उत्तर प्रदेशात लखीमपूर येथील सार्वजनिक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की येथील राज्य सरकारने जनतेला गेल्या पाच वर्षात केलेल्या प्रगतीची माहिती दिलीच पाहिजे. होऊ घातलेल्या निवडणुका लक्षात घेऊन उत्तर प्रदेश सरकारने लखनौमध्ये अपूर्ण राहिलेल्या मेट्रो प्रकल्पाचे उद्‌घाटन केले, असा आरोप मोदी यांनी केला. मी अखिलेशजींना लखनौमध्ये येण्याचे आमंत्रण देतो. मी देखील तेथे असेन आणि मग आम्ही दोघे मिळून मेट्रोतून सफर करू. मला खरोखरच या गोष्टीचे आश्चर्य वाटते की, ना रेल्वे गाड्या धावत आहेत, ना स्थानके पूर्ण आहेत आणि तुम्ही या प्रकल्पाचे उद्‌घाटन केले आहे.

वैद्यकीय सुविधा सुरू न झालेल्या आणि डॉक्टर उपलब्ध नसलेल्या रुग्णालयाचे उत्तर प्रदेश सरकारने उद्‌घाटन केले, असा आरोपही त्यांनी केला.