आदरणीय सुमित्राजी तसेच उपस्थित सर्व वरिष्ठ मान्यवर!
वर्ष २०१५ पासून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधानदिन म्हणून साजरा करायला आपण सुरुवात केली आहे. आपल्या नवीन पिढीने संविधान, त्याची प्रक्रिया तसेच त्याची उद्दिष्टे यासगळ्या सोबत सलंग्न राहावे ही या मागची कल्पना आहे. असे नको व्हायला की, या पिढीला सर्व कामकाज सुरु आहे हे माहित आहे पण ते कशाच्या आधारावर सुरु आहे हेच माहीत नाही. अशा गोष्टींचे निरंतर स्मरण करणे आवश्यक आहे. तत्कालीन वेळेनुसार मुलतत्वांचे वेळोवेळी स्मरण केले जाते.
४० वर्षापूर्वी एखाद्या विषयाचा जो अर्थ असेल आता १० वर्षानंतर त्याचा अर्थ वेगळा असेल, विकासात्मक आराखडा असतो. परंतु हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आपल्या मुलभूत तत्त्वांसोबत ह्या सर्व बाबी पारखून घेऊ त्यांची तुलना करू. वर्षातून किमान एकदा आपल्या शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये संविधानाच्या प्रस्तावनेचे सामुहिक पठण झाले पाहिजे जेणेकरून सामान्य जीवनात संविधानाच्या महात्म्याचे एक स्थान निर्माण होईल. जगात असे खूप कमी देश असतील जिथे अशा घटना घडत असतील जिथे वारंवार संविधानाचा उल्लेख होत असेल. परंतु भारत हा एक असा देश आहे जिथे जेव्हा जेव्हा संविधानाचे स्मरण केले जाते तेव्हा त्यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुण्य स्मरण देखील केले जाते. म्हणजेच बाबासाहेब आणि संविधान. संविधान म्हणजेच बाबासाहेब. बाबासाहेब म्हणजेच संविधान. आयुष्याची अशी सिद्धी साध्य करणे हे कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात असंभव आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील जी महानता आज आपण अनुभवत आहोत त्याबद्दल त्यांनी स्वतःहून कधी सांगितले नव्हते. त्यांच्या कालखंडात कदाचित कोणी हे ओळखले देखील नसेल परंतु जसा काळ पुढे सरकत गेला तसे आपल्या सर्वांच्या हे लक्षात येत आहे की किती महान कार्य त्यांनी केले आहे.
संविधान, काळ असा काही बदलला आहे की, प्रत्येक जण संविधानामध्ये आपले अधिकार शोधत आहे आणि त्याला अजून हवा भरण्याचा प्रयत्न केला जातो. खूप हुशार माणसे आहेत, संविधानालाच आधार बनवून अधिकारांचा दुरुपयोग करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे, कधी कधीतर ही लोकं सर्व सीमांचे उल्लंघन करतात. यामुळे अनागोंदी कारभार सुरु होतो. हे सर्वांचे दायित्व आहे नागरिक असो, शासन व्यवस्था असो, सरकार असो किंवा शासन व्यवस्थेचे वेगवेगळे अंग असो. सर्वांमध्ये ताळमेळ बसवण्याचा सर्वात मोठा कुठचा स्रोत असेल तर ते आहे संविधान.स्निग्धिकरणाची ताकद संविधानात आहे, रक्षा करण्याची ताकद संविधानात आहे आणि म्हणूनच संविधानाच्या आत्म्या सोबत जोडणे खूप गरजेचे आहे आणि केवळ याच्या कलमांसोबत जोडून चालणार नाही तर संविधानाचा आत्मा समजून घेतला पाहिजे. आणि म्हणूनच आज याच्या प्रक्रीये संदर्भातील जे पुस्तक प्रकाशित झाले आहे त्यामुळे संविधानाचा आत्मा जाणून घेण्यासाठी सहाय्यक ठरले तर मी त्याचे देखील स्वागत करतो.
