The close association between our two countries is, of course, much older. India and Kenya fought together against colonialism: PM
Common belief in democratic values, our shared developmental priorities & the warm currents of Indian Ocean bind our societies: PM
Kenya's participation in Vibrant Gujarat has generated a strong interest in Indian businesses: PM Modi
India would be happy to share best practises in organic farming with Kenyan farmers: PM
The large Indian-origin community of Kenya is a vital and energetic link between us: PM Modi

महामहीम राष्ट्रपती उहूरू केन्याटा,

मान्यवर प्रतिनिधी,

माध्यमांचे सदस्य,

मित्रानो,

बरोबर सहा महिन्यांपूर्वी मी केनियाचा दौरा केला होता. राष्ट्रपती केन्याटा आणि केनियाच्या जनतेने माझे आपुलकीने आणि प्रेमाने स्वागत केले होते. आणि आज राष्ट्रपती केन्याटा आणि त्यांच्या प्रतिनिधिमंडळाचे भारतात स्वागत करताना मला आनंद होत आहे. आपल्या दोन देशांमधील संबंध फार जुने आहेत. भारत आणि केनियाने एकत्रितपणे वसाहतवादाविरोधात लढा दिला होता. गेल्याच महिन्यात राष्ट्रपती केन्याटा यांनी भारतीय वंशाचे व्यापारी संघटना नेते माखन सिंह यांच्या योगदानाचा उल्लेख केला होता, सिंह यांनी केनियामधून वसाहतवाद उखडून टाकण्यासाठी केनियन बांधवांना मदत केली होती. लोकशाही मूल्यांमधील समान विश्वास, आमचे समान विकास प्राधान्यक्रम आणि हिंद महासागराच्या उबदार लाटांनी आपला समाज जोडला आहे.

मित्रानो,

आज आम्ही केलेल्या चर्चेमध्ये मी आणि राष्ट्रपतींनी उभय देशांमधील संबंधांचा सर्वंकष आढावा घेतला. गेल्या वर्षी माझ्या केनिया दौऱ्यात आम्ही आर्थिक सहकार्य दृढ करण्यावर भर दिला होता. यासंदर्भात, द्विपक्षीय व्यापाराचा विस्तार, दोन्ही अर्थव्यवस्थांदरम्यान भांडवलाचा अधिक ओघ आणि मजबूत विकास भागीदारी याला प्राधान्य आहे.. काल राष्ट्रपती केन्याटा यांनी आठव्या व्हायब्रण्ट गुजरात जागतिक शिखर परिषदेत मजबूत आणि उच्च स्तरीय प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व केले. व्हायब्रण्ट गुजरातमधील तुमच्या सहभागाने भारतीय उद्योगांमध्ये केनियातील व्यावसायिक आणि गुंतवणूक संधींशी जोडून घेण्याबाबत स्वारस्य निर्माण झाले आहे. दोन्ही देशातील उदयोग आणि व्यापारानी आरोग्य, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, कृषी, नील अर्थव्यवस्था आणि ऊर्जा क्षेत्रातील संधींचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा असे आम्हाला वाटते आणि आम्ही त्याला प्रोत्साहन देऊ. उद्या होणाऱ्या संयुक्त व्यापार परिषदेच्या बैठकीत या क्षेत्रांमध्ये विशिष्ट प्रकल्पांच्या माध्यमातून व्यावसायिक संबंध निर्माण करण्याबाबत चर्चा होईल. व्यापाराला चालना देण्यासाठी प्रमाणीकरण आणि संबंधित क्षेत्रासह व्यापार सुलभीकरण पध्दतींवर आम्ही सहकार्य करत आहोत. कृषी आणि अन्न सुरक्षा क्षेत्रात व्यापक आणि बहुविध सहकार्याला आमचे प्राधान्य आहे.

केनियातील कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करत आहोत. कृषी यांत्रिकीकरणासाठी आज करण्यात आलेल्या १०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कर्जाच्या करारामुळे संबंधांना नवीन आयाम मिळेल. डाळींचे उत्पादन आणि आयातीसाठी केनियाबरोबर दीर्घकालीन व्यवस्था निर्माण करण्याबाबत चाचपणी आणि चर्चा देखील केली जात आहे. केनियाच्या शेतकऱ्यांबरोबर सेंद्रिय शेतीतील सर्वोत्तम पध्दतींचे आदान-प्रदान करायला आम्हाला आवडेल. आरोग्य क्षेत्रात, कर्करोगावरील उपचारासाठी भाभा ट्रॉन मशीन केन्याटा राष्ट्रीय रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. भारत आफ्रिका मंच शिखर परिषद उपक्रमांतर्गत, केनियाच्या डॉक्टरांची क्षमता विकसित केली जात आहे. शिक्षणातील भागीदारी आमच्या जनतेमध्ये नवीन संबंध निर्माण करत आहे. नैरोबी विद्यापीठाबरोबर आमचे दृढ संबंध आहेत, येथे आयसीसीआरने भारतीय अध्ययन संस्था उभारली आहे, आणि भारताच्या सहकार्याने ग्रंथालयाचे नूतनीकरण केले जात आहे. ऊर्जा क्षेत्रात, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला केनियाने दिलेला पाठिंबा आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे, आमच्या आर्थिक विकासाला बळ देण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी आम्ही संयुक्तपणे प्रयत्न करत आहोत.

मित्रांनो,

सागरी क्षेत्रातील आव्हाने आमच्यासाठी चिंतेची बाब आहे. मात्र आम्ही नील अर्थव्यवस्थेतील संधींचा देखील शोध घेऊ. आमच्या संरक्षण सहकार्याचे वेगाने परिचालन करण्यावर आमचा भर आहे. हायड्रोग्राफी, दूरसंचार जाळे, चाचेगिरीला विरोध, क्षमता निर्मिती, देवाण-घेवाण आणि संरक्षण वैद्यकीय सहकार्य या क्षेत्रांना विशेष प्राधान्य राहील. आमचे सुरक्षा सहकार्य आणि क्षमता बळकट करण्यासाठी आम्ही भागीदारी करत आहोत. यासंदर्भात, आम्ही संयुक्त कृती गटाला लवकर भेटायला सांगितले आहे. हा गट सायबर सुरक्षा, दहशतवाद प्रतिबंध, अंमली पदार्थ, मानव तस्करी आणि काळ्या पैशाला आळा घालण्यावर लक्ष केंद्रित करेल.

मित्रांनो,

केनियामधील भारतीय वंशाचा मोठा समुदाय महत्वपूर्ण असून आमच्यातील उत्साहवर्धक दुवा आहे. त्यांना आमच्या व्यापार, गुंतवणूक आणि सांस्कृतिक आदान-प्रदानात सहभागी करून घेण्याबाबत मी राष्ट्रपती केन्याटा यांच्याबरोबर चर्चा केली. आमच्या गेल्या वर्षीच्या बैठकीत आम्ही घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीवर वैयक्तिक आणि जवळून देखरेख ठेवण्याबाबत राष्ट्रपती आणि माझ्यात एकमत झाले. याचे गांभीर्य कायम राहील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

महामहीम,

पुन्हा एकदा भारतीय जनतेच्या वतीने आणि माझ्या वतीने, आमचे निमंत्रण स्वीकारल्याबद्दल आणि गुजरात आणि दिल्लीमध्ये येऊन आमचा गौरव वाढवल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो.

धन्यवाद.

खूप खूप धन्यवाद.