राज्यसभेत बोलताना श्री नरेंद्र मोदी म्हणाले की काळा पैसा आणि भ्रष्टाचार यांच्या मुद्दयावर पहिल्यांदाच आडवी फूट पडली आहे. देशभरातील जनतेने भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्यासाठी पाठबळ दिले आहे, असे त्यांनी सांगितले. या मुद्द्यावर आडवी फूट पडली आहे आणि एक स्पष्ट बाजू दिसत आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचार यांचा सामना करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी जनता पुढे आली आहे, असे श्री मोदी म्हणाले.