Group of Secretaries present ideas for transformative change in different areas of governance
Secretaries to GoI present ideas on science and technology, energy and environment to PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रशासनामध्ये परिवर्तन करण्यासाठी कोणत्या नवीन कल्पना प्रत्यक्षात आणता येतील, याची माहिती सचिवांच्या समुहांकडून घेत आहेत. या कार्यक्रमामध्ये आज पंतप्रधानांसमोर विज्ञान आणि तंत्रज्ञान, ऊर्जा आणि पर्यावरण या विभागात बदल घडवून आणण्यासाठी सचिवांच्या तीन समुहांनी आपल्या कल्पनांचे सादरीकरण केले.

या कल्पना देशातल्या नागरिकाला मध्यवर्ती ठेवून बनवलेल्या असाव्यात तसेच डिजिटल साधनांचा वापर केलेला असावा, नवकल्पनांबरोबरच कायद्याचे सुलभीकरण व्हावे अशा दृष्टीने प्रशासनात बदल अपेक्षित आहेत.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी केलेल्या सादरीकरणामध्ये शिकण्याच्या संधींमध्ये सुधारणा होईल आणि नोकरी, स्टार्टअपचा लाभ घेता येईल. यावर भर देण्यात आला.

ऊर्जा आणि पर्यावरण या विषयी करण्यात आलेल्या सादरीकरणामध्ये ऊर्जेचे वेगवेगळे स्रोत आणि ऊर्जेची बचत याला प्राधान्य देण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री आणि निती आयोगाचे अधिकारी उपस्थित होते.

या मालिकेत एकूण सचिवांचे नऊ समूह आपल्या नवकल्पनांचे सादरीकरण करणार असून त्यापैकी चार सादरीकरण पूर्ण झाली आहेत.