UK Secretary of State for Foreign & Commonwealth Affairs, Mr. Boris Johnson meets the PM

इंग्लंडचे परराष्ट्र आणि राष्ट्रकुल खात्याचे मंत्री बोरीस जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली.

जॉन्सन 2015 मध्ये लंडनचे महापौर असताना झालेल्या भेटीच्या आठवणींना यावेळी पंतप्रधानांनी उजाळा दिला आणि त्यांना मिळालेल्या पदाबाबत त्यांचे अभिनंदन केले. इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी नोव्हेंबर 2016 मध्ये केलेल्या भारत दौऱ्यामुळे आगामी दिवसात भारत-इंग्लंड संबंधांबाबतची रुपरेषा तयार झाल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.

दोन्ही देशात विविध क्षेत्रात विशेषत: विज्ञान, तंत्रज्ञान, वित्त आणि संरक्षण क्षेत्रात द्विपक्षीय संबंध दृढ होण्यासाठी झालेल्या प्रगतीचे पंतप्रधानांनी कौतुक केले.

इंग्लंडमध्ये राहत असलेला भारतीय समुदाय दोन्ही देशात दुव्याचे काम करत असल्याचे सांगून दोन्ही देशामधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी दोन्ही देश काम करत राहतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.