सांस्कृतिक कार्य मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत राष्ट्रीय विज्ञान केंद्रात आयोजित “युनायटिंग इंडिया : सरदार पटेल” या संकल्पनेवर आधारित प्रदर्शनाच्या पूर्वतयारीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा घेतला.
पंतप्रधानांच्या प्रेरणेतून साकारलेले हे डिजिटल प्रदर्शन भारताची एकात्मता आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान प्रदर्शित करतील.
या प्रदर्शनात 30 सादरीकरणे आणि विविध प्रकारच्या परस्पर संवादपर माध्यम अनुभव देणाऱ्या 20 वैशिष्टयपूर्ण रचनांचा समावेश आहे. देशाच्या एकात्मिकरणात सरदार वल्लभभाई पटेलांची भूमिका डिजिटल माध्यमांद्वारे पाहण्याची संधी या प्रदर्शनात प्रेक्षकांना लाभणार आहे. 3डी फिल्म, होलोग्राफीक प्रोजेक्शन, कायनॅटिक प्रोजेक्शन, ऑक्युलस बेस्ड व्हर्चुअल रिॲलिटी एक्सपिरियन्स अशी विविध तंत्रे या प्रदर्शनात वापरण्यात आली आहेत.
या प्रदर्शनासाठी भारतीय राष्ट्रीय संग्रहालयातून सांस्कृतिक मंत्रालयाने दस्तावेज प्राप्त केले आहेत. राष्ट्रीय संरचना संस्थेच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन साकारले आहे.
31 ऑक्टोबर 2016 रोजी सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी पंतप्रधानांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.