पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्त्री शक्ती पुरस्कार आणि नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांची भेट घेऊन संवाद साधला. आपापल्या क्षेत्रात इतराना मार्गदर्शक ठरल्याबद्दल तसेच व्यक्तिग क्षमतांच्या विकासाबद्दल पंतप्रधानांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.
येत्या तीन दशकात भारत वर्षाला 8 टक्क्यांचा विकास दर दाखवू शकला तर तो जगातील सर्वाधिक विकसित देश ठरेल. यासाठी महिला सक्षम असणे आवश्यक आहे जेणेकरुन या लक्षाप्रती त्या अधिकाधिक योगदान देऊ शकतील. लोकसभेत आज प्रसूती रजा विधेयक मांडण्यात आले आहे. यामुळे वेतनासहित प्रसूती रजा 12 आठवडयावरुन 26 आठवडयांपर्यंत वाढू शकणार आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
यावेळी महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधी उपस्थित होत्या.