गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानीजी,
माझे सहकारी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धनजी,
स्वीडनच्या मंत्री महोदया श्रीमती ऍना एकस्ट्रॉम,
उपमुख्यमंत्री श्री नितीनभाई पटेलजी,
मान्यवर नोबेल पारितोषिक विजेते,
डॉ. गोरान हॅन्सन, नोबेल फाउंडेशन चे उपाध्यक्ष,
प्रिय शास्त्रज्ञ,
उपस्थिती स्त्री-पुरुष,
गुड इव्हिनिंग!
भारत सरकारचा जैवतंत्रज्ञान विभाग, गुजरात सरकार आणि नोबेल मिडिया यांचे मी सर्वप्रथम हे प्रदर्शन विज्ञाननगरीत पाच आठवड्यांसाठी आणल्याबद्दल आभार मानतो. या प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्याचे मी जाहीर करतो आणि तुम्ही या प्रदर्शनाला भेट देऊन त्याचा अनुभव घ्याल अशी मी आशा व्यक्त करतो. नोबेल पारितोषिक म्हणजे नावीन्यपूर्ण कल्पना, विचार आणि मुलभूत विज्ञानाचा अभ्यास यासाठी जगाने दिलेली अत्युच्च पातळीवरील मान्यता आहे.
यापूर्वी एक, दोन किंवा तीन नोबेल पारितोषिक विजेत्यांनी भारताला भेट दिल्याचे आणि विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांशी त्यांची मर्यादित स्वरूपात चर्चा झाल्याचे प्रसंग घडले आहेत.
पण, आज गुजरातमध्ये नोबेल पारितोषिक विजेत्यांचे तारांगणच अवतरल्याने आम्ही एक इतिहास घडवत आहोत.
या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व नोबेल विजेत्यांचे मी मनापासून स्वागत करतो. तुम्ही भारताचे अनमोल मित्र आहात. तुमच्यापैकी काही जण अनेक वेळा येथे आले असतील. तुमच्यापैकी एकाचा जन्म येथे झाला होता आणि प्रत्यक्षात ते वडोद-यातच लहानाचे मोठे झाले.
या ठिकाणी आमचे अनेक तरुण विद्यार्थी उपस्थित असल्याचे पाहून मला अतिशय आनंद होत आहे. येत्या आठवड्यांमध्ये विज्ञान नगरीला भेट देण्याची विनंती मी तुम्हा सर्वांना आणि तुमच्या मित्रांना करत आहे.
तुमच्याशी संवाद साधण्याच्या असामान्य अनुभवाच्या आठवणी आमचे विद्यार्थी कायम जतन करतील. आमच्या शाश्वत भवितव्याची गुरुकिल्ली असलेली नवी आणि प्रमुख आव्हाने स्वीकारण्याची प्रेरणा त्यांना यातून मिळेल.
हे प्रदर्शन आणि ही मालिका तुम्ही आणि आमचे विद्यार्थी, विज्ञानाचे शिक्षक आणि आमचे वैज्ञानिक यांच्यातील एक अतिशय बळकट दुवा बनेल असा ठाम विश्वास मला वाटत आहे.
भारत पुढील 15 वर्षांत कुठे असला पाहिजे याविषयी माझ्या सरकारचा दृष्टिकोन अतिशय स्पष्ट आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे त्याचे आस आहेत ज्यांच्यावर या दृष्टिकोनाच्या माध्यमातून आखले जाणारे धोरण आणि कृती निश्चित होईल. विज्ञान आणि तंत्रज्ञानाबाबतचा आमचा दृष्टिकोन असा आहे की त्याच्या माध्यमातून आमच्या सर्व युवकांना संधी उपलब्ध होण्याची निश्चिती व्हावी. ते प्रशिक्षण आणि भविष्यासाठी सज्जता यांमुळे आमचे युवक सर्वोत्तम ठिकाणी काम करण्याची क्षमता प्राप्त करू शकतील. तो भारत म्हणजे विज्ञानाचे एक महान केंद्र असेल. तर आम्ही अतिखोल सागरी उत्खनन आणि सायबर प्रणाली यांच्यासारखी प्रमुख आव्हाने स्वीकारण्याची क्षमता प्राप्त करू,
या दृष्टिकोनाचे कृतीत रूपांतर करण्याची योजना आमच्याकडे आहे
देशभरातील आमच्या शाळांमध्ये विज्ञान शिक्षणावरील कार्यक्रम तयार करण्याच्या सूचना आम्ही आमच्या वैज्ञानिकांना केल्या आहेत. यामध्ये शिक्षकांच्या प्रशिक्षणाचाही अंतर्भाव असेल.
पुढील पातळीवर कौशल्य आणि उच्च तंत्रज्ञानयुक्त प्रशिक्षण यासंदर्भात कार्यक्रम तयार करण्यास त्यांना सांगण्यात आले आहे.
