PM Modi attends a book release function on the occasion of Constitution Day
The common citizen of India has become a soldier against corruption and black money: PM
26th November to be observed as Constitution Day to celebrate the Constitution & have greater awareness among the youth: PM

संसद भवन संविधान दिवस साजरा करण्यासाठी झालेल्या एका पुस्तक प्रकाशन समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.
“ॲन अपडेटेड व्हर्जन ऑफ कॉन्स्टिटयूशन ऑफ इंडिया” आणि “मेकींग ऑफ कॉन्स्टियूशन” या दोन पुस्तकांचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.

2015 पासून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. भावी पिढयांना संविधान समजून घेऊन त्याची आणि समकालीन स्थितीशी सांगड घातली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

भारतात जेव्हा आपण संविधानाबद्दल बोलतो, तेव्हा आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण येते. आपण सर्वांना संविधानाच्या आत्म्याशी जोडले जाण्याची तसेच हक्क आणि कर्तव्य यांच्‍यात समतोल राखण्याची गरज आहे असेही पंतप्रधानांनी सांगितले. आपला 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन) हा 26 नोव्हेंबर शिवाय साजराच होऊ शकणार नाही, अशा शब्दात पंतप्रधानांनी संविधान दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले.

सर्व सामान्य नागरिक आज भ्रष्टाचार आणि काळया पैशाविरुध्दच्या लढयातील एक सैनिक बनला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. शक्यतोवर पैसे बदलण्यासाठी लोकांनी डिजिटल पध्दतीचा वापर करावा, असे प्रोत्साहन देतांना यामुळे पारदर्शकता वाढेल असे पंतप्रधान म्हणाले. प्रत्येक व्यक्तीला आपले पैसे खर्च करण्याचा अधिकार आहे असे स्पष्ट करुन कुणीही कुणाचाही पैसे काढून घेऊ शकत नाही असे पंतप्रधानांनी सांगितले.

— PMO India (@PMOIndia) November 25, 2016

Click here to read full text speech