A delegation of Japan-India Parliamentarians’ Friendship League meets PM Modi
Japanese delegation condemns the cross-border terror attack in Uri, Jammu and Kashmir
Japanese delegation welcomes PM Modi’s call for greater international cooperation against the global menace of terrorism

जपान-भारत संसदपटूंच्या मैत्री लीगच्या प्रतिनिधी मंडळाने (जेआयपीएफएल) आज पंतप्रधानांची भेट घेतली.

हिरोचुकी होसोदा यांनी या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व केले यामध्ये कत्सुआ ओकादा, मसाहारु नाकागावा, नाओकाझू टेकमोटो आणि योशिआकी वाडा यांचा समावेश होता.

या जेआयपीएफएल प्रतिनिधीमंडळाने जम्मू आणि काश्मीरमधील उरी येथे 18 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांप्रति शोक व्यक्त केला.

दहशतवादाच्या जागतिक संकटाविरोधात व्यापक आंतरराष्ट्रीय सहकार्याचे आणि दहशतवाद पुरस्कृत करणाऱ्या देशाला एकाकी पाडण्यासाठी समन्वयित प्रयत्नांसाठी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाचे जेआयपीएफएल प्रतिनिधी मंडळाने स्वागत केले.

यावेळी पंतप्रधानांनी 2014 मध्ये त्यांनी केलेल्या जपानच्या यशस्वी दौऱ्याची आठवण सांगितली. ज्यामध्ये त्यांनी टोकियो इथे जेआयपीएफएलशी संवाद साधला होता. पंतप्रधान म्हणाले की, भारत आणि जपानने आगामी दशकांसाठी अनेक क्षेत्रांमध्ये मजबूत सहकार्याचा पाया रचला आहे.

जपान आणि भारत दरम्यान संबंध मजबूत करण्यासाठी भक्कम द्विपक्षीय पाठिंबा असल्याचे जेआयपीएफएलच्या प्रतिनिधी मंडळाने सांगितले आणि अति जलद रेल्वेसारख्या उच्च तंत्रज्ञान सहकार्यातील प्रगतीचे स्वागत केले.

पंतप्रधान अबे यांनी 2015 मध्ये केलेला भारत दौरा आपल्या द्विपक्षीय संबंधांच्या इतिहासातील प्रमुख दौरा होता याचे स्मरण पंतप्रधानांनी करुन दिले आणि नजीकच्या काळात जपानला भेट देण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे सांगितले.