In the past, illiterate people were called 'angutha-chaap' but now your thumb is your bank: PM
The biggest power of technology is that it can empower the poor: PM Modi
Dr. Ambedkar's mantra was upliftment of the poor: PM
Dr. Ambedkar's contribution to economics as important as his role in drafting the Constitution: PM
Furthering digital connectivity can do wonders for our nation: PM Modi

नाताळच्या दिवशी भारत सरकारने एक भेटवस्तू द्यायला सुरुवात केली होती. त्याअंतर्गत आगामी १०० दिवस प्रत्येक दिवशी १५ हजार लोकांना भाग्यवान विजेता सोडतीच्या माध्यमातून १००० रुपये बक्षिस मिळण्याची योजना आणि हे ते लाभार्थी आहेत जे डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करून एक ग्राहक म्हणून ५० रुपयांपेक्षा अधिक आणि ३ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीची खरेदी करतात; जेणेकरून बक्षिस गरिबांना मिळेल.

१०० दिवसांमध्ये लाखो कुटुंबांमध्ये बक्षीस जाणार आहे आणि सोडत झाल्यानंतर ३ दिवसांनंतर बँकेतील लोकं त्यातील एक नाव काढतात; पहिली सोडत झाली त्यात ज्यांना बक्षीस लागले होते त्यातील ४ लोकांना आज बक्षीस देण्याची संधी मला मिळाली आहे.

आज ३० तारखेला भाग्यवान ग्राहक योजनेसोबतच डिजीधन व्यापार योजनेची देखील सोडत झाली आहे. हे आठवड्यातून एकदा होणार आहे, आज पहिली सोडत झाली. यामध्ये आपल्या दुकानात ग्राहकांना डिजीटल पेमेंटची माहिती देवून त्यांना डिजीटल पद्धतीने पेमेंट करायला  प्रेरित करणाऱ्या व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची योजना आहे. १४ एप्रिल बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त एक भव्य सोडत करण्यात येईल ज्यामध्ये करोडो रुपयांची बक्षिसे दिली जातील. ज्या लोकांना या भाग्यवान सोडतीमध्ये बक्षीस मिळाले आहे मी त्यांचे अभिनंदन करतो त्याचसोबत मी त्यांचे आभार देखील मानू इच्छितो, कारण त्यांनी झारखंड सारख्या एका छोट्या गावात राहणाऱ्या एका छोट्या युवकाने हे तंत्रज्ञान आत्मसाद केले, या तंत्रज्ञानाचा वापर केला, महिलांनी वापर केला आणि म्हणुनच देशात जे लोकं ह्याच्याशी जोडले गेले आहेत ते सर्व एक प्रकारे उज्ज्वल भारताचा पाया मजबूत करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे मी या सर्वांचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो.

आज अजून एक माझ्या दृष्टीने हे खूप महत्वपूर्ण काम आहे झाले आहे आणि ते आहे एका नवीन एपची आजपासून सुरुवात झाली आहे ज्याचे नाव आहे “भीम”. खूप कमी लोकांना हे माहित आहे की ज्या महापूरुषाने  आपल्याला संविधान दिले ते डॉक्टर भीमराव आंबेडकर एक निष्णात अर्थशास्त्रज्ञ होते, आणि हीच त्यांची खरी ओळख आहे. त्यांनी आजपासून जवळ जवळ ८० ते ९० वर्षापूर्वी ‘भारताचा रुपया’ या विषयावर प्रबंध लिहिला होता. चलन धोरण कसे असावे. इंग्रजांच्या शासन काळात भीमराव आंबेडकर यांनी जगासमोर भारताच्या चलन धोरणासंदर्भातील एक नवेपणा आपला विचारांच्या माधमातून प्रस्तुत केला होता. आज आपण ज्या रिझर्व बँकेची चर्चा करतो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रबंध लिहिला होता त्यातूनच प्रेरणा घेऊन या रिझर्व बँकेचा जन्म झाला आहे. इतकेच नव्हे तर स्वतंत्र भारतात जी सांघिक रचना आहे, राज्य आणि केंद्र सरकारच्या दरम्यान आर्थिक व्यवस्था कशाप्रकारे कार्य करेल, निधीचे वाटप कसे केले जाईल यासाठी वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ही देखील बाबासाहेब भीमराव आंबेडकरांच्या विचारांचीच देण आहे.

