फोन ठेवला आणि बस किंवा विमान निघण्याच्या तयारीत असताना शेवटच्या मिनिटाला कोणी प्रवासी आला तर आपल्याला वाटते हे काय मला सगळे उचलायला लागले. खरे तर ती जागा आपली नव्हतीच, तरी आपल्याला असे वाटते.    मी सांगतोय ते खरे आहे ना? मी तुमची गोष्ट सांगत नाही याची तुम्हाला खात्री आहे.   मनुष्य स्वभाव आहे. आपण कल्पना करा की,  या महान नेत्याचे व्यक्तित्व कसे असेल,  सरदार पटेल यांच्याकडे कोणते तेजोवलय असेल. असे अनेक राजे-राजवाडे होते ज्यांनी आपल्या तलवारीच्या बळावर सत्ता मिळवली होती. पूर्वजांनी बलिदान करून मिळवली होती. मात्र सरदार पटेल यांनी सांगितले की काळ बदलला आहे,   देश जागृत होत  आहे.  त्यांनी निमिषार्धात स्वाक्षऱ्या केल्या. पूर्वजांचा शेकडो वर्षांपूर्वीचा राजेरजवाड्याचा राजपाठ एका व्यक्तीला दिला. कल्पना करा ते व्यक्तित्व किती उत्तुंग असेल.         

मी गुजरातचा आहे. गुजरातमध्ये बऱ्याच वर्षांपासून क्षत्रिय आणि पटेल यांच्यात तू तू -मी मी   चाललें   आहे. शेती करणाऱ्यांना वाटत असे की लोक आमचा कोंडमारा करतात. त्यांना वाटत असे की आपल्याला कोणी समजून घेत नाही,  आपण राजा आहोत, वगैरे. आपल्या समाजात हे चालत असते. कल्पना करा एक पटेल पुत्र,  क्षत्रिय राजनेता, राजपुरुषांना सांगतो आहे की त्याग करा आणि त्याचे ऐकून क्षत्रिय राजगादी सोडून देतो. समाजात यापेक्षा मोठी ताकत काय असू शकते. किती मोठी ताकत आहे ही. एक-एक पैलू , सरदार पटेल यांचे सामर्थ्य दर्शविण्याचा प्रयत्न.

  इथे एक डिजिटल संग्रहालय तयार करण्यात आले आहे. सरदार पटेल यांचे संपूर्ण दर्शन तर घडवू शकत नाही कारण  सरदार पटेल  यांचे व्यक्तिमत्व इतके महान आहे की आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला तरी काही ना काही राहून जाईलच. सरदार पटेल यांचे समग्र दर्शन घडवण्यासाठी, त्यांना जाणून घेण्यासाठी हा एक झरोका आहे, एवढेच मी सांगू इच्छितो. जास्त काही सांगत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा भरपूर वापर करण्यात आला आहे. घटना जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मूळ संदेश असा आहे की भारताच्या एकतेला बळ देण्याची जबाबदारी आजच्या पिढीची आहे. आजकाल आपण पाहतो तेव्हा वाटते की आपण विखुरण्यासाठी रस्ता शोधतो आहे. जसे काही दुर्बीण घेऊनच बसलो आहोत की विस्कळीत होण्यासाठी काय निमित्त मिळतेय. कोणत्या कोपऱ्यात काही मिळत असेल तर पकडा ती गोष्ट. तोडा. विविधतेने नटलेला हा देश असा नाही चालू शकत. आपल्याला प्रयत्नपूर्वक एकतेचा मंत्र आचरावा लागेल. जगण्यात हा मंत्र आणावा लागेल, आपल्या सांस्कृतिक वारशात तो अंतर्भूत करावा लागेल, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तो झिरपावा लागेल.

