Published By : Admin |
December 10, 2016 | 21:34 IST
Share
PM Narendra Modi inaugurates India’s largest cheese factory in Gujarat
Along with ‘Shwet Kranti’ there is also a ‘Sweet Kranti’ as people are now being trained about honey products: PM
Government has been successful in weakening the hands of terrorists and those in fake currency rackets: PM
NDA Government is working tirelessly for welfare of the poor: PM Modi
India wants progress and for that evils of corruption and black money must end: PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधल्या दिसा इथे बनासकांठा सहकारी दूध उत्पादक संघाने आयोजित केलेल्या बनास डेरीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला आज उपस्थित होते.
चीझ कारखान्याच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधानांनी एका प्रतिकृतीचे आणि पालनपूर येथील दह्याशी संबंधित एका प्लांटचे रिमोट कंट्रोलद्वारा उद्घाटन केले.
उत्तर गुजरातमधल्या शेतकऱ्यांनी, आपल्या क्षमतेचे साऱ्या जगाला दर्शन घडवले आहे, असे पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले.
या भागातल्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचा मोठ्या प्रमाणात लाभ झाल्याची नोंद पंतप्रधानांनी घेतली. इथला शेतकरी दुग्धविकास आणि पशुपालनाकडे वळल्याचे सांगून शेतकऱ्यांसाठी हे लाभदायी असल्याचे पंतप्रधान म्हणाले. श्वेतक्रांती बरोबरच इथे आता स्वीट क्रांती अर्थात माधुर्य क्रांती होत आहे. कारण इथला शेतकरी आता मध उत्पादनातही तरबेज होत आहे.
विमुद्रीकरणासंदर्भात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, या निर्णयामुळे दहशतवादी आणि बनावट नोटा रॅकेट कमकुवत करण्यात सरकार यशस्वी ठरत आहे.
गरीबांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार अथक कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. ई-बँकींग आणि ई-वॉलेट वापरावे यासाठी त्यांनी जनतेला प्रोत्साहन दिले. भारताला अधिक प्रगती करायची आहे आणि त्यासाठी भ्रष्टाचार आणि काळा पैसा नष्ट झाला पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले.
We belong to a nation where we do not think- what my interest. We are not a selfish nation. We think about future generations: PM pic.twitter.com/OuLxqqEV1q