सांगण्याचे तात्पर्य हे आहे की भारताच्या चलन व्यवस्थेमध्ये, भारताच्या मध्यवर्ती बँकेच्या कल्पनेमध्ये, भारताच्या सांघिक रचनेमध्ये, अर्थव्यवस्थेसंदर्भात एका महापुरुषाचे स्पष्ट दर्शन घडते. सर्वोत्तम योगदान होते, त्या महापुरुषाचे नाव आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर. आणि म्हणूनच आज जो एप आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आपण पाहूच जसे पूर्वी सर्व व्यवहार नोटा किंवा नाण्यांच्या माध्यमातून व्हायचे तो दिवस दूर नाही जेव्हा सर्व कारभार ह्या भीम एपच्या माध्यमातून चालेल. म्हणजे एकाप्रकारे बाबासाहेब आंबेडकरांचे नाव संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये भीम एपच्या माध्यमातून केंद्रभागी होणार आहे. याचा शुभारंभ या कार्यक्रमातून केला आहे.

खूपच सोपे आहे, या एपला डाऊनलोड केल्यानंतर स्मार्ट फोन असो नाही तर १०००-१२०० वाला साधा फोन असो तुम्ही हे एप वापरू शकता.  यासाठी इंटरनेट बंधनकारक नाही आणि आगामी २ आठवड्यांमध्ये अजून एक काम होणार आहे ज्याच्या सुरक्षेची तपासणी सध्या सुरु आहे. ते आल्यानंतर तर या भीम ची ताकद अशी वाढेल की तुम्हाला ना मोबाईल फोनची आवशक्यता असेल, ना स्मार्ट फोनची आवशक्यता असेल, ना साध्या फोनची आवशक्यता असेल, ना इंटरनेटची आवशक्यता असेल; फक्त तुमचा अंगठाच पुरेसा आहे. कोणी कल्पना करू शकेल, एक काळ होता जेव्हा एखद्या निरक्षराला अंगुठाछाप बोलायचे. काळ बदलला आहे; अंगठा! तुमचाच अंगठा आता तुमची बँक, तुमचाच अंगठा तुमची ओळख! तुमचाच अंगठा तुमचा व्यवसाय!

किती मोठी क्रांती घडत आहे २ आठवड्यांनंतर जेव्हा ही व्यवस्था सुरु होईल, मला स्पष्ट दिसत आहे की भीमहे जगासाठी एक खूप मोठे आश्चर्य असणार आहे. देशामध्ये आधारकार्ड, १०० कोटींहून अधिक लोकांना आधार क्रमांक मिळाला आहे, जे १२-१५ वर्षांपेक्षा लहान आहेत ते उर्वरित आहेत, त्यांचे काम सुरु आहे, परंतु जे १४ वर्षांपेक्षा मोठे आहेत त्यापैकी अधिकांश लोकांचे काम झाले आहे जे काही थोडेफार राहिले असतील त्यांचे काम सुरु आहे. दुसरीकडे देशात १०० कोटींहून अधिक फोन आहेत, मोबाईल फोन. ज्या देशात ६५ टक्के तरुण ३५ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत, ज्या देशाच्या लोकांच्या हातात मोबाईल फोन आहे, ज्या देशाच्या लोकांच्या अंगठ्यामध्ये त्यांचे भविष्य सुनिश्चित केले आहे त्या देशाने जर एकदा का डिजीटल कनेक्टीव्हिटी केली तर किती मोठा इतिहास रचला जाईल हे यामध्ये तुम्हाला दिसेल. जगातील कोणत्याही देशासाठी जो तंत्रज्ञान क्षेत्रात कितीही पुढे गेलेला असला, त्यांच्यासाठी देखील, आणि यासाठी परत ते गुगल जवळ जातील, गुगल गुरूला विचारतील हे भीम काय आहे? तेव्हा सुरुवातीला तर त्यांना महाभारतातील भीम दिसेल आणि खोलात जाऊन जेव्हा ते शोधतील तेव्हा त्यांना समजेल की भारत भूमीवर कोणी भीमराव आंबेडकर नावाचे महापुरुष होऊन गेले आहेत, भारतरत्न भीमराव आंबेडकर. “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हा भीमराव आंबेडकरांच्या जीवनाचा मंत्र होता. ते दलित, पिडीत, शोषित, वंचितांचे तारणहार होते. या तंत्रज्ञानामध्ये खूप मोठी ताकद आहे; गरीबातील गरीब व्यक्तीला सक्षम करण्याची ताकद यामध्ये आहे. हा भ्रम आहे की हा सुशिक्षित श्रीमंतांचा खजिना आहे; मुळीच नाही हा गरीबांचा खजिना आहे. हा गरिबांना ताकद प्रदान करणार आहे, छोट्या व्यापाऱ्यांना देणार आहे, दूरवर गावात राहणाऱ्या शेतकऱ्याला देणार आहे, जंगलामध्ये जीवन जगणाऱ्या आदिवासीला देणार आहे आणि म्हणूनच याचे नाव त्या महापुरुषाशी जोडले आहे, ज्यांनी आपले आयुष्य दलित, पिडीत, शोषित, वंचित आदिवासिंकरिता खर्ची केले

