चीनच्या राष्ट्रीय दिनानिमित्त चीनच्या जनतेला माझ्या शुभेच्छा.
अनेक शतकांपासून शिक्षण, कला, अध्यात्म, व्यापार या क्षेत्रात उभय देशात संबंध असून, परस्परांच्या संस्कृतीचा आदर उभय देश करतात. दोन्ही देशांच्या आशा-आकांक्षा, आव्हाने आणि संधी यांच्यात बरेच साम्य असल्याचे मी याआधीच नमूद केले आहे. चीन आणि भारत यांची प्रगती, उभय देशातले जवळचे संबंध यांच्यात आशिया खंडाचे भविष्य शांततापूर्ण आणि स्थैर्य लाभलेले असावे, यासाठी आकार देण्याची क्षमता आहे. हा दृष्टीकोन चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी आणि पंतप्रधान ली यांच्यासमोरही मी मांडला आहे.
सध्याच्या काळात उभय देशातले संबंध अधिक दृढ करण्याबरोबरच परस्पर विश्वास वृद्धींगत करण्यावरही भर देण्यात येत आहे. उभय देशातल्या जनतेदरम्यान संबंध अधिक दृढ करण्यावरही भर देण्यात येत असून, या दिशेने प्रयत्न सुरुच राहतील.