We greet the Election Commission and salute their important role in our democracy: PM on Voters' Day
Elections are celebrations of democracy. They communicate the will of the people, which is supreme in a democracy: PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. निवडणुका लोकशाहीचा सोहळा असल्याचे सांगून पंतप्रधानांनी प्रत्येक पात्र मतदारांना आपला हक्क बजावण्याचे आवाहन केले तसेच युवकांना वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यांनतर मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

पंतप्रधान म्हणाले, “राष्ट्रीय मतदार दिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. निवडणूक आयोगालाही शुभेच्छा देतो आणि आपल्या लोकशाहीत त्यांच्या महत्वपूर्ण भूमिकेला सलाम करतो.

निवडणुका लोकशाहीचा सोहळा आहे. त्या जनतेची इच्छा पोहोचवण्याचे काम करतात, जे लोकशाहीत महत्वाचे आहे.

मी प्रत्येक पात्र मतदाराला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करतो आणि माझ्या तरुण मित्रांना देखील आवाहन करतो कि त्यांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर मतदार म्हणून नोंदणी करावी.”