PM Modi inaugurates International Conference and Exhibition on Sugarcane Value Chain in Pune
Besides the sugar sector, we should also think of globally competitive bamboo products: PM
We cannot ignore the global economy when we are looking at the sugar industry: PM Modi
PM Modi outlines the steps taken by the Union Government for the welfare of farmers
Demonetization of Rs. 500 & Rs. 1000: Farmers will not be taxed, says PM Modi

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पुणे येथे ‘शुगरकेन व्हॅल्यू चेन-व्हीजन 2025 शुगर’ या आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचे उद्‌घाटन केले.

 

       पंतप्रधानांनी वसंतदादा साखर संस्थेतील पिक प्रात्यक्षिकांना भेट दिली.

संशोधनामुळे शेतकऱ्यांना कसा फायदा होईल याचा आपण विचार केला पाहिजे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. साखर क्षेत्राव्यतिरिक्त आपण जागतिक स्पर्धात्मक बांबू उत्पादनांचा देखील विचार केला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 


चांगल्या प्रतीचे उत्पादन देणाऱ्या शेतीवर लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले. डाळींच्या आवश्यकतेविषयी बोलतांना ते म्हणाले की,

डाळींना खात्रीशीर बाजारपेठ उपलब्ध आहे. जेव्हा आपण ऊस उद्योगाकडे पाहतो तेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेला डावलून चालणार नाही, असे पंतप्रधान म्हणाले. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या मृदा आरोग्य कार्ड, सौर पंप इत्यादी योजनांची माहिती यावेळी पंतप्रधानांनी दिली.

 

नुकत्याच 500 आणि 1000रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत बोलतांना त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, त्यांच्यावर कर आकारला जाणार नाही.