सुरुवातीला कधी कधी वाटायचे, आज देखील ‘जाम’मध्ये अनेक समृद्ध देश आहेत, सुशिक्षित विकसित देश आहेत, त्यांना जेव्हा कळते की भारतात कोट्यावधी लोकं बटन दाबून मतदान करतात आणि जेव्हा मतमोजणी होते तेव्हा २ तासात निकाल समोर यायला लागतात तेव्हा जगातील अनेक देशांना याचे आश्चर्य वाटते की अजूनपर्यंत आम्ही जेव्हा निवडणुका व्हायचा तेव्हा मतपत्रिका छापायचो, गावातील लोकं मतदान करायला यायची, ठप्पा मारायची, मग मतपेटीत टाकायची, त्यानंतर आम्ही लोकं त्याची विभागणी करायचो, छाननी करायचो, त्यानंतर मतमोजणी व्ह्यची, आपल्या इथे तर आठवडे लागायचे. ज्या देशाला अशिक्षित संबोधले जायचे, ज्या देशातील नागरिक, त्यांचे विचार यावर प्रश्न उपस्थित केले जायचे, तो देश जगासमोर गर्वाने उभा राहू शकतो, इलेक्ट्रोनिक वोटिंग मशिनीच्या माध्यमातून जगात क्रांती आणणारे आपण आहोत. आपण यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी देखील झालो आहोत.

कधी कधी मला खूप धक्का बसतो, काही लोकं असतात ज्यांच्या डोक्यात आणि मनात फक्त निराशाच भरलेली असते, त्यांच्या आयुष्याची सुरुवात निराशेनेच होते, त्यांची सकाळ देखील निराशेनेच होते. अशा निराशावादी लोकांसाठी सध्यातरी कोणतेही औषध उपलब्ध नाही. तर अशा निराशावादी लोकांना त्यांची निराशा लखलाभ असो. कोणी कल्पना करू शकेल का, भारतात एक काळ होता; तुम्ही लोकांनी जुन्या चित्रपटांमध्ये पहिले असेल, शेअर बाजारात व्यापारी एकत्रित ओरडायचे, अशी अशी बोटे करून ते शेअर बाजारात भाव सांगायचे आणि ते लिहिणारे दूर बसून ठरवायचे की तो ही बोली लावतो आहे, तो ही बोलत लावत आहे, एक काळ असा होता.

