It is the responsibility of everyone to work towards cleanliness: PM Modi
Cleanliness is not something to be achieved by budget allocations. It should become a mass movement: PM Modi
Like 'Satyagraha' freed the country from colonialism, 'Swachhagraha' would free the country from dirt, says PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथे इंडोसॅन-भारत स्वच्छता परिषदेच्या उद्‌घाटनात भाषण केले.

कोणालाही घाण किंवा अस्वच्छ परिसर आवडत नाही, मात्र स्वच्छतेची सवय अंगी बाणायला काही प्रयत्न करावे लागतात, असे ते म्हणाले.

स्वच्छतेच्या मुद्यांवर मुले अधिक जागरुक होत आहेत. स्वच्छता अभियान जनतेच्या जीवनाला स्पर्श करत असल्याचे यावरुन दिसून येते. स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी शहरे आणि नगरांमध्ये सुदृढ स्पर्धा लागलेली दिसत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

माध्यमांनी बजावलेल्या सकारात्मक भूमिकेचे त्यांनी कौतुक केले. माझ्यापेक्षा स्वच्छतेविषयी अधिक काळजी कोणाला असेल तर ती माध्यमांना आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

स्वच्छता ही अर्थसंकल्पीय तरतुदीतून साध्य करावयाची बाब नाही तर ती लोकचळवळ झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
गुलामगिरीपासून आपल्याला मुक्तता देण्यासाठी महात्मा गांधींनी सत्याग्रह पुकारला याची आठवण करुन देत पंतप्रधान म्हणाले की, अस्वच्छतेपासून भारत मुक्त करण्यासाठी स्वच्छाग्रहाची गरज आहे.

प्रदीर्घ काळापासून पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया या आपल्या सवयी आहेत. त्यांना आता अधिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

पुरस्कार विजेत्यांचे विशेषत: लोकसहभागातून यशस्वी ठरलेल्यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले.