PM Narendra Modi lays foundation stones for several development projects in Mumbai
PM Modi lays foundation of the Shiv Smarak, a towering statue in the Arabian Sea in the memory of Maratha king Chhatrapati Shivaji
Even in the midst of struggle, Shivaji Maharaj remained a torchbearer of good governance: PM
Development is the solution to all problems, it is the way ahead: PM
The strength of 125 crore Indians will bring about change in this nation: PM Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत विविध विकास कामांचे भूमिपूजन केले. दोन मेट्रो लाईन्स, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाचा तिसरा टप्पा आणि दोन उन्नत मार्गांचा यात समावेश आहे.
याआधी पंतप्रधानांनी अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे जलपूजन केले. शिवस्मारकाचे जलपूजन करणे ही विशेष बाब असून, आपल्याला या जलपूजनाची संधी मिळाली ही आनंदाची गोष्ट असल्याचे पंतप्रधान म्हणाले. संघर्षाच्या काळातही शिवाजी महाराजांनी उत्तम प्रशासनाची मशाल हाती धरल्याचे पंतप्रधानांनी वांद्रे-कुर्ला संकुलात जनसभेला संबोधित करताना सांगितले. शिवाजी महाराज हे बहूआयामी व्यक्तीत्व होते असे सांगून त्यांच्या व्यक्तीमत्वातले अनेक पैलू आपल्यासाठी स्फूर्तीदायी असल्याचे पंतप्रधान म्हणाले. शिवाजी महाराजांचा पराक्रम आपल्याला परिचित आहेच मात्र जल आणि वित्त याबाबतची धोरणे आणि इतरही अनेक पैलूंबाबत आपण जाणून घेतले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
विकास हाच सर्व समस्यांवरचा तोडगा आहे. 125 कोटी भारतीयांची ताकद देशात बदल घडवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सत्तेवर आपल्यापासूनच भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा सुरु झाला आहे, असे सांगून 8 नोव्हेंबरला ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यांनी भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधातल्या लढ्याला पाठिंबा दिला. भारताची जनता काळापैसा आणि भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 50 दिवसानंतर प्रामाणिक लोकांचा त्रास कमी व्हायला सुरुवात होईल, तर अप्रामाणिक लोकांच्या समस्या वाढत जातील, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

पंतप्रधानांनी आज भूमिपूजन केलेल्या नागरी पायाभूत प्रकल्पात डीएन नगर-वांद्रे-मानखुर्द मेट्रो 2बी कॉरीडॉर, वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो-4 कॉरीडॉर, दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मुंबई नागरी परिवहन प्रकल्प-तीन, उपनगरी रेल्वेसाठी नव्या गाड्यांची खरेदी, विरार-डहाणू मार्गाचे चौपदरीकरण, पनवेल-कर्जत-खोपोली दरम्यान 28 किलोमीटरचा कॉरीडॉर आणि इतर प्रकल्पांचा समावेश आहे. 48 किलोमीटरच्या वांद्रे-विरार उन्नत रेल्वे कॉरीडॉरसाठी, सीएसटी-पनवेल उन्नत रेल्वे कॉरीडॉरसाठी आणि 70 किलोमीटरच्या वसई-दिवा-पनवेल उपनगरी कॉरीडॉरसाठी रेल्वेने महाराष्ट्र सरकारसमवेत सामंजस्य करारांचे आदान-प्रदानही केले.