तुम्ही पहिले असेल, पूर्वी शेअर बाजारात कोणी गुंतवणूक केली तर मोठे शेअर सर्टिफिकेट यायचे, त्याला सांभाळायला लागायचे, घरात कोणीतरी लक्ष ठेवून असायचे की, शेअर घेतले आहेत तर काय झाले भाव वाढले, कमी झाले? आज भारताने कशाप्रकारे बदल स्वीकारले आहेत, कोट्यावधी लोकं शेअर बाजारातून, डी मॉट खात्यातून आपला संपूर्ण व्यवहार ऑनलाईन करतात. मध्यम आणि निम्न मध्यमवर्गातील लोकं इथे गुंतवणूक करतात आणि तो काही कागदाचा तुकडा नाही, अब्जावधी रुपयांचा व्यवहार सुरु आहे, परंतु आज मी हे बोलल्यानंतर कदाचित काही लोकं जागे होतील आणि शोधायला सुरुवात करतील की मोदिजींनी जे सांगितले आहे ते खरे आहे की खोटे? खरंच शेअर बाजारात सर्व ऑनलाईन होते? कारण आतापर्यंत याकडे कोणाचे लक्ष नाही गेले, हे झाले आहे, परंतु कोणाचे लक्ष नाही गेले. परंतु सध्या मी जेव्हा ई पेमेंटसाठी लोकांना सांगत आहे तेव्हा लोकांना लोकांना वाटत आहे की मोदी काही तरी नवीन गोष्ट घेऊन आला आहे, काहीतरी गडबड आहे, आणि म्हणूनच मोठ्या मोठ्या हुद्यांवर असणारी लोकं, ते देखील आपल्या मृदू भाषेत बोलतात की, हे कसे शक्य आहे, देश अशिक्षित आहे, मोबाईल फोन कुठे आहेत, असे बोलतात. म्हणूनच ह्या निराशेमध्ये वाढलेल्या लोकांसाठी माझ्याकडे कोणतेही औषध नाही, परंतु आशावादी लोकांसाठी माझ्याकडे हजारो संधी आहेत.

बंधू भगिनींनो आज कोणी धोबी विचार करू शकतो का की त्याला बँकेतून कर्ज मिळेल? कोणी छोटेसे न्हाव्याचे दुकान चालवणारा केस कापणारा व्यक्ति, विचार करू शकेल का की मला बँकेतून कर्ज मिळू शकेल? कोणी वर्तमानपत्र गोळा करणारा किंवा वर्तमानपत्र विकणारा विचार करू शकतो का? तो कल्पनाच नाही करू शकत की मी बँकेत जाईन, पैसे मिळतील. विचारच नाही करू शकत , कारण आपण परिस्थितीच अशी निर्माण केली आहे.

मी जे डिजीटल पेमेंट बद्दल बोलत आहे, तो अशी क्रांती घडवेल आणि जेव्हा हा भीम, हा भीम सामान नाही, तुमच्या कुटुंबाची तो आर्थिक महासत्ता बनणार आहे, कसे? समजा एखादा धोबी आहे, त्याच्याकडे लोकं येतात कपडे धुवायला किंवा इतर संबंधित काम करून घ्यायला, संध्याकाळी तो ५००-१०० रुपये कमावतो, घरी घेऊन जातो, परंतु ज्या दिवशी तो डिजीटल पेमेंट स्वीकारायला सुरुवात करेल, तेव्हा त्याच्या संपूर्ण नोंदी राहायला सुरुवात होईल, त्याचा मोबाईल फोन बोलेल की रोजचे ८००-१000 रुपये येतात, १००-२०० रुपयांची बचत होते, मग नंतर जर त्याला बँकेतून कर्ज घ्यायचे असेल तर तो बँकेत सांगेल की, माझा मोबाईल बघा, माझ्या खात्यात इतक्या पैशांचा व्यवहार होतो. आता मला ५००० रुपयांची गरज आहे, तुम्ही द्या. ही व्यवस्था अशी असेल की, आज त्याला सावकाराकडून जास्ती व्याजदराने ५००० रुपयांचे कर्ज घ्यावे लागते. तो दिवस आता दूर नाही जेव्हा तो त्याच्या मोबाईल फोनच्या सहाय्याने पाच मिनिटांमध्ये ५००० हजार रुपये त्याच्या बँक खात्यात जमा होतील. ही ई बँकिंग ची व्यवस्था आता विकसित होत आहे, मित्रांनो तो दिवस आता दूर नाही. हे घडणार आहे, आणि ह्या कार्याला पुढे नेण्यासाठी आज एक सामाईक व्यासपीठ भीमच्या रुपात २०१६च्या शेवटी मी देत आहे. हे एकप्रकारे २०१७ साठी ही एक सर्वोत्तम भेटवस्तू देत आहे.

