PM Narendra Modi addresses public meeting in Aligarh
Our aim is to make rural India smoke-free. We have launched the Ujjwala Yojana & are providing gas connections to the poor: PM
We want our farmers to prosper. We will undertake every possible measure that benefits them: PM
Uttar Pradesh does not need SCAM. It needs a BJP Government that is devoted to development, welfare of poor & elderly: PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात अलीगढ येथील सार्वजनिक सभेला संबोधित केले. या सभेमध्ये बोलताना श्री. मोदी म्हणाले, की आपले सरकार सातत्याने भ्रष्टाचार आणि काळा पैसा यांच्याविरोधात संघर्ष करत आहे. “2014 मध्ये सत्तेत आल्यापासून आपल्या सरकारने भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि भ्रष्टाचा-यांवर कारवाई करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत,” असे मोदी यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील सपा सरकारवर जोरदार टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, की उत्तर प्रदेश सरकारला या राज्याच्या विकासाची चिंता नाही आणि अनेक उद्योग बंद पडत चालले आहेत आणि त्यांना टाळी लागत आहेत. आमचा भर विकास, विद्युत(वीजनिर्मिती), कायदे आणि रस्ते म्हणजेच दळणवळण व्यवस्था सुधारण्यावर आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

या राज्यातील जनतेला रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून आपले सरकार विविध योजना राबवत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आमच्या युवकांची भरभराट व्हावी आणि त्यांनी विविध क्षेत्रात चमकावे, असे आपल्याला वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही मुद्रा योजना आणली आणि त्यांना कर्जे उपलब्ध करून दिली आणि उद्योजक वृत्तीला चालना दिली.

श्री. मोदी पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांमध्ये कायद्याचे कोणतेही भय उरलेले नाही. “उत्तर प्रदेशातली गुन्हेगार कायद्याला घाबरत नाहीत. मी उत्तर प्रदेशातील जनतेला असे आवाहन करतो की जे लोक या गुन्हेगारांना आश्रय देतात, त्यांना सत्तेवरून बाजूला करा,” असे त्यांनी नमूद केले.

ऊस लागवड करणा-या शेतक-यांच्या कल्याणाच्या योजनांबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात माहिती दिली आणि त्यांची रक्कम 14 दिवसात चुकती केली जाईल, असे सांगितले. आम्ही ऊस लागवड करणा-या शेतक-यांच्या कल्याणाच्या योजना हाती घेतल्या आहेत, पण उत्तर प्रदेश सरकारला या शेतक-यांची काळजी का घेता येत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.”

आमच्या शेतक-यांची भरभराट झालेली आम्हाला पाहायची आहे. त्यांना फायदेशीर असलेला शक्य तो प्रत्येक उपाय आम्ही करू”, असे ते पुढे म्हणाले.

विरोधकांवर हल्लाबोल करताना श्री मोदी म्हणाले,” प्रत्येक पक्ष बाबासाहेबांच्या विचारांचे राजकारण करत आहे. प्रत्येकाने बाबासाहेबांच्या योगदानाचे महत्त्व ओळखले पाहिजे, अशी आमची इच्छा आहे”.

श्री. मोदी पुढे म्हणाले, “ उत्तर प्रदेशच्या जनतेने SCAM च्या विरोधात संघर्ष केला पाहिजे. SCAM – S समाजवादी पक्ष, C- काँग्रेस, A- अखिलेश यादव, M- मायावती, यांच्या विरोधात लढले पाहिजे.” उत्तर प्रदेशला SCAM ची गरज नाही. विकास, गरीब आणि ज्येष्ठ नागरिक यांचे कल्याण याला समर्पित असलेल्या भाजपा सरकारची या राज्याला  गरज आहे.

उत्तर प्रदेशच्या विकासासाठी सरकार बदलण्याचे आवाहन श्री. मोदी यांनी केले.

यावेळी अनेक भाजपा नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Click here to read full text speech