पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली उच्च न्यायालय स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला आज उपस्थित होते.
गेल्या पाच दशकांहून अधिक काळ दिल्ली उच्च न्यायालयाशी संबंधित सर्वानी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी आदरांजली वाहिली. यासंदर्भात ते म्हणाले कि भारतीय संविधानानुसार सर्व संबंधितांना ज्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत त्या त्यांनी पार पाडायलाच हव्यात.
३१ ऑक्टोबर रोजी सरदार पटेलांची जयंतीदेखील असते याचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की, सरदार पटेल हे वकील होते ज्यांनी आपले आयुष्य देशाच्या सेवेत समर्पित केले. अखिल भारतीय नागरी सेवांच्या निर्मितीसह सरदार पटेलांनी दिलेल्या योगदानाचे त्यांनी स्मरण केले.
पर्यायी विवाद निवारण यंत्रणा बळकट केल्याबद्दल पंतप्रधानांनी कायदा समितीचे अभिनंदन केले. न्याय व्यवस्थेसमोरील आव्हानांचा उल्लेख करताना त्यांनी भविष्यासाठी पथदर्शक आराखडा तयार करण्याचे आवाहन केले.