बंधू भगिनींनो तीन वर्षापूर्वीचे वर्तमानपत्र तुम्ही घ्या, युट्यूब वर जर जुन्या लिंक पहिल्या, जुन्या वर्तमानपत्रातील जर बातम्यांची कात्रण पहा, काय दिसेल? किती गेले? कोळश्यामध्ये किती गेले, टू-जी मध्ये किती गेले, बातम्या ह्याच असायच्या – किती गेले? आज लोकांनी बघावे आज किती आले. बघा, वेळेवेळेची गोष्ट आहे. हाच देश, हेच लोकं, हाच कायदा, हेच सरकार, हीच कागदपत्रे, हेच नियम; तो पण एक काळ होता जेव्हा जायच्या गोष्टींच्या चर्चा व्हायच्या, हा पण एक काळ आहे येणाऱ्या गोष्टींची चर्चा होत आहे; लोकं हिशोब करत आहेत सोमवारी किती आले, मंगळवारी किती आले

बंधू आणि भगिनींनो, देशातील गरिबांसाठी काहीतरी करण्याची इच्छा असेल, त्यांच्याप्रती समर्पणवृत्ती असेल तर सर्व चांगलं करण्यासाठी ईश्वर देखील शक्ती देतो. मी हैराण आहे एका नेत्याने वक्तव्य केले की, डोंगर पोखरून उंदीर काढला, भावा मला उंदीरच बाहेर काढायचा होता; तोच तर गुपचूप सर्व खातो. शेतकरी कष्ट करतो, शेतकरी कष्ट करून धान्याच्या राशी लावतो, दोन जरी उंदीर आले तर ते सर्व नष्ट करतात. त्यामुळे ज्या नेत्याने हे वक्तव्य केले आहे त्याचे मी आभार मानतो की निदान ते खर तरी बोलले, हे उन्दित्र पकडण्याचेच काम आहे, जे देशातील गरिबांचे पैसे खातात. त्यामुळे उंदीर पडण्याचेच काम सुरु आहे आणि ते वेगाने सुरु आहे.

बंधू आणि भागिनींनो, मी आज प्रसार माध्यमातील मित्रांचे देखील आभार मानू इच्छितो. तुम्हाला माहीतच असेल, एखादी गोष्ट जर करण्याचे प्रसार माध्यमांनी ठरविले तर त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. जेव्हा लोकं लाल दिव्याच्या गाडीतून फिरण्याचे हौशी होते तेव्हा प्रसार माध्यमांनी त्यांचा पिच्छा पुरवला. कॅमेरा घेवून गेले, हा अमुक लाल दिव्याच्या गाडीत बसला आहे. हळू हळू ज्याला लाल दिव्याची गाडी अधिकाराने मिळाली होती ते देखील ती वापरायला घाबरू लागले. खूप लोकं होती जी सरकारने सांगितले, कायद्याने सांगितले, सीट बेल्ट लावा, सीट बेल्ट लावा कोणीच नाही लावायचे. प्रसारमाध्यमातील मंडळी पाठी लागली, कार मध्ये कोणी मोठी हस्ती बसली असेल, तर लगेच निघायचे, याने सीट बेल्ट नाही लावला, मग नंतर दुसऱ्या दिवशी टिव्ही वर दाखवायचे तेव्हा त्याचे तोंड एवढूसे व्हायचे.त्यानंतर  सीट बेल्ट बद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण झाली.

कधी हेल्मेटसाठी सरकार सांगते आयुष्य वाचवण्यासाठी हेल्मेट घाला, पण कोणी ऐकायचे  नाही, पण प्रसार माध्यमातील मंडळी जर कोणी पोलिसकर्मी हेल्मेट न घालता दिसला तर त्याला पकडून टीव्हीवर दाखवायचे यामुळे एक भीती निर्माण झाली. लोकं देखील हेल्मेट न घालता दिसले तर त्यांना देखील टीव्हीवर दाखवायचे. यामुळे सरकार देखील जागे झाले, पोलिस देखील जागे झाले. ही सेवा काही कमी नाही, ही खूप मोठी सेवा आहे.