  हा देश आपण विखरू देऊ शकत नाही. त्यासाठी अशा महान व्यक्तित्वाचे जीवन, त्यांच्या गोष्टी आपल्या उपयोगी पडतात. हा देश सामर्थ्यवान असूनही एके काळी अंतर्विरोधामुळे, अहंकारामुळे, तू-तू,  मी -मी मुळे हा देश विखुरला गेला याला इतिहास साक्षी आहे. चाण्यक्यांनी 400  वर्षांपूर्वी संपूर्ण हिंदुस्थान एक करण्याचा सफल प्रयत्न केला आणि हिंदुस्तानच्या सीमा त्यांनी दूरवर नेल्या त्यानंतर सरदार पटेल यांनी हे काम केले. आपला प्रयत्न असला पाहिजे. आपण पाहिले असेल आपले मूल स्पॅनिश भाषा शिकत असेल तर घरी आलेल्या पाहुण्याला आपण सांगतो की माझ्या मुलाला स्पॅनिश येते, फ्रेंच येते, ती भाषा तो बोलून दाखवतो. ही चांगली गोष्ट आहे,  मी टीका नाही करत. प्रत्येकाला वाटते की आपल्या भविष्यासाठी हे  आवश्यक आहे. मात्र कधी या गोष्टीचा अभिमान वाटत नाही की आम्ही पंजाबचे आहोत आणि माझ्या मुलाला मल्याळी भाषा चांगली बोलता येते, आम्ही ओडिशात राहतो मात्र माझ्या मुलाला मराठी उत्तम येते, त्याला मराठी कविता येतात. एक मुलगा आहे त्याला सकाळी-सकाळी  रेडिओवर रवींद्र संगीत ऐकायला आवडते, त्याला बंगाली गीते आवडतात. रवींद्र संगीत त्याला आवडते. असे कधीतरी  मनात यायला हवे ना. मी पंजाबमध्ये राहतो पण कधी पाहुणे आले तर सांगतो की मला डोसा करता येतो, मी शिकलो आहे. कधी मी केरळमध्ये गेलो तर कोणी म्हणावे मोदीजी आपण आला आहात तर मी ढोकळा करतो. या गोष्टीतून आपल्यात संपर्क वाढत आहे. प्रयत्नपूर्वक आपण आपला देश जाणला पाहिजे, जगण्यात हा प्रयत्न आला पाहिजे. आपल्या कक्षा विस्तारल्या पाहिजेत. मी एका राज्याचा आहे, एका भाषेत शिकलो पण हा माझा देश आहे, हे सर्व माझे आहे. त्याच्याशी मी जोडलो गेलो पाहिजे. गौरवाची ही भावना आपल्याला एकतेचा मार्ग दाखवते.

   आपल्या देशात हिंदी भाषेला आपली मानणार की नाही या बाबीवरून मोठा वाद सुरु आहे, आपण कुशलतेने सगळ्या भाषा आपल्याशा केल्या तर संघर्षाला वाव राहणार नाही. कधी-कधी एखादा शब्द आपल्याला आठवला नाही  तर आपण इंग्लिश शब्दाचा वापर करतो. आपल्या भाषेत सांगून समजत नसेल तर अगदी सहज इंग्लिश शब्द वापरतो. कधी कधी लक्षात येते की माझ्या भाषेत चांगला शब्द नाही तर मी इंग्लिश भाषेची मदत घेतो पण जर मराठी भाषेत पाहिले, बंगाली भाषेत पाहिले , तमिळ भाषेत पाहिले तर त्यात समर्पक शब्द आहे तर मी त्याचा उपयोग का करू नये ?   माझ्या देशातल्या एखाद्या भाषेतला चांगला शब्द असेल तर का वापरू नये. मला हे ज्ञान नाही, या अज्ञानापासून मला मुक्ती मिळाली पाहिजे.

 हा छोटासा प्रयत्न आहे. बोलीभाषेतली 100 वाक्य घ्या. कसे आहात, जवळपास चांगले जेवण कुठे मिळेल, या शहराची लोकसंख्या किती आहे, रिक्षा स्टॅन्ड कुठे आहे,  असे छोटे छोटे प्रश्न. मी आजारी पडेन असे वाटत आहे, जवळपास कुठे डॉक्टर आहे का,  अशी लहान लहान वाक्ये. प्रत्येक भाषेत ही वाक्ये आहेत. आता लोकांच्या हातात ऑनलाइन माहिती मिळवण्याचा मार्ग आहे.आपण केरळला जात असू तर चला ही 100 वाक्ये जाणून घेऊ या. यामुळे कुठे अडचण येणार नाही, या वाक्यांच्या साहाय्याने बोलू या म्हणजे प्रश्न मिटेल.आपला वारसा ” एक भारत,  श्रेष्ठ भारत”   हा कार्यक्रम आम्ही सुरु करत आहोत. देशात प्रत्येकाला जगाशी जोडून घ्यायची गरज आहेच आणि माझा त्याला विरोधही नाही.

