Eight-member delegation of British Parliamentarians meets PM Modi
The relations between India and UK have strong bipartisan support in both countries: PM
India and UK are natural partners in the global fight against terrorism: PM

ब्रिटीश खासदारांच्या 8 सदस्यीय शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

भारत आणि ब्रिटन या दोन्ही देशांतील संबंधांना दोन्ही देशातील राजकीय पक्षांचा भक्कम पाठिंबा आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. दोन्ही देशांमधील संसद सदस्यांमधील परस्पर संवादावर वाढ होण्याची गरज असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

नोव्हेंबर 2015 मधल्या आपल्या ब्रिटन भेटीच्‍या तसंच पंतप्रधान तेरेसा मे यांच्या नोव्हेंबर 2016 मधल्या भारत भेटीच्‍या आठवणींना पंतप्रधान मोदी यांनी उजाळा दिला. 2017 हे वर्ष भारत-ब्रिटन सांस्कृतिक वर्ष म्हणून साजरा करण्याचंही पंतप्रधानांनी स्वागत केलं.

दहशतवादाविरुद्धच्या जागतिक लढ्यात भारत आणि ब्रिटन नैसर्गिक भागीदार असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितले. संसद सदस्यांनी दहशतवाद, जहालमतवाद आणि मूलतत्वाविरुद्ध संघटीत आवाज ऊठवणे सुरुच ठेवावे असे आवाहन केले.