आपल्या जवानांच्या कल्याणाप्रति केंद्र सरकार कटिबध्द आहे. सरकार स्थापन झाल्यापासून, माजी सानिकांसाठी प्रलंबित असलेल्या समान पद, समान निवृत्तीवेतन येाजनेवर जवानांच्या अनेक मागण्यांबाबत त्यांनी कार्यवाही  केली. याचा माजी सैनिकांना थेट लाभ झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच आपल्या सैन्यदालाच्या जवानांच्या अदम्य शौर्याचा आदर केला आहे आणि आपल्या जवानांचे मनोबल उंचावण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांसोबत पंतप्रधान दरवर्षी दिवाळी साजरी करतात. मोदी यांनी #Sandesh2Soldiers विशेष अभियान सुरु केले, ज्यामध्ये देशभरातील जनतेने जवानांना शुभेच्छापत्रे पाठवली.

पंतप्रधान मोदी आणि आपले जवान

लष्कर दिनानिमित्त,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्काराच्या शौर्य आणि अमूल्य सेवेला सलाम केला आहे.

पंतप्रधान म्हणाले, लष्कर दिनानिमित्त सर्व जवान, निवृत्त अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा. भारतीय लष्कराच्या शौर्याला आणि अमूल्य सेवेला आम्ही सलाम करतो.

देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण असो किंवा नैसर्गिक आपत्तींदरमयान नागरिकांना मदत करणे असो, भारतीय लष्काराने नेहमीच आघाडीवर राहून नेतृत्व केले आहे.

आपल्या जवानांनी केलेल्या बलिदानाचे आपण अभिमानाने स्मरण करतो. 125 कोटी भारतीय शांततेने राहावेत यासाठी ते आपला जीवन धोक्यात घालतात.

 

Greetings to all soldiers, veterans & their families on Army Day. We salute the courage & invaluable service of the Indian Army.

— Narendra Modi (@narendramodi) January 15, 2017