कर्तव्य भावनेच्या उत्कृष्ट अभिव्यक्ती नंतर देश स्वतंत्र झाला ही गोष्ट एकदम बरोबर आहे. देशातील प्रत्येक नागरिक स्वातंत्र्य आंदोलनाला आपले कर्तव्य मानतो. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत ही कर्तव्य भावना परमोच्च स्थानावर पोहोचली होती आणि एका शतकाहून अधिक कालावधी पर्यंत लोकांनी ही कर्त्यव्य भावना जपली होती. परंतु स्वातंत्र्यानंतर लगेचच त्या परमोच्च स्थानावरून आपण इतक्या खाली आलो की, कर्तव्य भावना अधिकार वाणीमध्ये परावर्तित झाली. अधिकार, हक्क, माझे या सर्व भावनांनी आयुष्याला अशाकाही प्रकारे ग्रासले की कर्तव्य भावना लोप पावत चालली आहे.
संविधानाच्या माध्यमातून कर्त्यव आणि अधिकार यांचे संतुलन कशाप्रकारे ठेवता येईल हे आव्हान आहे देशासमोर आणि त्या दिशेने मार्ग शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आपण २६ जानेवारी खूप गर्वाने साजरी करतो परंतु आपल्याला हे विसरून चालणार नाही २६ नोव्हेंबर शिवाय २६ जानेवारी अपूर्ण आहे. २६ जानेवारीची ताकद २६ नोव्हेंबरमध्ये आहे. म्हणूनच, ह्यावर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधानदिन म्हणून साजरा करताना संविधानाचे पुण्य स्मरण करत त्यातील बारकावे नवीन पिढीला कळावे यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत राहिले पाहिजे.
ऑनलाइन स्पर्धा झाल्या पाहिजेत, कधी मुलांसाठी संविधानावर आधारित निबंध स्पर्धा झाली पाहिजे, ह्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या लोकांना त्याच्यासोबत जोडून ठेवतात. सध्या देश भ्रष्टाचार, काळापैसा विरुद्ध खूप मोठी लढाई लढत आहे आणि देशाचा सामान्य नागरिक या लढाईचा सैनिक आहे. त्याला असे वाटत आहे की, ७० वर्षापर्यंत याच कायदे, नियमांचे दुरुपयोग करणाऱ्यांनी देशाला भ्रष्टाचारामध्ये ढकलून दिले आहे. संविधान कायदा याचा दुरुपयोग करून केला आहे. सरकारच्या या निर्णयावर खूप कमी लोकं टीका करत आहेत परंतु जे कोणी टीका करत आहेत ते हि करत आहेत की, सरकारने पूर्ण तयारी करून हा निर्णय घेतला नाही.
मला असे वाटते की मुद्दा हा नाहीच की सरकारने पूर्ण तयारी केली नाही. ह्या लोकांची वेदना हि आहे की, सरकारने कोणाला तयारी करायचा वेळच नाही दिला. दुःख ह्या गोष्टीचे आहे की ह्या सर्वांना तयारी करायला ७२ तास जरी मिळाले असते तर त्यांनी वाहवा मोदींसारखे कोणी नाही, किती महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे असे म्हंटले असते. आपला इतका मोठा देश आहे, निर्णय खूप मोठा आहे; आपण सर्वांनी एकत्र येवून सामान्य माणसाच्या आयुष्यातील अडचणी दूर करूया देशाच्या उज्वल भविष्याचे स्वप्न बघणाऱ्यांकडून इतकीच अपेक्षा आहे. या महायज्ञाला यशस्वी करून जगासमोर भारताला एक शक्तिशाली देश म्हणून उभे करायचे आहे. जगभरात जेव्हा भ्रष्टारासबंधी सर्वेक्षण होते तेव्हा भारताचे नाव अग्रिम पंक्तीमध्ये असते, यामुळे भारताची मान खाली झुकते. आम्हला गर्वाने उजळ माथ्याने फिरायचे आहे आणि म्हणूनच काही कठोर निर्णय घ्यावे लागतात आणि या निर्णयांची अंमलबजावणी करून त्यांची उद्दिष्ट साध्य करायची असतात. डिजीटल चलनाच्या क्रांतीसाठी मी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि प्रसार माध्यमांना आमंत्रित करतो. प्रत्येकाचा स्वतःच्या पैशांवर अधिकार आहे, प्रत्येकाला त्याचे पैसे खर्च करण्याचा अधिकार आहे आणि त्यापासून त्याला कोणी थांबवू शकत नाही. परंतु हातात पैसे असले म्हणजेच प्रत्येकवेळी ते खर्च करू शकतो असे नाही आता आपल्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या मोबाईल फोनच्या माध्यमातून देखील तुमचे सर्व पैसे जिथे खर्च करू इच्छिता तिथे खर्च करू शकता. तुमच्या पै आणि पै वर तुमचा अधिकार आहे.