‘स्वच्छता अभियाना’ संदर्भात देखील एक अशीचं जनजागृती पसरली. ‘स्वच्छता ठेवा’ असे जर कोणी प्रसार माध्यमातील लोकं सांगत असतील तर ती वेगळी बाब आहे, परंतु मी पहिले आहे की, त्यांची टीम सकाळ संध्याकाळ कॅमेरा घेऊन फिरायचे आणि जर कोणी कचरा टाकतांना दिसले की त्याला पकडायचे आणि त्याची मुलाखत घ्यायचे. मग तो पळून जायचा प्रयत्न नाही करायचा, मी हे जाणूनबुजून केले नाही, मी बघितले नाही अस सांगायचा. मग ते सांगायचे बघ दिसतंय की नाही दिसतंय ते; मग तो पळून जायचा. बघा, मी मान्य करतो आपल्या देशाच्या इलेक्ट्रोनिक प्रसार माध्यमांनी, अशी तर मी असंख्य कामांची यादी देवू शकतो परंतु मी आशावादी विचारांचा मनुष्य असल्याने मला यामध्ये चांगलेच दिसते. काही लोकांना तक्रार करण्याची इच्छा होते की असे का करतात; मला नाही करावेसे वाटत. मला वाटते चांगले करत आहेत आणि म्हणूनच आगामी काळात प्रसार माध्यमे खूप मोठी सेवा करू शकतात.

मागील ५० दिवसात तुम्ही पहिले असेल की, मी भाषणात सांगायचो की, डिजीटल केले पाहिजे, मोबाईल केले पाहिजे तेव्हा मला दाखवायचे आणि बाजूला उभ्या असलेल्या एखद्या रिक्षाचालकाला विचारायचे तुझ्या कडे मोबाईल आहे? तो सांगायचा नाही आहे. तुला रोकडमुक्त व्यवहार माहित आहे, नाही सांगायचा. मग ते मला….ए मोदी म्हणायचे! आणि यामुळेच सरकारला विचार करणे भाग पडले की, साध्या फोन मध्ये देखील हे करणे शक्य झाले पाहिजे, अंगठ्याने देखील बँकिंग झाले पाहिजे. आले की नाही आले? तर सांगा मी प्रसारमाध्यमांचे आभार मानू की नको मानू? म्हणूनच मी त्यांचे आभार मानू इच्छितो. परंतु मला विश्वास आहे तुम्ही लक्ष ठेवा, आता एका विशिष्ट तारखेनंतर प्रसारमाध्यमातील लोकं तुमच्या हातात मोबाईल बघतील, कॅमेरा थांबवून विचारतील, तुमच्याकडे मोबाईल आहे, भीम आहे, मग रोख पैसे घेऊन का फिरताय? सुशिक्षित आहात मग हे काय करत आहात? तुम्ही बघा २०१७ मध्ये प्रसारमाध्यमातील लोकं तुम्हाला हे विचारणार आहेत. सर्व भारतीयांना विचारणार आहेत की, दोन दोन मोबाईल फोन घेऊन फिरताय तरी तुम्ही रोकडमुक्त व्यवहार करत नाहीत? यामुळेच क्रांती येते आणि मला विश्वास आहे की, जगातील आधुनिक देशांच्या तुलनेत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणि तंत्रज्ञानासोबत सर्वसामान्य लोकांची कनेक्टीव्हिटी हे करून दाखवेल.

बंधू आणि भागिनींनो, मी खुल्या विचारांचा आहे. आपला देश काही असाच सोन्याची चिमणी नव्हता. आपला देश असाच काही सोन्याच्या चिमणीपासून गरीब नाही झाला. आपल्यामधील कमतरता, आपल्या चुका, आपली चुकीची वर्तणूक या सर्वांमुळे सोन्याची चिमणी म्हणून संबोधला जाणारा देश गरीब देशांच्या पंक्तीत जाऊन बसला. परंतु याचा अर्थ हा देखील आहे की, या देशामध्ये पुन्हा एकदा सोन्याची चिमणी बनण्याची क्षमता आहे. या स्वप्ना सोबत, या विश्वासा सोबातच का नाही आपण या देशातील गरिबांना त्यांचा हक्क मिळवून देऊ या? मध्यमवर्गीय लोकांचे जे शोषण होत आहे त्याला आळा बसवू या. देश खरेपणाच्या रस्त्यावर चालू इच्छितो त्याला आपण बळकटी प्रदान करू या.

