महामहिम अल्माझबेक अत्माबेव
किरगिझ प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष,
सभ्य स्त्री आणि पुरूषहो,
प्रसारमाध्यम प्रतिनिधी,
राष्ट्राध्यक्ष अल्माझबेक अत्माबेव यांच्या पहिल्या भारत भेटीत मी त्यांचे स्वागत करतो. महोदय, मागील वर्षी जुलै महिन्यात किरगिझप्रजासत्ताक भेटीदरम्यान आपण केलेले स्वागत आणि आदरातिथ्याच्या आठवणी अजून माझ्या मनात ताज्या आहेत. आपल्या या भेटीमुळे आपले सहकार्य आणि उच्चस्तरीय संबंधांना निश्चितच वेग प्राप्त होईल. भारत आणि किरगिझ प्रजासत्ताक यांच्यातील नातेसंबंध हे सद्भावनेच्या समांतर ऐतिहासिक दुव्यांवर आधारलेले आहेत. किरगिझ प्रजासत्ताकासह मध्य आशियाशी आमच्या समाजाचे स्नेहपूर्ण संबंध आहेत. लोकशाहीची मूल्ये आणि परंपरांवरील विश्वासाचा समान दुवाही आम्हाला जोडणारा आहे. किरगिझ प्रजासत्ताकमध्ये लोकशाहीची मजबूत पायाभरणी आणि उभारणी करण्यासह पोषक वातावरण करण्याचे बरेचसे श्रेयही राष्ट्राध्यक्ष अत्माबेव यांना जाते.
मित्रांनो,
राष्ट्राध्यक्ष अत्माबेव आणि मी, आमच्या द्विपक्षीय संबंधांबाबत सर्वसमावेशक चर्चा केली. द्विपक्षीय संबंध बहुआयामी आणि सखोल करण्याच्या आमच्या समान प्राथमिकतेवर आम्ही लक्ष केंद्रीत केले. दहशतवाद, अतिरेक आणि मूलतत्ववाद या समान आव्हानांपासून युवक आणि समाजाला सुरक्षित राखण्यासाठी करावयाच्या एकत्रीत प्रयत्नांबाबतही आम्ही चर्चा केली. आमच्या समान हितासाठी ही आव्हाने ओळखून त्यांच्यावर मात करण्याच्या दृष्टीने समन्वय राखत काम करण्याबाबतही आमच्यात सहमती झाली. मध्यवर्ती आशियाला शाश्वत शांतता, स्थैर्य आणि समृद्धीचे क्षेत्र बनविण्याच्या सामूहिक प्रयत्नांमध्ये आम्ही किरगिझ प्रजासत्ताकला आमचा मूल्यवान भागिदार मानतो. या मुद्द्यांसदर्भात काम करताना शांघाय संघटनासुद्धा आम्हाला मूल्यवान आराखडा प्रदान करेल.
मित्रांनो,
संरक्षण क्षेत्रातील सहकार्याचाही राष्ट्राध्यक्ष अत्माबेव आणि मी आढावा घेतला. किरगिझ-भारताचे पर्वतीय जैव वैद्यकीय संशोधन केंद्र हे यशस्वी सहकार्याचे उत्तम उदाहरण आहे. तो आम्हाला अपेक्षित असणारा फलदायक उपक्रम ठरला आहे. किरगिझ प्रजासत्ताक येथे आम्ही किरगिझ-भारत संयुक्त लष्करी प्रशिक्षण केंद्राचे काम सुरू केले आहे. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठीच्या आमच्या संयुक्त लष्करी कवायती, हा आता वार्षिक उपक्रम झाला आहे. यापुढील कवायती पुढच्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत किरगिझ प्रजासत्ताक येथे आयोजित केल्या जाणार आहेत.
मित्रांनो,
आमच्या अर्थव्यवस्था अधिक सखोलपणे परस्परांशी जोडण्याबाबत राष्ट्राध्यक्ष अत्माबेव आणि माझ्यात सहमती झाली. यापुढे आम्ही द्विपक्षिय व्यापार आणि आर्थिक दुवे अधिक सक्षम करण्यासाठी आणि जनतेमधील आदान-प्रदान वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहू. आरोग्य, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, कृषी, खाणकाम आणि उर्जा क्षेत्रातील नव्या संधी शोधण्याच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावण्यासाठी आम्ही दोन्ही देशांमधील उद्योग आणि व्यापाराला प्रोत्साहन देऊ. क्षमता उभारणी आणि प्रशिक्षणासह आमचे विकासविषयक सहकार्य वृद्धींगत करण्याचा निर्णयही आम्ही घेतला आहे. जनता ही अशा उपक्रमांच्या केंद्रस्थानी असते. किरगिझ प्रजासत्ताकासह तांत्रिक आणि सहकार्य कार्यक्रमात आम्ही युवकांच्या आदान-प्रदानावर विशेष भर दिला पाहिजे. या दिशेने काम पुढे नेण्याच्या दृष्टीने आमची आजची चर्चा सहायक ठरेल. मध्यवर्ती आशिया क्षेत्रात प्रथमच गेल्या वर्षीं आम्ही किरगिझ प्रजासत्ताकासह टेली-मेडिसीन (दूरस्थ-वैद्यकीय) दुव्यांसाठी पुढाकार घेतला. या प्रकल्पाचा किरगिझ प्रजासत्ताकाच्या इतर भागांमध्ये विस्तार करण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत.
मित्रांनो,
मार्च 2017 मध्ये भारत आणि किरगिझ प्रजासत्ताक हे दोन्ही देश धोरणात्मक संबंध स्थापनेची 25 वर्षे पूर्ण करतील. हा महत्वपूर्ण टप्पा गाठताना, राष्ट्राध्यक्ष अत्माबेव यांच्या या भारतभेटीमुळे आमची भागिदारी सखोल करण्याच्या प्रक्रियेला आणि आमच्या प्रयत्नांना गती मिळेल. आमच्या सहकार्यातून प्राप्त झालेल्या लाभाचे समावेशन करीत आगामी काळात आमच्यातील बंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनेही ही भेट उपयुक्त ठरेल. राष्ट्राध्यक्ष अत्माबेव यांची ही भारतभेट संस्मरणीय आणि उत्पादक ठरावी, अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.
धन्यवाद,
खूप खूप धन्यवाद !!!
The relationship between India and the Kyrgyz Republic is filled with goodwill from centuries of shared historical links: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 20, 2016
We discussed how we could work together to secure our youth & society against common challenges of terrorism, extremism & radicalism: PM
— PMO India (@PMOIndia) December 20, 2016
Kyrgyz Republic is a valuable partner in our common pursuit of making Central Asia a region of sustainable peace, stability & prosperity: PM
— PMO India (@PMOIndia) December 20, 2016
President Atambaev and I agreed on the need to connect our economies more deeply: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 20, 2016
We will work to strengthen bilateral trade and economic linkages and facilitate greater people-to-people exchanges: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 20, 2016
PM @narendramodi on economic ties: We will encourage engagement in healthcare, tourism, IT, agriculture, mining and energy. pic.twitter.com/Zz1W60O92N
— Vikas Swarup (@MEAIndia) December 20, 2016
— Vikas Swarup (@MEAIndia) December 20, 2016
PM @narendramodi: We have decided to build on our development cooperation including in capacity building and training. pic.twitter.com/BIgHnitJx5
— Vikas Swarup (@MEAIndia) December 20, 2016
PM concludes: As we approach 25 years of diplomatic relations President's visit will drive our efforts of deepening our partnership. pic.twitter.com/48rZXaZ2wS
— Vikas Swarup (@MEAIndia) December 20, 2016