मी देशवासियांना आणि विशेषतः समाजाचे नेतृत्व करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, प्रसारमाध्यमांना विनंती करतो की, ज्या देशात ६५ टक्के युवक आहेत, ३५ वर्षापेक्षा कमी वयाचे युवक आहेत, ज्या देशात १०० कोटींहून अधिक मोबाईल फोन आहेत, ज्या देशात आता तंत्रज्ञान, मोबाईल फोनच्या माध्यमातून देखील व्यवसाय करण्याची सुविधा उपलब्ध आहे सर्व बँकांचे स्वतःचे एप आहे त्यामुळे आपण लोकांना प्रेरित करू या, त्यांना प्रशिक्षण देवू या; आणि हे खूप कठीण काम नाही. आपण आज व्हॉंटसअप कुठे शिकायला गेलो होतो? कोणत्या अभियांत्रिकी महाविद्यालयात आयटी महाविद्यालयात गेलो होतो का, आज एखादा अशिक्षित व्यक्तिला देखील व्हॉ टसअप कसे बघायचे मेसेज कसा फॉरवर्ड करायचा हे सगळे माहित आहे. जितक्या सहजपणे व्हॉ टसअप वरील मेसेज फॉरवर्ड होतो तितक्याच सहजपणे आपण आपल्या मोबाईलवरून खरेदी देखील करू शकतो. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला पारदर्शकता आणणे गरजेचे आहे, डिजीटल चलनाचा वापर करणे गरजेचे आहे आणि भारतातील ५०० शहर, ५०० शहरांनी जर ठरवले तर एका आठवड्याच्या आत हे शक्य करू शकतात. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, ८ नोव्हेंबर च्या ह्या निर्णयाचा सर्वाधिक फायदा कोणी घेतला असेल, मी काल ह्या सर्व गोष्टींची काल माहिती घेत होतो. काही नगरपालिका, महानगरपालिका ४०-५० असतील यांची माहिती मला दिली. याआधी या नगरपालिका, महानगरपालिकांकडे तीन – साडेतीन हजार कोटी कर जमा व्हायचा ८ नोव्हेंबर नंतर यांच्या तिजोरीत १३ हजार कोटी जमा झाले. हा पैसा कोणाच्या उपयोगी येईल? त्या गावात गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या, कुठे रस्ते बांधायला, कुठे वीज दिली जाईल, कुठे पाण्याचे नळ जोडले जातील. समाज जीवनात एक क्रांती घडवून आणण्याचे काम हे सरकार करत आहे. आणि म्हणूनच राजकारणाच्या खूप पुढे जाऊन समाजहितासाठी जे काम करायचे असते संविधान त्याची प्रेरणा देते. आपल्या परंपरा, वारसा सांभाळण्याची जबाबदारी आपल्याला संविधान देते.
चला आपण सर्वांनी एकत्र येवून बाबासाहेब आंबेडकरांनी जे महान कार्य केले आहे त्यांच्या शब्दांना आणि भावनांना कालानुरूप संदर्भानुसार येणाऱ्या प्रत्येक पिढी पर्यंत पोहचवूया, आपण त्यानुसार जगूया आणि जगायला शिकवूया आणि देशाला प्रत्येक क्षण एक नवीन ताकद नवीन उर्जा प्रदान करू या.
यावेळी २६ तारखेला संसदेचे कामकाज सुरु नव्हते सुट्टी होती परंतु संविधान दिनाचे महात्म्य शाश्वत ठेवण्याकरिता सुमित्राजींनी इतका मोठा उपक्रम ठेवला, याकरिता मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. राज्यांमध्ये देखील हा उपक्रम राबवण्यात आला, शाळा महाविद्यालयांमध्ये देखील हा उपक्रम राबवण्यात आला; आणि भविष्यात हा उपक्रम एक खूप मोठ्या स्वरुपात साजरा केला जाईल याचा मला विश्वास आहे. मला येथे यायची संधी मिळाली माझ्या वेळेच्या अभावामुळे तुम्हा सर्वांना खूप घाईघाईने यावे लागले यासाठी मी तुमची क्षमा मागतो.
खूप खूप धन्यगवाद