बंधू आणि भगिनींनो, मला माहित आहे की, आज ह्याचे मुल्यांकन करण्याची हिम्मत लोकं करणार नाहीत, ना त्यांचामध्ये तितके सामर्थ्य असेल, परंतु तो दिवस दूर नाही जेव्हा या सर्व घटना क्रमाचे मुल्यांकन होईल. इतिहासाच्या तारखांमध्ये जेव्हा याची नोंद होईल तेव्हा तेव्हा एक गोष्ट समोर येईल की, आपला देश; कधीतरी बोलले जायचे की, युनान, मिस्र संपले, परंतु बघा ना आपले अस्तित्व मिटले नाही!

बंधू आणि भगिनींनो! तुम्ही तुमच्या कार्यकाळात पहिले असेल, जे लहान आहेत त्यांनी देखील पहिले असेल, जेव्हा कधी आपल्या देशावर परकीयांचे आक्रमण झाले आहे, कोणी परकीय अत्याचार करतो, कोणी परकीय काही बोलतो तेव्हा संपूर्ण भारत एकजूट होऊन त्याचा सामना करण्यासाठी तयार होतो, हे आपण कित्येकदा पहिले आहे. परंतु पहिल्यांदा या देशाने याचा अनुभव घेतला आहे जो इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. मित्रांनो! हा देश स्वतःमधील वाईट गोष्टी संपवण्यासाठी एकजूट झाला आहे. स्वतःशी लढण्यासाठी एकजूट झाला आहे. स्वतःशी लढण्यासाठी पुढे आला आहे, आपल्यामधील वाईट गोष्टींचा नाईनाट करण्यासठी सव्वाशे कोटी देशवासी इतके कष्ट झेलल्या नंतर, त्रास सहन केल्यानंतर देखील हसत आहेत.

बंधू आणि भगिनींनो! हिचतर देशाची ताकद आहे की आपण आपल्यामधील वाईट गोष्टींचा नाईनाट करण्यासाठी स्वतःहून पुढे येत आहोत, वेळ मिळताच निघतो आणि करून टाकतो. ८ तारखेनंतर देशाने या ताकदीचे दर्शन घडविले आहे, जी देशाची अनमोल ताकद आहे. आपल्यामधील वाईट गोष्टींविरुद्ध लढणे ही सामान्य बाब नाही. सव्वाशे कोटी देशवासी आणि हे देखील तितकेच खरे आहे की, काही लोकांनी वाईट गोष्टी स्वेच्छेने स्वीकारल्या असतील, काही लोकांनी मजबुरीने स्वीकारल्या असतील, परंतु इच्छा अनिच्छा काही असली तरी हि गोष्ट वाळवी सारखी पसरली आहे आणि म्हणूनच वाळवी सारखा पसरलेला अप्रामाणिकपणाचा आजार, कधी कधी तर असे वाटायचे की लोकं कदाचित ह्याला आपली सवयच बनवून घेतील. परंतु ८ डिसेंबर नंतर मी पहिले की लोकं संधीची वाटच बघत होती. त्यांना असे जीवन नको होते. त्यांना इमानदारीने जीवन जगायचे आहे, त्यांना सच्चेपणाचा मार्ग हवा आहे आणि देशवासीयांनी हे करू दाखविले.

बंधू आणि भगिनींनो! मी विश्वासाने सांगतो, ही जी सर्व मेहनत सुरु आहे हे काही छोटे काम नाही; जगाला आश्चर्य वाटत आहे की, ८६% चलन व्यवहारातून एकदम बाद होणे, जग याचा विचारच करू शकत नाही, कसा देश आहे! कशी लोकं आहेत! आणि बघा जीवन जगत आहेत! विचार करत आहेत पुढे चालायचे आहे. ही देशाची काही सामान्य ताकद नाही आणि देशवासीयांनी ही ताकद दाखवली आहे आणि हीच ताकद आहे जी येणाऱ्या काळात देशाची प्रगती घडवून आणणार आहे.

