जास्तीत जास्त व्यवहार रोकडरहित करावेत या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला अनुसरुन पंतप्रधान कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आगळे पाऊल उचलले आहे.
मोबाईल बँकिंग, तसेच युपीआय, ई-वॉलेटसारख्या मोबाईल ॲपचा वापर करुन दैनंदिन व्यवहारासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा आणि अतिरिक्त प्रधान सचिव पी.के. मिश्रा यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी आज कार्यशाळा आयोजित केली.
रोख रकमेचा वापर न करता व्यवहार कसे करावेत याची प्रक्रिया या अधिकाऱ्यांनी विषद केली आणि मोबाईल फोनवर संबंधित ॲप डाऊनलोड करण्यासाठी कर्मचाऱ्यांना मदत केली.
स्मार्ट बँकीग आणि मोबाईल ॲपद्वारे व्यवहार करण्याविषयी या कार्यशाळेत सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनीही उत्साही प्रतिसाद दिला.
स्टेट बँक ऑफ इंडिया आणि MyGov चे अधिकारी यावेळी उपस्थित होते.