PM Modi to visit Laos, attend East Asia Summit and ASEAN summit
PM Modi's Laos visit aims to enhance India's physical and digital connectivity with southeast Asia
PM Modi to hold bilateral level talks with world leaders on the sidelines of ASEAN and East Asia Summits
ASEAN is a key partner for our Act East Policy, which is vital for the economic development of our Northeastern region: PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी लाओसमध्ये 7 आणि 8 सप्टेंबर रोजी होणाऱ्या चौदाव्या आसियान-भारत शिखर परिषदेला आणि 11 व्या आशिया शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांनी ‘फेसबूक’च्या माध्यमातून त्यांच्या या दौऱ्याची माहिती दिली आहे.

अशा प्रकारच्या शिखर परिषदांना उपस्थित राहण्याची माझी ही तिसरी वेळ आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
‘ॲक्ट ईस्ट पॉलिसी’चा विचार करता, आपल्याकडील ईशान्येकडील राज्यांचा आर्थिक विकास करण्याच्या दृष्टीने आसियान अतिशय महत्त्वपूर्ण भागीदार आहे. त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनही आसियानमधील राष्ट्रांची सौहार्दाचे संबंध वाढवण्यास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. सध्या क्षेत्रामध्ये परंपरागत आणि अपरंपरागत सुरक्षा विषयक आव्हाने आहेत. त्याा सामोरे जाताना चर्चा करण्यासाठी अशा शिखर परिषदांमुळे व्यासपीठ मिळते. दक्षिण पूर्व आशियाशी आपले खरोखरीच ऐतिहासिक संबंध आहेत.

या दौऱ्यात शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या राष्ट्रांच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करण्याची संधी मला मिळणार आहे. उभय देशांच्या दृष्टीने चिंतेचे प्रश्न बनलेल्या मुद्यांवर आपण चर्चा करणार आहे.