बंधू आणि भगिनींनो! माझे हे मत आहे, या देशावर, या देशाच्या संपत्तीवर, या देशाच्या संपदेवर पहिला हक्क या देशातील गरीबांचा असला पाहिजे. गरिबी विरुद्धची लढाई केवळ नारे देऊन लढली जात नाही. तुम्ही बघा, मी देशवासियांना एक प्रार्थना केली होती, सांगितले होते की, तुम्हाला जर आर्थिक दृष्टया जास्ती नुकसान होत नसेल तर तुम्ही स्वयंपाकाच्या सिलेंडर वरील अनुदान सोडून द्या.

हा देश २०१४ च्या निवडणुकीमध्ये जे काही ९ सिलेंडर आणि १२ सिलेंडरचा मुद्दा घेऊन चालत होते, एक पक्ष ह्या मुद्द्यावरून निवडणूक लढत होती की, ९ सिलेंडर देणार की १२ सिलेंडर देणार. ज्या देशात संपूर्ण निवडणुका सिलेंडरच्या संख्येवर लढल्या गेल्या, याच देशात एक सरकार येते आणि लोकांना सांगते अनुदान सोडून द्या. किती मोठा विरोधाभास! आम्ही तुम्हाला १२ सिलेंडर देतो तुम्ही आम्हाला मत द्या, हा दुसरा पक्ष आला तो सांगतो, सिलेंडरवरील अनुदान सोडून द्या!

आणि आज मी नतमस्तक होऊन देशवासियांना प्रणाम करून सांगू इच्छितो की १ कोटी २० लाखांहून अधिक कुटुंबांनी आपले अनुदान सोडले आहे. आणि मी तुम्हाला वचन दिले होते की तुम्ही जे अनुदान सोडत आहात ते मी त्या गरीब आईला देईन, ज्या गरीब आईला चुली मधील धुराच्या आगीसोबत आपल्या मुलांसोबत रहावे लागत आहे. त्या गरीब आईच्या शरीरात एका दिवसात ४०० सिगारेटी इतका धूर जातो.त्या आईच्या आरोग्याचे काय होत असेल; तुम्ही तुमचे अनुदान सोडा मी ते सिलेंडर त्या गरीब आईला देऊ इच्छितो जी चुलीवर जेवण बनवते. आणि,  आज मी देशवासियांना सांगू इच्छितो की १ कोटी २० लाख लोकांनी अनुदान सोडले आहे; आतापर्यंत आम्ही दिड कोटी गरीब मातांना सिलेंडर दिले आहे. सांगण्याचे तात्पर्य हे आहे की, आता जे काही येत आहे ते जात नाही. हे जे काही येत आहे, ते गरिबांच्या कामी येणार आहे; गरिबांच्या चांगल्यासाठी ते कामी येणार आहे.

मित्रांनो! देशाला बदलायचे आहे! देशाचे सामान्य मानवी जीवन जेव्हा बदलेल तेव्हाच देश बदलेल. आज जेव्हा आपण पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जन्मशताब्दी साजरी करत आहोत आणि भारत सरकारने हे वर्ष गरीब कल्याण वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरविले आहे तेव्हा हे सर्व परिश्रम गरिबांना समर्पित आहेत; त्यांच्या कल्याणासाठी समर्पित आहेत; मध्यमवर्गीय व्यक्तीला त्याचे हक्क मिळवून देण्यासाठी समर्पित आहेत; त्यांच्या कल्याणासाठी समर्पित आहेत; पिळवणूकीपासून त्यांना मुक्ती मिळवून देण्यासाठी समर्पित आहेत मला विश्वास आहे की, देशाने ज्या प्रकारे आशिर्वाद दिला आहे; येणाऱ्या काळात या बदलाचे खरे हक्कदार देखील तेच असतील.

मी पुन्हा एकदा ते इमान कमावणाऱ्याचे अभिनंदन करतो, मी देशवासियांना आग्रह करतो की जर तुमच्याकडे मोबाईल फोन आहे, स्मार्ट फोन आहे तर २०१७ च्या 1 जानेवारीपासून कमीत कमी ५ व्यवहार या माध्यमातून करा. प्रत्येक भारतीयाने जर ५ व्य्वाहारांपासून सुरुवात केली तर त्याला त्याची सवय होईल आणि मग देश डिजिटल चळवळीत पुढे जाईल. मी पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो, खूप खूप आभार मानतो