 एक राज्य आणि  रशियातले एक राज्य यांच्यातल्या संबंधाद्वारे जोडले जाऊ शकते, एक शहर अमेरिकेतल्या शहराबरोबर जोडले जाऊ शकते, आपल्याच देशातल्या राज्याबरोबर जोडले जाण्यासाठी, आपल्याच देशातल्या विद्यापीठाबरोबर जोडले जाण्यासाठी आपण काही का करत नाही.या साध्या गोष्टींनीच  बळ वाढते. आज ज्या सहा राज्यांनी दुसऱ्या राज्याबरोबर सामंजस्य  करार केला आहे त्याचा अर्थ असा आहे की एक वर्षभर ते राज्य, दुसऱ्या राज्याबरोबर वेगवेगळी कामे करेल,  ज्यामुळे दोन्ही राज्ये एकमेकांना पूर्णपणे जाणून घेतील. सहकार्य करतील आणि विकासप्रक्रियेत एकमेकांचे सहप्रवासी बनतील. कार्यक्रमाचे स्वरूप फार बोजड ठेवण्याची गरज नाही, हलकेफुलके असावे. समजा केरळने महाराष्ट्राबरोबर सामंजस्य करार केला, किंवा ओडिशा आणि महाराष्ट्राने सामंजस्य करार केला. महाराष्ट्रातून शाळा किंवा महाविद्यालयातून  जे पर्यटनासाठी जातील त्यांना सांगूया की आपण ओडिशाला जरूर भेट द्या.    ओडिशातून जे पर्यटक जातील त्यांना सांगता येईल की आपण या वेळी महाराष्ट्राला भेट द्या. हे विद्यापीठ या जिल्ह्यात गेले तर दुसरे विद्यापीठ त्या जिल्ह्यात जाईल.

 याआधी धर्मशाळेत नाहीतर हॉटेलमध्ये राहत होतो यावेळी या योजनेअंतर्गत आलो आहोत, 100 विद्यार्थी आले आलेत, आमच्या या महाविद्यालयातल्या 100 विद्यार्थ्यांच्या घरी हे 100 विद्यार्थी राहतील. 100 कुटुंबे. घरात राहिल्यामुळे ते कसे राहतात ?   पूजापाठ कसा करतात, जेवणाखाण्याच्या पद्धती, त्यातले प्रकार, आई-वडिलांशी कसे वागतात सगळ्या गोष्टी आपोआप समजतील. यामुळे खर्चही कमी होईल, खर्चाबाबतच्या गोष्टी माझ्या थोड्या लवकर लक्षात येतात.

 आता मला सांगा. आताच्या दिवसात मी पाहिले आहे की,  संपूर्ण देशात देशभक्तीची भावना अधिक प्रखर होत आहे. दिवाळीचा दीप उजळताना प्रत्येकाला देशाचा जवान दिसत असतो. देशाच्या जवानांचे हौतात्म्य स्मरते. महाराष्ट्रात, शाळांमध्ये एका वर्षात उडिया भाषेतली पाच गीते गायली जाऊ लागली आणि ओडिशात पाच मराठी गीते गायला  सुरवात झाली तर  हे विद्यार्थी जेव्हा भेटतील तेव्हा कोणती भावना असेल आपण कल्पना करू शकता. आपण पाहिले असेल की आपण कोणत्याही भाषेत बोलत असू मात्र आपल्या म्हणींचे तात्पर्य समान असते. शब्द वेगवेगळे असतील, अभिव्यक्ती वेगळी असेल मात्र जेव्हा ऐकतो आणि अर्थ लक्षात घेतो तेव्हा समजते  ही कथा, ही म्हण आमच्या हरियाणवीमध्येही  आहे. आम्हीही बोलताना या म्हणीचा वापर करतो. याचा अर्थ असा की,  आपल्याला जोडणारी शक्ती आहे. एकदा समजले की तू आणि मी वेगवेगळ्या भाषेत बोलत असलो तरी सांगायचे सूत्र समान असते,   वेष वेगवेगळे असले तरी आपण वेगळे नाही, आहारविहार वेगवेगळा असला तरी आपण वेगवेगळे नाही. आपण एक आहोत, हा भाव आपोआप निर्माण होईल.