या कार्यक्रमामुळे नव्या ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेमध्ये तुम्ही रोजगारक्षम बनाल आणि प्रभावी उद्योजक आणि विचारी वैज्ञानिक बनाल. देशात आणि परदेशात मानाच्या पदांसाठी आणि कामांसाठी स्पर्धा करण्याची क्षमता तुमच्यात निर्माण होईल.
दुसरी बाब म्हणजे आमचे वैज्ञानिक आमच्या शहरातील प्रयोगशाळांची जोडणी करतील. तुमच्या कल्पना, चर्चासत्रे आणि संसाधने व सामग्री यांची देवाणघेवाण तुम्हाला करता येईल. यामुळे आम्हाला अधिक जास्त आणि अधिक चांगले विज्ञानविषयक सहकार्य निर्माण करता येईल.
आमच्या विज्ञान संस्था विज्ञानाशी संबंधित उद्योजकतेचा मोठ्या प्रमाणात विस्तार करतील व प्रत्येक राज्यातील स्थानिक गरजेनुसार व्यावसायिकता निर्माण करतील. तुमचे स्टार्ट अप आणि उद्योग त्यानंतरच्या काळात जागतिक पातळीवर इतर उत्पादनांशी स्पर्धा करू लागतील.
ही बीजे या वर्षी लावली पाहिजेत आणि आपल्याला त्यानंतर दिसेल की त्याची फळे एका निश्चित कालावधीने मिळत आहेत.
माझ्या तरुण मित्रांनो,तुम्ही भारताचे आणि जगाचे भवितव्य आहात. भारत एका विशाल लोकसंख्यात्मक फायद्याचा आणि सर्वोत्तम शिक्षकांचा पर्याय जगाला उपलब्ध करून देत आहे.
युवा विद्यार्थ्यांनो ज्ञान आणि प्रावीण्य यांच्या विहिरींना भरणारे तुम्ही झरे आहात. तुमचे प्रशिक्षण आणि तुमचे भविष्य यांच्याशी या सर्वांचा संबंध आहे.
मानव जातीच्या समृध्दीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आभार. मानवजातीच्या इतिहासात अनेकजण त्यामुळे कशाशीही तुलना न होणारे उच्च दर्जाचे आयुष्य जगत आहेत.
तरीही अनेकांना दारिद्र्याच्या खाईतून वर काढण्याचे आव्हान भारतासमोर आहे. तुम्ही लवकरच वैज्ञानिक बनाल पण या आव्हानाकडे तुम्ही कधीही दुर्लक्ष करता कामा नये.
आपल्या विज्ञानाच्या प्रगल्भतेचे मूल्यमापन विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या चतुर वापराद्वारे आपल्या पृथ्वीवर केल्या जाणाऱ्या जबाबदार परिणामांमधून केले जाणार आहे.
तुम्ही लवकरच वैज्ञानिक आणि या ग्रहाचे पालक बनणार आहात.
हे नोबेल प्रदर्शन आणि विज्ञान नगरीची स्पष्ट फलनिष्पत्ती आपल्याकडे असली पाहिजे.
जागतिक, विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देणारे प्रमुख घटकांपैकी एक म्हणून उदयाला आले आहे. झपाट्याने वृद्धिंगत होणा-या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वैज्ञानिक घडामोडींच्या अपेक्षा वाढत आहेत. नोबेल पारितोषिक मालिकेतून मला तीन प्रकारच्या फलनिष्पत्तींची अपेक्षा आहे.
सर्वात पहिले विद्यार्थी व त्यांचे शिक्षक यांच्या पाऊलखुणांवर वाटचाल. या ठिकाणी आलेले विद्यार्थी व शिक्षक राष्ट्रीय आयडियाथॉन स्पर्धेच्या माध्यमातून आले आहेत आणि ते देशाच्या विविध भागातील आहेत. त्यांच्याशी संपर्क खंडित होऊ देऊ नका.
या प्रदर्शनाच्या काळात तुमच्यासाठी संपूर्ण गुजरातभर शालेय शिक्षकांची अधिवेशने असू शकतील.
दुसरी फलनिष्पत्ती म्हणजे स्थानिक पातळीवर उद्योजकतेला चालना. आपल्या युवकांमध्ये उद्योजकतेचा मोठा उत्साह आहे. गुजरातमध्ये आमच्या विज्ञान मंत्रालयांमध्ये इन्क्युबेटर्स आहेत. आगामी पाच आठवड्यांमध्ये अत्याधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाने स्टार्ट अप्सना कशा प्रकारे चालना देता येईल याविषयीची कार्यशाळा असली पाहिजे.
स्मार्टफोनच्या निर्मितीमध्ये दहा नोबेल पारितोषिक विजेत्या शोधांचा समावेश होता, असे मला सांगण्यात आले आहे. पारितोषिक विजेत्या भौतिकशास्त्रामुळे विजेची बिले आणि आपला ग्रह या दोघांचेही रक्षण होऊ शकते. 2014 मध्ये निळ्या एलईडीच्या शोधासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. अकासाकी, अमानो आणि नाकामुरा या तीन जपानी वैज्ञानिकांनी केलेल्या मुलभूत संशोधनातून याची निर्मिती झाली. यापूर्वी ज्ञात असलेल्या लाल आणि हिरव्या एलईडींसोबत त्यांची जोडणी केल्यास लाखो तास चालणारी पांढ-या प्रकाशाची उपकरणे तयार करता येतील.
