US Congressional Delegation calls on the Prime Minister
PM Modi shares India's commitment to further strengthen ties with the US

अमेरिका महासभेच्या 26 सदस्यीय प्रतिनिधी मंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधानांनी यावेळी महासभेच्या प्रतिनिधींचे भारतात स्वागत केले. अमेरिकेचे नवीन प्रशासन आणि महासभेसोबत द्विपक्षीय देवाण-घेवाण करण्याच्या दृष्टीने ही चांगली सुरुवात असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी यावेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेला उजाळा दिला आणि मागील अडीच वर्षात वृद्धिंगत झालेले संबंध अधिक दृढ करण्याची वचनबद्धता त्यांनी दर्शवली. या अनुषंगाने भारत-अमेरिका भागीदारीसाठी अमेरिका महासभेचा भक्कम पाठिंबा असल्याचे ते म्हणाले.

मागील अनेक वर्षांपासून उभय देशांच्या भरभराटीमध्ये संबंधित देश योगदान देत आहेत तसंच इतर क्षेत्रातही उभय देश अजून जोमाने कार्य करतील, असे पंतप्रधान म्हणाले. याच अनुषंगाने अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि समाजाला समृद्ध करण्यामध्ये कुशल भारतीय प्रतिभेच्या भूमिकेचा उल्लेख पंतप्रधानांनी यावेळी केला.