  देशात विखुरण्यासाठी अनेक मार्ग शोधले गेले मात्र आपण एकता गृहीत धरली. कारण   विखुरण्याने   काय नुकसान होत आहे याकडे आपले लक्ष गेले नाही. 50 वर्षात आपण आपल्यामध्ये इतक्या वाईट गोष्टींना थारा दिला की त्या गोष्टी वाईट आहेत याचा आपल्याला पत्ताही लागला नाही. या गोष्टी आता इतक्या घुसल्या आहेत तेव्हा आपल्याला एकता दर्शवणाऱ्या बाबी प्रयत्नपूर्वक हाती घ्याव्या लागतील आणि मला या बाबी केवळ शाळा किंवा महाविद्यालयापर्यंत सीमित ठेवायच्या नाहीत. समजा ओदिशातले शेतकरी लहान लहान तलावातही उत्तम मत्स्यपालन करतात, चांगली बाजारपेठही मिळते, तर महाराष्ट्रातही छोट्या छोट्या तलावात मत्स्यपालन करणाऱ्यांना ते शिकवू शकतात. महाराष्ट्रातले लोक ओदिशात  जाऊन चांगले  आणि भरपूर मासे कसे पैदा करायचे हे शिकू शकतात, शिकवू शकतात. आर्थिकदृष्ट्याही हे फायदेशीर आहे. समजा भातशेतीची त्यांची पद्धत आहे,  तिथे भरपूर पाणी आहे, तर इकडे पाण्याची कमतरता आहे तर कमी पाण्यात भाताची शेती कशी करायची हे त्यांना शिकवता येऊ शकते. कृषीक्रांतीला यामुळे चालना मिळू शकते की नाही. कोणत्याही विद्यापीठाच्या मदतीशिवाय दोन प्रांतातले शेतकरी आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करू शकत असतील तर शक्य आहे की ते जगाला नवी गोष्ट देऊ शकतील.

 आजकाल चित्रपटांचे डबिंग होऊ शकते, फार खर्चिक नसते.महाराष्ट्राने, उडिया चित्रपटांचा महोत्सव भरवला तर बॉलीवूडला काही त्रास होणार नाही ना. मात्र हा महोत्सव मुंबईत नको दुसऱ्या ठिकाणी भरवा  आणि ओदिशावाले मराठी चित्रपट महोत्सव करतील. भाषा सहज समजू लागेल. कधी ओडिशा आणि महाराष्ट्राच्या सर्व आमदारांचे संयुक्त संमेलन होऊ शकते की नाही. दोन्ही राज्ये फक्त चांगल्या बाबीवर बोलतील. ओदिशातल्या विरोधी पक्षांनाही चांगलेच बोलावे लागेल, महाराष्ट्राच्या विरोधी पक्षांनाही चांगले बोलावे लागेल, सर्वजण चांगुलपणाविषयी बोलतील तर चांगल्या गोष्टीकडे जाण्याचा मार्ग मोकळा होईल. सांगायचे तात्पर्य इतकेच आहे की आपल्या देशात एकमेकांकडून शिकण्या, समजण्यासारखे खूप काही आहे. आपली अनभिज्ञता आपल्यासाठी मोठा अडथळा बनला आहे.’ एक भारत, श्रेष्ठ भारत ‘ हे जनआंदोलन बनले पाहिजे. विशेष रूपात परिवर्तित झाले पाहिजे.सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी या महा अभियानाचा प्रारंभ होत आहे. फक्त आणि फक्त जोडण्यासाठी आहे आणि त्यासाठी एकतेचे नवे इंजेक्शन द्यायची आवश्यकता नाही, केवळ त्यावर राख जमा झाली आहे ती दूर करून ज्वाला प्रज्वलित करायची आहे, चेतना प्रज्वलित करायची आहे. म्हणून मी आपल्याला आग्रहाने सांगतो, गडबडीत असलात तरी हे प्रदर्शन आवर्जून बघा आणि दुसऱ्यांनाही प्रेरित करा. हे प्रदर्शन केवळ विद्यार्थी वर्गानेच बघावे असे नाही. समाजातल्या सुजाण वर्गाने आपल्या कुटुंबासमवेत येण्याची सवय लावून घेतली तर त्यांनाही हे महान व्यक्तित्व उमजेल. ही सरदार पटेल यांना केवळ श्रद्धांजली नव्हे तर त्यांनी आपल्याला जो मार्ग दाखवला आहे त्यावरून चालण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. मी पुन्हा एकदा पार्थसारथी, त्यांच्या संपूर्ण चमूचे या भगीरथ कार्याबद्दल अभिनंदन करतो. आज आपण एक संग्रहालय बघत आहोत,   मी एक प्रयत्न सुरु केला आहे,  स्वातंत्र्य लढ्याच्या गोष्टी. आपल्या देशातल्या नागरिकांबरोबर आपण मोठा अन्याय केला आहे असे मला खरोखरच वाटते. स्वातंत्र्याचे आंदोलन नेत्यांचे आंदोलन नव्हते, ते जनसामान्यांचे  आंदोलन होते. फार कमी लोकांना माहित असेल की,

