मतमोजणीचा दिवस हा प्रत्येक राजकीय नेत्याच्या आयुष्यात अत्यंत महत्वाचा दिवस असतो. कारण तो निकालाचा दिवस असतो,याच दिवशी नेत्याच्या पुढच्या पाच वर्षांचे भवितव्य ठरणार असते, त्याच्या पक्षाचेही भवितव्य ठरत असते.
त्यामुळे या दिवशी कुठलाही राजकीय नेता अतिशय अस्वस्थ आणि कामातअसणे अगदी साहाजिक असते. जसजसे मतदानाचे आकडे येऊ लागतात तसतशी ही अस्वस्थता वाढत जाते. बरेचदा, नेतेमंडळी त्यांचे कार्यकर्ते आणि मदतनीसांसह टीव्हीवर मतमोजणीच्या बातम्या बघता असतात. कार्यकर्ते त्यांना मतांची ताजी आकडेवारी आणून देतात.
मात्र या सगळ्याला एक उल्लेखनीय अपवाद म्हणजे नरेंद्र मोदी!
ते अशावेळी टीव्हीसमोर बसले असतात ? नाही !
ते त्यांच्या दालनात कार्यकर्ते आणि समर्थक यांच्यासोबत बसून ताजी आकडेवारी आणि अंदाज यावर चर्चा करत असतात का ? नाही !
मग ते काय करत असतात अशावेळी ?
तर ते त्यादिवशीही त्यांची रोजची कामेच करत असतात. त्याचा दिनक्रम तसाच अविरत, खंड न पडता सुरु असतो.
१६ मे २०१४ साली जेव्हा संपूर्ण जगाचे भारतातल्या निवडणूक मतमोजणीकडे लक्ष लागले होते, तेव्हा मोदी, पंतप्रधान पदाचे उमेदवार , संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे केंद्रबिंदू असूनही, त्यांचा दिनक्रम नेहमीप्रमाणे सुरु होता. राजनाथ सिंह यांनी निकाल सांगण्यासाठी केलेला पहिला फोन त्यानी घेतला आणि त्यानंतर ते त्यांच्या आईची आणि ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले.
२००२, २००७ आणि २०१२ च्या निवडणुकीतही हेच घडले होते.
या व्यक्तीने कधीही मोठ्या पदाची अपेक्षा, ध्येय ठेवले नाही, त्याच्यासाठी निवडणुकांचे निकाल हा ही इतर दिवसांप्रमाणेच एक सर्वसामान्य दिवस होता. लोकांनी जे निकाल दिले होते ते विनम्रपणे स्वीकारण्याची त्यांची तयारी होती.