राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणावर लोकसभेत झालेल्या धन्यवाद प्रस्तावावर बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की रालोआ सरकारने भारतातील सर्व गावांना ऑप्टीकल फायबर नेटवर्कद्वारे जोडण्याचे काम एक अभियान महणून हाती घेतले आहे. श्री. मोदी यावेळी म्हणाले की २०११ ते २०१४ या काळात राष्ट्रीय ऑप्टीकल फायबर नेटवर्क कार्यक्रमाअंतर्गत केवळ ५९ गावांना लाभ मिळाला, तो ही संपूर्णपणे नाही, अनेक गावांमध्ये ही जोडणी यशस्वी झालीच नाही. त्याच्या केबलची खरेदीही पूर्णतः केंद्रीकृत पध्दतीने होत होती. मात्र, २०१४ मध्ये आमचे सरकार सत्तेत आल्यावर आम्ही या प्रक्रियेत बदल केले. आम्ही या प्रक्रियेचे विकेंद्रीकरण केले. आणि आज ऑप्टीकल फायबर नेटवर्कचे जाळे देशातील २६ हजार गावांमध्ये शेवटच्या टोकापर्यंत आम्ही पसरवले आहे.
Login or Register to add your comment