1857 मध्ये या देशात बिरसा मुंडांसमवेत  किती आदिवासींनी बलिदान दिले असेल आपण कल्पना करू शकत नाही. मात्र आपल्यापैकी कोणाला हे शिकवले गेले नसेल ना कोणाला माहित असेल. सुरवातीला प्रत्येक राज्यात जिथे जिथे आदिवासीशी  संबंधित  लढा, घटना आहेत, त्यावर स्वातंत्र्य लढ्यातले आदिवासींचे योगदान याबाबत एक संग्रहालय आम्ही तयार करणार आहोत.या देशाच्या जनतेने इतके सारे दिले आहे. त्या गोष्टी जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. हळू-हळू या गोष्टी वाढवत पुढे नेण्याचा माझा विचार आहे. तंत्रज्ञानामुळे या गोष्टी कमी खर्चात आणि लहान जागेतही होऊ शकतात आणि येणारी व्यक्ती कमी काळात बरेच जाणून घेऊ शकते. 3 डी तंत्रज्ञानामुळे अधिक प्रभावशाली होऊ शकते. विद्यार्थ्यांना ज्ञान मिळण्यासाठी उपयोगी ठरू शकते.’ एक भारत, श्रेष्ठ भारत ‘ अभियानाअंतर्गत राज्यांनी आपल्याशी संबंधित कमीत कमी 5000 प्रश्नाचा एक संच बनवावा. त्यात उत्तरेही असावीत, ऑनलाइनही उपलब्ध असावीत. राज्याचा पहिला हॉकीपटू कोण आहे?  कोणती इमारत कोणी, कधी बनवली? छत्रपती शिवाजी महाराज कुठे वास्तव्याला होते? संपूर्ण इतिहास असावा,  लोक-कथा असाव्यात ,5000  प्रश्नाचा संच. त्याची एक स्पर्धा भरवावी, राज्यातही घ्यावी. महाराष्ट्रातला 5000   प्रश्नाचा संच आहे,  ओडिशातील 5000  प्रश्नाचा संच आहे .महाराष्ट्रातली मुले स्पर्धेसाठी ओदिशात यावीत, ओदिशातली मुले महाराष्ट्रात स्पर्धेसाठी यावीत.दोन्ही राज्याच्या मुलांना ओदिशाविषयीही जाणून घेता येईल आणि महाराष्ट्राविषयीही जाणून घेता येईल.  संपूर्ण देशात लाखो प्रश्नांची प्रश्नावली सहज बनू शकते. वर्गात जे शिकवले जात नाही त्याबद्दल माहिती मिळू शकते. डिजिटल जगताचा जास्तीत जास्त उपयोग करत व्यापक मंचावर ‘एक भारत, श्रेष्ठ भारत ‘ अभियान चालवण्याचा प्रयत्न आहे .यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. सरदार पटेल यांना आदरपूर्वक नमन करतो, श्रद्धांजली अर्पण करतो आणि देशाच्या एकतेकरिता काम करण्यासाठी देशवासियांना प्रार्थना करतो. धन्यवाद.