लोकसभेत बोलताना श्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक संरचना उभारण्यावर रालोआ सरकारचा भर आहे. रालोआ सरकारच्या कालावधीत रस्ते किती जलद गतीने बांधण्यात येत आहेत याबद्दल देखील पंतप्रधान मोदी बोलले. श्री. मोदी म्हणाले “यापूर्वी युपीए च्या कार्यकाळात प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजने अंतर्गत फक्त ६९ किलोमीटर रस्ते बांधण्यात आले होते. पण आम्ही सत्ता हाती घेतल्यापासून १११ किलोमीटर अंतराचे रस्ते बांधले आणि त्यांच्या मूल्यमापनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला.”
Login or Register to add your comment