अशा प्रकारचे अनेक मनोरंजक शोध आहेत ज्यांचा उद्योगांमध्ये उपयोग होऊ शकेल.
तिसरी, फलनिष्पत्ती म्हणजे समाजावर प्रभाव. आपल्या समाजावर आरोग्य आणि कृषी क्षेत्रांच्या माध्यमातून नोबेल पारितोषिक विजेत्या शोधांचा अतिशय मोठा प्रभाव निर्माण झाला.
याचे उदाहरण म्हणजे जीन-तंत्रज्ञानाची साधने वापरून तयार झालेले प्रिसिजन मेडिसिन ही आता वस्तुस्थिती आहे. आपण या साधनाचा वापर कर्करोग, मधुमेह आणि संसर्गजन्य आजारांचे निदान करण्यासाठी केला पाहिजे.
भारत आधीच जेनेरिक्स आणि बायो-सिमिलरमध्ये गुजरातमधील एका प्रमुख केंद्रासह आघाडीवर आहे, पण आपण जैव-तंत्रज्ञान क्षेत्रातील शोधांमध्येही नेतृत्व करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
हे प्रदर्शन विज्ञान नगरीत आयोजित केल्यामुळे विज्ञानाशी समाजाला जोडण्याचे काम ते करत असल्याबद्दल मला आनंद वाटत आहे. आपल्याला भेडसावणा-या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आवश्यक असलेल्या तोडग्यांचे ज्ञान मिळवण्यामध्ये नागरिकांना सहभागी करून घेण्याचे हे एक आदर्श व्यासपीठ आहे.
ही विज्ञान नगरी खऱ्या अर्थाने आकर्षक, संपूर्ण देशभरातील आणि जगातील तरुण विद्यार्थ्यांसाठी आणि विज्ञान शिक्षकांसाठी जागतिक दर्जाचे एक स्थान बनवण्यासाठी आणि त्याला भेट देणाऱ्यांना प्रेरणादायी बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. केंद्र आणि राज्य या दोघांनीही परस्परांना सहकार्य केले पाहिजे आणि यावर्षी हे आव्हान आपण पेललं पाहिजे.
माझ्या तरुण मित्रांनो,
हे नोबेल पारितोषिक विजेते विज्ञानातील सर्वोच्च पातळीचे प्रतिनिधित्व करत आहेत आणि तुम्ही त्यांच्याकडून धडा घेतलाच पाहिजे. पण एक लक्षात ठेवा महाकाय् पर्वत रांगांमधून शिखराचा उदय होत असतो आणि ते एकटे उभे नसतात. तुम्ही भारताचा पाया आणि भवितव्य आहात. शिखर डोकावणाऱ्या पर्वतरांगांची निर्मिती तुम्ही केली पाहिजे. जर आपण शाळा आणि महाविद्यालये आणि शिक्षकांच्या माध्यमातून पायावर भर दिला तर अनेक चमत्कार घडून येतील. भारतामध्ये शेकडो शिखरे निर्माण होतील. पण जर आपण पायावर आवश्यक असलेल्या मेहनतीकडे दुर्लक्ष केले तर एकही शिखर जादू होऊन निर्माण होणार नाही. प्रेरणाग्राही आणि धाडसी बना, धैर्य बाळगा आणि तुमचे स्वतःचे प्रेरणास्रोत बना आणि कोणाची नक्कल करू नका. आपल्या मान्यवर पाहुण्यांनी अशाच प्रकारे यश मिळवले आहे आणि म्हणूनच तुम्ही देखील त्यांच्याकडून शिकले पाहिजे. या ठिकाणी अशा प्रकारचा नावीन्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी नोबेल मिडिया फाउंडेशन, भारत सरकारचा जैवतंत्रज्ञान विभाग आणि गुजरात सरकारचे आभार मानत आहे. या प्रदर्शनाला उदंड यश लाभो अशा शुभेच्छा मी देत आहे आणि तुम्हा सर्वांना त्याचा लाभ होईल याची मला खात्री आहे.
Opportunities in science for the youth, India as a hub for research and innovation. pic.twitter.com/nT9bB6aXVj
— PMO India (@PMOIndia) January 9, 2017
The Prime Minister speaks at Science City in Ahmedabad. pic.twitter.com/qjGrhSdZqU
— PMO India (@PMOIndia) January 9, 2017
Science driven enterprise and catering to local needs and aspirations through science. pic.twitter.com/HULKnJ5eRn
— PMO India (@PMOIndia) January 9, 2017
Science for the betterment of humanity. pic.twitter.com/beOVOLPSca
— PMO India (@PMOIndia) January 9, 2017