पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांच्या 350 व्या जयंती दिनाचा कार्यक्रम आज पाटणा येथे पार पडला. याप्रसंगी गुरू गोविंद सिंग यांच्या स्मृतिप्रित्यर्थ टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले.

गुरू गोविंद सिंग यांनी आपल्याकडील प्रचंड ज्ञानाचा विचार शिकवणुकीतून मांडला. असंख्य लोकांना त्यांच्या विचारांनी, कल्पनांनी प्रेरणा दिली. समाजातील भेदाभेद गुरू गोविंद सिंगांना अमान्य होता. ते सर्वांना समान वागणूक देत होते. अशा अनेक गुणांनी गुरू गोविंद सिंगांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी होते, असे पंतप्रधान मोदी यावेळी आपल्या भाषणात म्हणाले.

अंमली पदार्थांच्या सेवनातून आगामी पिढीला वाचवण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सुरू केलेल्या विशेष प्रयत्नांचे पंतप्रधानांनी याप्रसंगी कौतुक केले. तसेच देशाच्या प्रगतीमध्ये बिहार महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

Click here to read full text speech