PM Modi lauds the passing of Rights of Persons with Disabilities Bill – 2016
Passage of Rights of Persons with Disabilities Bill -2016 is a landmark moment: PM Modi
Passage of Disabilities Bill -2016 will add tremendous strength to ‘Accessible India movement’: PM

संसदेत दिव्यांग जन हक्क विधेयक 2016 पारित झाल्याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली आहे. पंतप्रधान म्हणाले की, हा महत्वपूर्ण क्षण आहे आणि यामुळे सुगम्य भारत चळवळीला अधिक बळ मिळेल.

पंतप्रधान म्हणाले, “ दिव्यांग जन हक्‍क विधेयक -2016 पारित होणे हा महत्वपूर्ण क्षण आहे आणि यामुळे सुगम्य भारत चळवळीला अधिक बळ मिळेल.”

या कायद्याअंतर्गत, सर्व प्रकारच्या दिव्यांगांचा समावेश करण्यात आला आहे आणि त्याचबरोबर अतिरिक्त लाभाच्या तरतुदीही समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

दिव्यांगांविरोधातील गुन्ह्यासाठी आणि नवीन कायद्यातील तरतुदींच्या उल्लंघनासाठी कठोर दंडाची तरतूद यात आहे. नवीन कायद्यामध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. ज्यामुळे संधी, समानता आणि सुगम्यता वाढेल. अधिक माहितीसाठी हे पहा – https://goo.gl/Zwpm4k”